- नाशिक, मुंबई आणि ठाण्यातून आयकर खात्याचे कर्मचारी जिल्ह्यात दाखल
- गाड्यांवर ‘दुल्हन हम ले जाएंगे’असे स्टीकर्स लावण्यात आले होते
- या स्टीकर्सवर वधू आणि वराची नावंही लिहण्यात आली होती
साहजिकच इतक्या मोठ्याप्रमाणात आयकर खात्याचे कर्मचारी जालना जिल्ह्यात आले तर ते तात्काळ लक्षात आले असते आणि संबंधित स्टील व्यावसायिक सावध झाले असते. त्यामुळे आयकर खात्याचे कर्मचारी लग्नाचे वऱ्हाडी होऊन जालन्यात दाखल झाले. या मोहिमेत नाशिक, मुंबई आणि ठाण्यातून आयकर खात्याचे कर्मचारी जिल्ह्यात दाखल झाले होते. जालन्यात प्रवेश करताना आयकर विभागाचे अधिकारी असलेल्या गाड्यांवर ‘दुल्हन हम ले जाएंगे’असे स्टीकर्स लावण्यात आले होते. या स्टीकर्सवर वधू आणि वराची नावंही लिहण्यात आली होती. त्यामुळे या गाड्यांमधून आयकर विभागाचे कर्मचारी इतक्या मोठ्या संख्येने जालना जिल्ह्यात दाखल झाल्याची गंधवार्ताही कोणाला लागली नाही. त्यामुळे आयकर खात्याची इतके मोठे धाडसत्र विनासायास पार पडले.
नोटा मोजायला १२ मशिन्स आणि १४ तासांचा अवधी
आयकर विभागाचे कर्मचारी छापेमारीत जमा झालेली रोकड नजीकच्या एसबीआय बँकेत नेऊन मोजत होते. त्यामुळे बँकेच्या टेबलांवर ठिकठिकाणी नोटांच्या बंडलांची थप्पी रचलेली दिसत होती. इतके कर्मचारी आणि १२ मशिन्स दिमतीला असूनही ही सर्व रोकड मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. इतक्या मशिन्स वापरुनही ही सर्व रोकड मोजण्यासाठी तब्बल १४ तासांचा अवधी लागला. यावरून मराठवाड्यातील ही कारवाई किती मोठी असेल, याचा अंदाज येऊ शकतो.
स्टील व्यावसायिकांच्या फार्म हाऊसमध्ये सापडली रोकड
या मोहीमेसाठी आयकर खात्याने पाच प्रमुख पथकं तयार केली होती. सुरुवातील या पथकांनी संबंधित स्टील व्यावसायिकांच्या घरांवर छापे टाकले, तेव्हा त्यांच्या हाताला फार काही लागले नाही. त्यानंतर प्राप्तीकर खात्याच्या पथकांनी आपला मोर्चा शहराबाहेरील फार्म हाऊसकडे वळवला. तेव्हा त्यांना अधिकाऱ्यांना कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड लपवून ठेवल्याचे आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्याने आयकर खात्याचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत.