रितेश देशमुखने ‘तो’ व्हिडीओ शेअर केल्यावर संतापली जिनिलिया, म्हणाली “तू आता…”
बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रेम दिसून येते. रितेश आणि जिनिलिया हे दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. रितेश हा नेहमी त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतंच रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
नुकतंच रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक मजेशीर रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जिनिलियाही दिसत आहे. या व्हिडीओत जिनिलिया ही एका ठिकाणी बसून काहीतरी चर्चा करत असल्याचे दिसत आहेत. तर दुसरीकडे रितेशने तिच्या नकळत हा व्हिडीओ शूट केला आहे. यात त्याने जिनिलियाला इन्स्टाग्रामच्या मदतीने मिशी लावली आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना रितेशने त्याला फार हटके कॅप्शन दिलं आहे. ‘माझा नवरा…’, असे कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ जिनिलियाला टॅग केला आहे. त्यावर जिनिलयानेही कमेंट करत ‘रितेश तू ही आता संकटात सापडणार आहेस’, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या या मजेशीर व्हिडीओवर अभिनेत्री अमृता खानविलकर हिने देखील कमेंट केली आहे. ‘तुम्ही असे का करता…?’ असा प्रश्न तिने या कमेंटद्वारे रितेशला विचारला आहे.
दरम्यान रितेश आणि जिनिलियाचा इन्स्टाग्रामवरील तो व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेक कलाकारांसह विविध कमेंट पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या पोस्टवर अनेकांनी स्माईली, हार्ट यांसारखे इमोजी शेअर केले आहेत.
‘मी जे करतो त्याला प्रेम नाही…’; रितेश देशमुखच्या पोस्टने वेधले सर्वांचेच लक्ष, जिनिलियाने कमेंट करत दिले उत्तर
‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्याच निमित्ताने ते पहिल्यांदाच हैदराबाद विमानतळावर भेटले. मात्र यावेळी जिनिलियाचे वागणे रितेशला फार काही पटले नाही. त्याने स्वत:हून तिच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला मात्र जेनेलियाने त्याच्याकडे थोडेसे दुर्लक्ष केले. परंतु पुढे जसजसे एकमेकांना त्यांचे स्वभाव कळत गेले तसे त्यांच्यातले प्रेम खुलले. २०१२ मध्ये ते लग्न बंधनाता अडकले. त्या दोघांना रियान आणि राहिल अशी दोन मुले आहेत.