मुंबई/NHI NEWS AGENCY
शालेय कॅरम खेळाडूंना गेली अनेक वर्षे विनाशुल्क स्पर्धात्मक खेळासह मोफत मार्गदर्शन करीत असल्याबद्दल आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या कॅरम क्षेत्रातील कार्याचा विशेष गौरव श्री नारायण गुरु कॉलेजतर्फे करण्यात आला. यानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांचा गौरवचिन्ह देऊन श्री नारायण गुरु कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्रन कर्थडी व उपप्राचार्य डॉ.जयश्री व्यंकटअचलम यांनी राज्य स्तरीय आंतर महाविध्यालयीन कॅरम स्पर्धेप्रसंगी सत्कार केला.
राज्य स्तरीय आंतर ज्युनियर व सिनियर कॉलेज विनाशुल्क कॅरम स्पर्धा नुकतीच आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने श्री नारायण गुरु कॉलेजतर्फे चेंबूर येथे यशस्वीपणे पार पडली. स्पर्धेमध्ये राष्ट्रीय ख्यातीचे पौरस करगुटकर, समृध्दी घाडीगावकर, निलांश चिपळूणकर, अंकित मोहिते, रुची माचीवले आदी नामवंत उदयोन्मुख कॅरमपटूनी सामन्यांमध्ये रंगत आणली. शालेय व महाविद्यालयीन खेळाडूंना स्पर्धात्मक कॅरम खेळासह मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी गेली दोन दशके कार्यरत आहे. युंवा खेळाडूंच्या आग्रहास्तव मोफत मार्गदर्शनासह आंतर शालेय व महाविध्यालयीन खेळाडूंसाठी क्रीडापटू गोविंदराव मोहिते अमृत महोत्सवी चषक ६३ वी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यासाठी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी २९ जूनपासून सज्ज आहे.
******************************