अहवालाच्या ७व्या पर्वामधून रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर झालेले परिणाम निदर्शनास आले आहेत, ३२% मुंबईकरांना वाटते की त्यांना झोपेचा आजार झाला आहे
मुंबई, : वेकफिट.को (Wakefit.co) या भारतातील सर्वात मोठ्या डी२सी स्लीप व होम सोल्यूशन्स प्रदात्याने नुकतेच त्यांच्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड (जीआयएसएस) २०२४चा ७वा अहवाला सादर केले. यंदाच्या सर्वेक्षणामधून मुंबईतील झोपेचे ट्रेण्ड्स व पद्धतींबाबत रोचक माहिती निदर्शनास आली. या अहवालामधील निष्कर्षानुसार, जवळपास पन्नास टक्के मुंबईकर रात्री ११ नंतर झोपतात. तसेच, मुंबईतील ५५ टक्के व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर रिफ्रेश वाटत नाही, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या ४९ टक्क्यांच्या तुलनेत वाढ झाली आहे. या अहवालामधील अतिरिक्त माहिती पुढे देण्यात आली आहे.
- रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, सकाळच्या वेळी थकवा जाणवणे
या अहवालामधून निदर्शनास आले की मुंबईतील ४६ टक्के व्यक्ती रात्री ११ नंतर झोपतात, ज्यामधून रात्री उशिरापर्यंत केल्या जाणाऱ्या क्रियाकलापांचा प्रचलित ट्रेण्ड दिसून येतो. मुंबईतील रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याच्या प्रमाणामधून ५५ टक्के व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर रिफ्रेश न वाटण्याचे दिसून येते. या अहवालामधून निदर्शनास आले की, ८९ टक्के मुंबईकर रात्रीच्या वेळी १ ते २ वेळा उठतात. झोपेचा दर्जा खालावत जाण्याच्या लक्षणांमूधन ३२ टक्के मुंबईकरांनी झोपेचा आजार झाल्याचे सांगितले आहे.
- सोशल मीडियाचा अतिवापर
प्रमाणित तथ्य आहे की, झोपण्याच्या किमान एक तास अगोदर डिजिटल डिवाईसेस न पाहणे हे उत्तम झोपेसाठी आवश्यक आहे. तरीदेखील, ९० टक्के मुंबईकर झोपण्यापूर्वी फोनचा नियमितपणे वापर करतात. या अहवालामधून निदर्शनास आले की ५२ टक्के मुंबईकर रात्री उशिरापर्यंत जागे राहण्यासाठी ओटीटी व सोशल मीडिया हे प्रमुख कारण आहेत, ज्यामधून कधीच न झोपणारे शहर म्हणून शहराची प्रतिष्ठा कायम राखली जात आहे. या ट्रेण्ड्समधून डिजिटल डिवाईसेसच्या वापरामुळे झोपेवर होणारे परिणाम दिसून येतात.
- काम, चिंता आणि थकवा
या अहवालामधून निदर्शनास आले की, मुंबईतील जवळपास ३० टक्के कर्मचारी कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. तसेच, ५७ टक्के मुंबईकरांना कामकाजाच्या वेळी थकल्यासारखे व झोप आल्यासारखे वाटते. यामधून झोपमोडचा त्यांच्या उत्पादकतेवर आणि आरोग्यावर होणारा परिणाम दिसून येतो. तज्ञांच्या मते, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे हे दिवसा झोप येण्याचे प्रमुख कारण आहे, ज्यामुळे व्यक्ती कामाच्या वेळी काहीशी डुलकी घेण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.
- पुरेशी झोप घेण्याच्या दिशेने पुढाकार
झोपेचा दर्जा सुधारण्यासाठी मुंबईकरांचा काही विशिष्ट सवयी अंगिकारण्याचा वाढता कल आहे. ३७ टक्के मुंबईकरांचा विश्वास आहे की, झोपेच्या अगोदर डिजिटल डिवाईसेचा वापर न केल्यास उत्तम झोप मिळण्यास मदत होईल. तसेच, २८ टक्के मुंबईकरांचा विश्वास आहे की दर्जेदार मॅट्रेस खरेदी केल्यास झोपेचा दर्जा सुधारू शकतो, यामधून आरामदायी झोपेसाठी झोपेसंबंधित वातावरणाच्या महत्त्वाबाबत वाढती जागरूकता दिसून येते. या अहवालामधील निष्पत्तींमधून झोपेच्या आरोग्यदायी सवयी अंगिकारण्याचे आणि मुंबईकरांची होणारी झोपमोड टाळण्यासाठी झोपेसंबंधित अनुकूल वातावरण असण्याचे महत्त्व दिसून येते.
ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड सुरू असलेले सर्वेक्षण आहे आणि २०२४ पर्वाला मार्च २०२३ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या १०,००० प्रतिसादकांकडून प्रतिसाद मिळाला. या अहवालामध्ये भारतातील सर्व शहरांमधील, सर्व वयोगटातील व विविध डेमोग्राफिक्समधील प्रतिसादकांचा समावेश आहे. कंपनीने नुकतेच द हॅप्पी होम इंडेक्स लाँच केले, जे घराला आनंदी व सुरक्षित करण्याप्रती योगदान देणाऱ्या विविध पैलूंमधील परस्परसंबंध जाणून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आले. Wakefit.co विचारशील नेतृत्व-केंद्रित कन्टेन्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करते, ज्यामागे ग्राहकांना माहिती देण्याचा आणि संपूर्ण भारतात झोप व होम सोल्यूशन्सबाबत अर्थपूर्ण संवाद निर्माण करण्याचा मनसुबा आहे.