NHI NEWS
१५० वर्षांची परंपरा लाभलेल्या बॉम्बे वायएमसीएतर्फे ८ ते २२ वयोगटामधील युवा वर्गासाठी ८ एप्रिलपासून उन्हाळी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबीर नीलशी-लोणावळा येथील वायएमसीए लेकसाईड कॅम्प येथे होणार असून पोहणे, धनुर्विद्या, रॉक क्लायम्बिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, झिपलाईन, ट्रेक आदींचा समावेश आहे. युवा पिढीला शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच युवा पिढीला विशेषतः पोहणे व धनुर्विद्या क्रीडा प्रकाराचे कौशल्य आत्मसात करण्याचा देखील प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांची टीम विशेष कार्यरत असेल.
शालांत परीक्षा संपल्यावर दहावी व बारावी विध्यार्थी-विध्यार्थिनीसाठी खास शिबीर ८ ते १२ एप्रिल दरम्यान होणार आहे. त्यानंतर ८ ते १७ वयोगटामधील मुलामुलींसाठी २ मे ते ६ मे, ६ मे ते १० मे आणि १० मे ते १४ मे अशा तीन कालावधीत शिबिराचे आयोजन होईल. १४ मे ते १८ मे दरम्यान १७ ते २२ वयोगटातील युवा वर्गासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. बॉम्बे वायएमसीएच्या परंपरेस साजेसे आदर्श उन्हाळी शिबीर आयोजित करण्यासाठी संयोजक अमूल राज व त्यांचे सहकरी विशेष कार्यरत आहेत. उन्हाळी शिबिरात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी प्रवेशासाठी अथवा अधिक माहितीसाठी वायएमसीएच्या मुंबईमधील कोणत्याही शाखा कार्यालयात अथवा भ्रमणध्वनी क्रमांक ९९२०० ४५६६१ येथे २ एप्रिलपर्यंत संपर्क साधावा.