MUMBAI / NHI NEWS
शिवाजी पार्क जिमखाना आयोजित टेनिसपटू व संघटक पी.एस. उर्फ दादा खानोलकर स्मृती एसपीजी अखिल भारतीय दुहेरी टेनिस स्पर्धेत प्रथम मानांकित संदीप मोरे व विकी प्रजापती जोडी विजेती ठरली. संदीप-विकी जोडीने सर्वांगसुंदर खेळ करून अंतिम सामन्यात भावेश-विजय गिरी जोडीचे आव्हान ६-४ असे संपुष्टात आणले आणि अंतिम विजेतेपदाचा दादा खानोलकर स्मृती चषकासह रोख पुरस्कार जिंकला.
भावेश-विजय जोडीने सुरुवातीपासून निकराची लढत देऊनही अखेर रोख पुरस्कारासह अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्यांना शिवाजी पार्क जिमखान्याचे जनरल सेक्रेटरी संजीव खानोलकर, टेनिस सेक्रेटरी योगेश परुळेकर व अन्य पदाधिकारी तसेच सेक्युरिटी एचक्यू कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी संकेत खानोलकर, राष्ट्रीय प्रशिक्षक ताहीर अली आदी मान्यवरांनी गौरविले. सेक्युरिटी एचक्यू कंपनी सहप्रायोजित व एमएसएलटीए मान्यतेने झालेल्या स्पर्धेत देशभरातील २५० टेनिस मार्कर व सहाय्यक प्रशिक्षक स्पर्धकांनी दादर-पश्चिम येथील एसपीजी टेनिस कोर्ट गाजविले.