मुंबई, फेब्रुवारी २८, २०२४: वर्ल्ड मोन्युमेंट्स फंड इंडिया (डब्ल्यूएमएफआय) ने मुंबईतील १६५ वर्ष जुन्या अफगाण वॉर मेमोरियल चर्चचा जीर्णोद्धार पूर्ण केला आहे. ३ मार्च २०२४ रोजी नियोजित सुपूर्द समारंभानंतर ते सर्वसामान्यांसाठी खुले केले जाईल. डब्ल्यूएमएफआयने सिटीकडून (Citi) मिळलेल्या निधीसाह्याच्या माध्यमातून अफगाण चर्चच्या पास्टोरेट कमिटी आणि कस्टोडियन यांच्या सहकार्याने कुलाबा, मुंबई येथील वॉर मेमोरिअल चर्चच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. जीर्णोद्धार प्रकल्प मार्च २०२२ मध्ये सुरू झाला आणि २४ महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाला.
चर्च ऑफ सेंट जॉन द इव्हँजेलिस्ट सामान्यतः अफगाण चर्च म्हणून ओळखले जाते. ही एक अँग्लिकन वास्तु आहे. इमारत आणि तिची मांडणी मुंबईच्या सुरुवातीच्या वसाहतीचा उत्कृष्ट नमुना आहे. चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या मुंबई डायोसीसशी संलग्न गॉथिक आर्किटेक्चरचा हा नमुना १८४७ ते १८५८ च्या दरम्यान बांधण्यात आला, ज्याला ग्रेड I हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून नियुक्त केले गेले. सुरुवातीला गॅरिसन चर्च म्हणून प्रसिद्ध या चर्चला ‘ब्राइड्स चर्च’ असे नाव मिळाले. हेन्री कोनीबियर यांनी डिझाइन केलेले अफगाण चर्च बॉम्बे आर्मी, मद्रास आर्मी, बंगाल आर्मी व एचएम आर्मी आणि पहिले अँग्लो-अफगाण युद्ध I (१८३८-१९४०) व दुसरे अँग्लो-अफगाण युद्ध II (१८७८-१८८०) मध्ये लढलेल्या इतर रेजिमेंटसह विविध रेजिमेंटच्या आठवणीला उजाळा देते.
अफगाण चर्च या युद्धांमध्ये मृत पावलेले ४,५०० सैनिक आणि त्यांच्या छावणीतील १२,००० अनुयायांचा सन्मान करण्यासाठी ब्रिटिश सरकारने नियुक्त केलेल्या जमिनीवर बांधले गेले. सैन्यातील सहाय्यक सर्जन विलियम ब्रायडन हे ब्रिटीशांच्या बाजूने या युद्धामध्ये वाचलेले व्यक्ती होते किंवा त्या वेळी त्याची नोंद झाली होती. या प्रोजेक्टदरम्यान ‘कंपनीसाठी’ युद्धात मृत पावलेल्या हजारो भारतीयांची माहिती कधीच मिळाली नाही हे समजले. आज लावण्यात आलेला फलक या युद्धांमध्ये मृत्युमुखी पडलेले अधिकारी व पुरूषांना सन्मानित करतो आणि त्यात भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे.
वर्ल्ड मोन्युमेंट्स फंड इंडियाने त्यांच्या तज्ञ संरक्षण सल्लागार किर्तिदा उनवाला यांच्या माध्यमातून सर्वसमावेशक संवर्धन योजना तयार केली. सिटीने (Citi) चर्चच्या जीर्णोद्धाराची योजना आणि अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण निधीसाह्य केले. चर्चचे आंतरिक महत्त्व त्याच्या मेमोरियल टॅब्लेट आणि प्रतीकात्मक स्टेन्ड-काचेच्या खिडक्यांमध्ये सामावलेले आहे. हे चर्च स्थानिक पातळीवर उपलब्ध बफ रंगाचे बेसाल्ट आणि चुनखडी वापरून बांधले गेले होते; दरवाजाच्या गॉथिक कमानी आणि भव्य स्पायर क्लासिक गॉथिक डिझाइनला दाखवतात, ज्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध गॉथिक स्थापत्य वारसामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अल्टर, चॅन्सेल, मेन वेस्टिब्युल, लँडस्केपमधील वॉर मेमोरियल्स आणि ताबूतांमधील ध्वज देखील ऐतिहासिक घटनांची आठवण करून देतात आणि त्यामधील सखोल महत्त्वाला सादर करतात.
”चर्चच्या पास्टोरेट कमिटीमधील आम्हाला बायबल या चर्चचे तातडीने नूतनीकरण आणि दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याची सतत जाणीव होत होती. संरचनेचा आकार, अनेक वर्षांपासून चर्चची दूरावस्था, आवश्यक कामाची रक्कम आणि आमच्याकडे असलेला मर्यादित निधी यामुळे आम्ही अशक्य कार्याचा सामना करत होतो.
बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे ‘परमेश्वर त्याच्या काळात सर्वकाही सुंदर बनवतो’ (Ecc 3:1) आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर व प्रार्थनेनंतर परमेश्वराने वर्ल्ड मोन्युमेंट्स फंड इंडिया असोसिएशनच्या माध्यमातून आशेचा किरण जागृत केला. या संस्थेने सिटी इंडियाकडून (Citi India) निधीसाह्य मिळवून दिले, हेरिटेज जीर्णोद्धार व्यावसायिकांची एक अत्यंत कुशल टीम गुंतवून या भव्य चर्चला त्याच्या पूर्वीच्या वैभवात यशस्वीरित्या जीर्णोद्धार करण्याास सक्षम केले,” असे अफगाण चर्च पास्टोरेट कमिटीने सांगितले.
वर्ल्ड मोन्युमेंट्स फंड इंडियाच्या कार्यकारी संचालक अमिता बेग म्हणाल्या, ”अफगाण चर्चचा जीर्णोद्धार या सुरूवातीच्या गॉथिक इमारतीच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी तज्ञ आणि हेरिटेज प्रेमींच्या तीस वर्षांहून अधिक वर्षांच्या संशोधनाला सार्थ ठरवतो. या चर्चचा जीर्णोद्धार अत्यंत समाधानकारक आहे आणि आशा आहे की, अफगाण चर्चला मुंबई शहराच्या हेरिटेज नकाशात त्याचे योग्य स्थान पुन्हा मिळेल. गेल्या दोन वर्षांत चर्च सेवांमध्ये व्यत्यय न आणता जीर्णोद्धार प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला, जे अत्यंत उल्लेखनीय आहे. आम्ही या प्रकल्पासाठी अविरत पाठिंबा दिलेल्या सिटीचे मनापासून आभार व्यक्त करतो.”
जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि वर्ल्ड मोन्युमेंट्स फंड इंडियाच्या बोर्ड सदस्य श्रीमती संगीता जिंदाल म्हणाल्या, ”अफगाण चर्च हे भारताच्या चर्चच्या वास्तुकलेतील एक उल्लेखनीय रत्न आहे, जे बॉम्बे हार्बरमध्ये प्रवेश करणाऱ्या जहाजांसाठी मार्गदर्शक दिवा म्हणून काम करत आहे. ग्रेड I ची स्थिती असूनही वारसा स्थळ, सरकारी किंवा विशेष अनुदान मिळवणे त्याच्या धार्मिक स्वरूपामुळे आव्हानात्मक ठरले. वर्ल्ड मोन्युमेंट्स फंडच्या हस्तक्षेपामुळे या चर्चच्या ऐतिहासिक महत्त्वाचे जतन करत जीर्णोद्धाराचे प्रयत्न सुरू आहेत. अफगाण चर्चच्या वास्तूकलेच्या सर्वोत्तम बाबींना ओळखणे आणि एक मार्मिक युद्ध स्मारक म्हणून राष्ट्रीय स्तरावर त्याची भूमिका महत्त्वाची आहे. या जीर्णोद्धार प्रकल्पामुळे भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यात नवीन स्वारस्य निर्माण झाले आहे. मला विश्वास आहे की, नव्याने जीर्णोद्धार करण्यात आलेले हे चर्च मुंबईतील वैविध्यपूर्ण सामाजिक लँडमार्क म्हणून आपला दर्जा पुन्हा प्राप्त करेल.”