~ ब्लड स्टेम सेल आणि बोन मॅरो दानाविषयी वाढलेल्या जागरुकतेचा ब्लड कॅन्सर व जनुकीय दोषांचा सामान करणाऱ्या रुग्णांचे प्राण वाचविण्यामध्ये योगदान ~
~ फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने बीएमटी प्रोग्राम सुरू केल्यापासून १२ ते ७० वर्षे वयोगटातील रुग्णांवर यशस्वीरित्या पार पाडल्या १०० हून अधिक बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट (बीएमटी) शस्त्रक्रिया ~
मुंबई, : फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने १०० बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट्स (बीएमटी) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडत वैद्यकीय इतिहासामध्ये एक लक्षणीय यश प्राप्त केले आहे. हे यश म्हणजे रक्तविकाराशी झुंजणाऱ्या रुग्णांसाठीच्या आशा, चिकाटी व परिवर्तनकारी देखभलीच्या एका विलक्षण वाटचालीमधील एक मैलाचा टप्पा आहे.
भारतात बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट (बीएमटी) चे प्रमाण हळुहळू वाढत आहे व इथे दरवर्षी सुमारे २,५०० ट्रान्सप्लान्ट्स पार पडतात हे खरे असले तरीही हा आकडा अशा प्रत्यारोपणांच्या देशातील प्रत्यक्ष गरजेच्या केवळ १० टक्के इतकाच आहे. याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, ज्यात उपचारांच्या पर्यायांविषयी माहितीचा अभाव, मर्यादित उपलब्धता, खर्च आणि वेळच्यावेळी निदान न होणे या कारणांचा समावेश होतो. या आव्हानांना पार करण्यासाठी आणि उपचारांच्या उपलब्धतेतील दरी भरून काढण्यासाठी फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथे इन्स्टिट्यूट ऑफ ब्लड डिसॉर्डर्सची स्थापना करण्यात आली आहे.
फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील हेमॅटोलॉजी, हेमॅटो–ऑन्कोलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट (बीएमटी) विभागाचे डिरेक्टर डॉ. शुभप्रकाश सन्याल यांनी डॉ. हमझा दलाल, कन्सल्टन्ट – हेमॅटोलॉजी अँड बीएमटी, डॉ. अलिशा केरकर, असोसिएट कन्सल्टन्ट – ट्रान्स्फ्युजन मेडिसीन, डॉ. कीर्ती सबनीस, कन्सल्टन्ट– इन्फेक्शियस डिजिज, डॉ. ललित धनतोले, प्रमुख – ट्रान्स्फ्युजन मेडिसीन व अन्य सदस्यांचा समावेश असलेल्या आपल्या प्रतिष्ठित पथकाच्या साथीने मल्टिपल मायेलोमा, ल्युकेमिया, मायेलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम, मायलोफायब्रोसिस, एप्लास्टिक अनिमिया इत्यादी रक्तविकारांच्या रुग्णांवर सलग यशस्वीपणे पार पाडलेल्या बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट शस्त्रक्रियांचे नेतृत्व केले
बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट प्रक्रिया ही एक गुंतागुंतीची आणि जिकिरीचाी शस्त्रक्रिया आहे, ज्यात रोगग्रस्त किंवा अकार्यक्षम बोन मॅरो बदलण्यासाठी रुग्णाच्या शरीरामध्ये रक्त तयार करणाऱ्या निरोगी स्टेम सेल्सचे आरोपण केले जाते.
सात महिन्यांच्या कालावधीमध्ये हॉस्पिटलमधील टीमने विविध स्वरूपाच्या बोन मॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडल्या, ज्यात हॅपलोआयडेंटिकल (अर्ध्या प्रमाणात जुळणारे) ट्रान्सप्लान्ट पासून ते नात्याबाहेरच्या दात्यांद्वारे प्राप्त बोन मॅरो प्रत्यारोपणापर्यंत विविध प्रकारांचा समावेश होता. यासाठी प्रत्येक रुग्णाच्या व्यक्तिगत गरजांबरहुकुम बेतलेल्या वैद्यकीय व्यवस्थापन तंत्रांचा, विशेषत: वयोवृद्वाध रुग्पणांसाठी वापर करण्यात आला. यात कमी तीव्रतेच्या कर्करोग उपचारांचा वापर करणारी रिड्युस्ड इंटेन्सिटी कन्डिशनिंग पद्धती तसेच अचूक स्टेम सेल प्राप्त करणे अशा तंत्रांचाृ समावेश होता. जास्तीत जास्त प्रत्यारोपणे यशस्वी व्हावीत आणि गुंतागुंती उद्भवण्याचा धोका कमीत कमी असावा हा या तंत्रांच्या वापरामागचा हेतू होता.
संपूर्ण प्रत्यारोपण प्रक्रियेदरम्यान फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील समर्पित टीमने रूग्णांना सर्वसमावेशक पाठिंबा व केअर प्रदान केले, तसेच उपचाराच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या गरजांची पूर्तता केली. हॉस्पिटलचा बहुशिस्तबद्ध दृष्टिकोन, एकीकृत पेडिएट्रिक व गेरिएट्रिक केअर, प्रगत प्रत्यारोपण प्रक्रिया आणि हेमॅटोपॅथोलॉजीमधील कौशल्य यांनी सर्व बीएमटी रूग्णांना सर्वांगीण व गुणकारी उपचार अनुभवाची खात्री दिली.
फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील हेमॅटोलॉजी, हेमॅटो-ऑन्कोली आणि बोन मॅरो ट्रान्सप्लाण्ट (बीएमटी) चे संचालक डॉ. शुभप्रकाश सन्याल यांनी भारतासह केनिया, टान्झनिया व बांग्लादेश यासारख्या देशांमधील रूग्णांचा उपचार करण्यामधील हॉस्पिटलची व्यापक पोहोच निदर्शनास आणली. त्यांनी बीएमटीच्या आवश्यकतेबाबत जागरूकतेच्या अभावामुळे निर्माण झालेल्या आव्हानावर भर दिला, ज्यामुळे तज्ञांसोबत सल्लामसलत करण्याला विलंब झाला. डॉ. सन्याल यांचे प्रयत्न, तसेच रक्तांच्या विकारांबाबत जागरूकता उपक्रमांनी उपचारामधील तफावत दूर करण्यामध्ये आणि रक्तातील विकारांपासून पीडित अधिकाधिक रूग्णांपर्यंत ही सेवा पोहोचण्यामध्ये योगदान दिले.
बीएमटी प्रक्रियांमधील अलिकडील सुधारणांनी उपचारामध्ये आमूलाग्र बदल केला आहे, निष्पत्ती सुधारल्या आहेत आणि प्रतिकूल परिणाम कमी झाले आहेत. डॉ. सन्याल यांनी अत्याधुनिक इम्यूनोथेरपी सीएआर टी-सेल थेरपीचे महत्त्व निदर्शनास आणले. ही थेरपी आनुवंशिकरित्या कर्करोगाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवते, तसेच अग्रेसिव्ह लिम्फोमास, ल्यूकेमिया व मल्टीपल मायलोमा असलेल्या रूग्णांसाठी वैयक्तिकृत आणि लक्ष्यित उपाय देते.
फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. विशाल बेरी यांनी ब्लड कॅन्सर्स आणि वेळेवर उपचाराच्या महत्त्वाबाबत जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की ब्लड कॅन्सरच्या लवकर निदानामुळे व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता वाढते, तसेच त्यांनी इतर उपचार पर्यायांमधून निष्पत्ती न मिळालेल्या रूग्णांना आशेचा किरण दाखवणाऱ्या बीएमटीच्या परिवर्तनात्मक प्रभावाला निदर्शनास आणले. प्रमाणित उपचार म्हणून सीएआर टी-सेल थेरपीच्या सादरीकरणासह डॉ. बेरी यांनी अग्रेसिव्ह लिम्फोमासचा सामना करण्यासाठी आधुनिक वैद्यकीय दृष्टिकोनांचा समावेश करण्यावर भर दिला, जेथे या उपचारपद्धतीने समकालीन औषधोपचारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती दाखवली आहे.
__