MUMBAI/ SANTOSH SAKPAL/ NHI NEWS
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित श्री शिवाजी मंदिर बुध्दिबळ स्पर्धेत मुलांमध्ये आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित लोबो फेरडीन, अहान कातरुका, यश टंडन, लोबो देटीन आणि मुलींमध्ये मनवा पारकर, सर्वा परेलकर, साईशा मुळे यांनी गटविजेतेपद पटकाविले. १३ वर्षाखालील मुलांमधील निर्णायक पाचव्या साखळी फेरीत लोबो फेरडीनने (४.५ गुण) अर्जुन पधारियाच्या राजाला शह देत प्रथम स्थानावर झेप घेतली. शर्मद गुरवने (३.५ गुण), द्वितीय, अर्जुन पधारियाने (३.५ गुण) तृतीय, मिहीर सोनावणेने (३.५ गुण) चौथा व अंशुमन समलने (३ गुण) पाचवा पुरस्कार जिंकला.
मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना मान्यतेने दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या स्पर्धेत ७ वर्षाखालील मुलांमध्ये लोबो डेटीनने (५ गुण) प्रथम, आर्शिव गोयलने (४ गुण) द्वितीय, कबीर पिंगेने (४ गुण) तृतीय, वेदांत चिदंबरमने (३ गुण) चौथा, प्रियांश जैनने (३ गुण) पाचवा आणि मुलींमध्ये मनवा पारकरने (३ गुण) प्रथम, स्वरा खटावकरने (१ गुण) द्वितीय, द्विरा मेहताने (१ गुण) तृतीय पुरस्कार मिळविला. ९ वर्षाखालील मुलांमध्ये अहान कतारुकाने (५ गुण) प्रथम, ओम गणूने (४.५ गुण) द्वितीय, ह्रीअन शाहने (४ गुण) तृतीय, समर्थ गोरेने ( (३ गुण) चौथा, आरिष गांधीने ( ३ गुण) पाचवा आणि मुलींमध्ये सर्वा परेलकरने ( ३.५ गुण) प्रथम, सनामरी जॉनपॉलने (३ गुण) द्वितीय, आराध्या पुरोने (२ गुण) तृतीय क्रमांक जिंकला. ११ वर्षाखालील मुलांच्या गटात यश टंडनने प्रथम (५ गुण), विआन कनावजेने (४ गुण) द्वितीय, अनय भांगरेने (३ गुण) तृतीय, अविष्कार कारेने ( ३ गुण) चौथा, आयुष भामटने (३ गुण) पाचवा आणि साईशा मुळेने (२ गुण) प्रथम व आद्या कश्यपने (२ गुण) द्वितीय क्रमांक मिळविला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंडळाचे कार्यकारी विश्वस्त बजरंग चव्हाण, विश्वस्त ज्ञानेश महाराव, राजेश नरे, बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.