मुंबई NHI NEWS
को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त आंतर सहकारी बँक क्रिकेट स्पर्धा १० व ११ फेब्रुवारी रोजी दादर-पूर्व येथील पुरंदर स्टेडीयमवर आयोजित करण्यात आली आहे. विजेतेपदासाठी नामवंत सहकारी बँकांच्या ३२ संघांमध्ये चुरस राहील. स्पर्धेचे उद्घाटन युनियनचे अध्यक्ष माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, ग्रेटर बॉम्बे को-ऑप. बँकेचे अध्यक्ष बलदोटा, युनियनचे सल्लागार माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे
आंतर सहकारी बँक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविण्यासाठी एनकेजीएसबी बँक, मुंबई बँक, सिटी को-ऑपरेटिव्ह बँक, हिंदुस्तान को-ऑपरेटिव्ह बँक, अपना सहकारी बँक, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक, ग्रेटर बॉम्बे को-ऑप. बँक, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक, म्युन्सिपल को-ऑपरेटिव्ह बँक, महाराष्ट्र मंत्रालय बँक, राजापूर सहकारी बँक, महानगर को-ऑपरेटिव्ह बँक आदी संघ पूर्ण तयारीनिशी स्पर्धेत उतरत आहेत. याप्रसंगी युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सेक्रेटरी नरेंद्र सावंत, कोषाध्यक्ष प्रमोद पार्टे, सहकोषाध्यक्ष जनार्दन मोरे, भार्गव धारगळकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, अमोल प्रभू, राजेश कांबळे, हासम धामस्कर, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरीश ठाकुर, अशोक नवले, धर्मराज मुंडे व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
*********************************************