संचलन व बँड स्पर्धेत डॉ. अँटोनियो डा सिल्वा हायस्कूल प्रथम
वाहतूक नियंत्रण शाखा मुंबई पोलीस आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह २०२४ अंतर्गत आंतर शालेय झोनल रस्ता सुरक्षा दल संचलन नुकतेच नायगाव पोलीस परेड ग्राउंड येथे उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.त्यामध्ये डॉ. अँटोनियो डा सिल्वा हायस्कूल-दादर पश्चिम शाळेला संचलन व बँड स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.श्री विवेक फणसळकर (भा.पो.से.) पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या शुभहस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती क्रिस्टाबेल डिसोझा शिक्षक व मुलांनी ट्रॉफी स्वीकारली. सदर संचलन संघाला व बँड संघाला क्रीडा शिक्षक व आर.एस.पी. वरिष्ठ वार्डन डॉ. ओमप्रकाश शिवराम जोशी व बँड मास्टर विजय आचारी यांचे तसेच माजी विध्यार्थ्यांचे मार्गदर्शन लाभले होते.