एसवन एक्स प्लस वर २० हजार रुपयांची सवलत सुरू
मुंबई : ओला इलेक्ट्रिकने आज देशभरात विविध सणांच्या निमित्ताने १५ हजार रुपये पर्यंतच्या ऑफर्सची घोषणा केली आहे. १५ जानेवारीपर्यंत असणाऱ्या या ऑफरमध्ये एस वन प्रो आणि एस वन एअर च्या खरेदीवर ६ हजार ९९९ पर्यंतची मोफत विस्तारित बॅटरी वॉरंटी, ३ हजार पर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि आकर्षक ऑफर्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, एस वन एक्स प्लस ८९ हजार ९९९ वर २० हजार रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध राहील. ग्राहकांना निवडक क्रेडिट कार्ड ईएमआय वर ५ हजार रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकतात. इतर फायनान्स ऑफर्समध्ये शून्य डाउन पेमेंट, नो-कॉस्ट ईएमआय, शून्य-प्रक्रिया शुल्क आणि ७.९९ टक्के इतके कमी व्याजदर यासारख्या इतर डील्सचा समावेश आहे.
ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच आपल्या स्कूटर पोर्टफोलिओचा पाच उत्पादनांमध्ये विस्तार केला आहे. एस वन प्रो (सेकंड जनरेशन) ची किंमत १ लाख ४७ हजार ९९९ आहे, तर एस वन एअर १ लाख १९ हजार ९९९ मध्ये उपलब्ध आहे. विविध प्राधान्यांसह रायडर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी याने एस वन एक्स हे तीन प्रकारांमध्ये मध्ये देखील सादर केले आहे.