मुंबई)NHI
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबईतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने श्री शिवाजी मंदिर चित्रकला स्पर्धा २१ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वा. आयोजित करण्यात आली आहे. शालेय इयत्ता ८ वी ते १० वी गट आणि ज्युनियर-सिनियर कॉलेजमधील विध्यार्थी-विध्यार्थिनीच्या एकूण दोन गटात विनाशुल्क प्रवेशाची चित्रकला स्पर्धा होणार आहे. राजर्षी शाहू सभागृह, श्री शिवाजी मंदिर, तिसरा मजला, दादर-पश्चिम, मुंबई-४०० ०२८ येथे ही स्पर्धा होईल.
श्री शिवाजी मंदिर चित्रकला स्पर्धेसाठी ‘शिवकाळातील व्यक्ती किंवा प्रसंग’ असा विषय आहे. स्पर्धा स्थळी संयोजकांनी दिलेल्या विषयानुसार चित्रकला पेपरवर दोन तासात चित्र काढून रंगविणे, अनिवार्य आहे. प्रथम येणाऱ्या १०० स्पर्धकांसाठी प्रवेश मर्यादित आहे. प्रत्येक गटातील पहिल्या २० विजेत्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुधीर सावंत यांनी दिली. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधितांनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी श्री शिवाजी मंदिर कार्यालय, न. चिं. केळकर मार्ग, दादर-पश्चिम, मुंबई-४०० ०२८ येथे १४ जानेवारीपर्यंत दररोज सायंकाळी ४.३० वा. ते ७.३० वा. संपर्क साधावा.
******************************