गेल्या अनेक दिवसांपासुन मराठी मनोरंजन विश्वात विविध सिनेमांना प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. २०२३ मध्ये वेड, वाळवी, बाईपण भारी देवा, आत्मपॅफ्लेट आणि नुकताच रिलीज झालेला झिम्मा 2 अशा सिनेमांनी प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं.
अशातच काल ८ डिसेंबरला एकदा येऊन तर बघा एकदा येऊन तर बघा हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. थिएटर कमी मिळूनही सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली असल्याचं दिसतंय. जाणून घ्या.
‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 90.69 लाख रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनचे विभाजन खालीलप्रमाणे आहे:
मुंबई : रु.35.19 लाख
मराठवाडा : रु.09.47 लाख.
संपूर्ण महाराष्ट्र : रु. ४६.०३ लाख