मुंबई, 19 नोव्हेंबर: सहाव्या सीडेड दर्श शेट्टीने (एलो 1599) पेडर रोड येथील रशियन सेंटर फॉर सायन्स अँड कल्चर येथे सुरू असलेल्या 360 वन वेल्थ ग्रँड प्रिक्स फिडे रेटिंग बुद्धिबळ सिरीजच्या चौथ्या फेरीत अव्वल मानांकित पारस भोईरवर (एलो1875) सनसनाटी विजय मिळवला. हा अनपेक्षित विजयासह स्पर्धेत मोठी घडामोडी झाली असून शेट्टीने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली.
पारसच्या सिसिलियन ड्रॅगन सेटअपविरूद्ध दर्शने पांढर्या मोहर्यानिशी खेळताना युगोस्लाव्ह पद्धतीने सुरुवातीपासूनच आक्रमक दृष्टीकोन ठेवला. पारसने प्रति-हल्ला करण्याच्या प्रभावी चाली दाखवत खेळात समतोल राखला. मात्र, 29व्या चालीवर, पारसच्या एका चुकीमुळे दर्श याला प्रतिस्पर्ध्यांचा एक मोहरा मिळाला. त्यानंतर चाली-प्रतिचालीमध्ये दर्शने त्याच्या वजीराचा त्याग करून डावावरील पकड अधिक मजबूत केली. त्यानंतरच्या दर्शच्या चाली या त्याच्या तांत्रिक कौशल्याचे सर्वोत्तम उदाहरण होते. त्याच्या बळावर शेवटी 68 चालीवर पूर्ण गुण मिळवला.
ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी दर्श आणि पारस यांच्यातील डाव हा चौथ्या फेरीतील ‘सर्वोत्तम डाव’ घोषित केल्याने दर्शने दुहेरी आनंद अनुभवला.
दुसर्या पटावर अथर्व सोनीने काळ्या मोहर्यानिशी खेळताना दुसऱ्या सीडेड अरविंद अय्यरविरुद्ध बरोबरी साधली. अरविंदने विविध चाली रचताना प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला. पण, अथर्वने त्याच्या प्रत्येक चालीला जशास तसे उत्तर दिले. कोंडी फुटत नाही असे लक्षात येताच दोन्ही खेळाडूंनी 54 चालीनंतर बरोबरी मान्य केली.
दरम्यान, अर्णव कोळी, राम परब आणि गुरु प्रकाश यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत प्रत्येकी चार गुणांसह दर्शला आपल्यामध्ये सामील करून घेतले.
अरविंद अय्यर, अथर्व सोनी, दक्ष जागेशिया, वगीश स्वामीनाथन आणि स्वस्ती झा या पाचही खेळाडूंनी पहिल्या चार फेऱ्यांतून ३.५ गुण जमा करताना अव्वल स्थानी असलेल्या चौकडीसमोर आव्हान उभे केले आहे.
चौथ्या फेरीचे मुख्य निकाल: दर्श शेट्टी (4) विजयी वि. पारस भोईर (3), अय्यर अरविंद (3½) बरोबरी वि. सोनी अथर्व (3½), एलेश त्रिपाठी (३) पराभूत वि. अर्णव कोळी (४), राम परब (4) विजयी वि. मनियार हृदय (3),
रुचित आचार्य (3) पराभूत वि. गुरु प्रकाश (4),
जागेसिया दक्ष (3½) विजयी वि. शाह पूर्वान (3),
हितांश गोहिल (2½) पराभूत वगीश स्वामीनाथन (3½),
ओम मुर्डेश्वर (3) बरोबरी वि. सेजपाल काव्यान (3),