हितांश गोहिलने (एलो 1141) तब्बल 42 चालींमध्ये रंगलेल्या डावात आठव्या सीडेड दक्ष जागेसियाला (एलो1549) बरोबरीत रोखले
मुंबई, 18 नोव्हेंबर 2023: पेडर रोड येथील रशियन सेंटर फॉर सायन्स अँड कल्चर येथे सुरू झालेल्या 15 वर्षांखालील मुलांसाठीच्या 360 वन वेल्थ ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ सीरिजमध्ये तिसर्या फेरीत मानांकित (सीडेड) खेळाडूंना चांगलाच प्रतिकार झाला. उल्लेखनीय म्हणजे त्यातील चौघांना त्यांच्याहून कमी एलो रेटिंग असणार्या प्रतिस्पर्ध्यांनी बरोबरीत रोखले. त्यामुळे स्पर्धेतील रंगत वाढली आहे.
हा ट्रेंड हितांश गोहिलने (एलो 1141) सुरू केला. त्याने पांढर्या मोहर्यांनिशी खेळताना 42 चालींमध्ये रंगलेल्या डावात आठव्या सीडेड दक्ष जागेसिया (एलो1549) याला बरोबरीत रोखले.त्याच बरोबर, ओम मुर्डेश्वर याने (एलो1126) नवव्या मानांकित वगिश स्वामीनाथन याला (एलो 1394) याला काळ्या मोहर्यांनिशी बरोबरीत रोखून सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले.
अव्वल मानांकित पारस भोईरने अपेक्षेप्रमाणे चौथ्या फेरीत प्रवेश केला. त्याच्यामुळे आगेकूच केलेल्या खेळाडूंची संख्या दहावर गेली. तिसर्या फेरीचा अडथळा पार केलेल्या पारससह अरविंद अय्यर, अर्णव कोळी, राम परब, गुरू प्रकाश, दर्श शेट्टी, अथर्व सोनी, मेधांश पुजारी, हृदय मणियार, पूर्वान शाह आणि रुचित आचार्य यांच्या खात्यात प्रत्येकी 3 गुण आहेत. दक्ष जागेशिया, वगीश स्वामीनाथन, ओम मुर्डेश्वर, काव्यान सेजपाल, स्वस्ती झा, हितांश गोहिल आणि सारा मोदी यांच्यासह सात खेळाडूंनी 3 राउंडनंतर प्रत्येकी अडीच गुण मिळवले आहे.
तिसर्या फेरीतील मोहम्मद कुरेशीविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अर्णव कोळीला ’राउंड 3मधीला सर्वोत्कृष्ट गेम’साठीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
फिडे आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या संयुक्त विद्यमाने इंडियन चेस स्कूलने आयोजित अडीच लाख रुपयांची बक्षिसे असलेल्या ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ सीरिज स्पर्धेतील चार राउंड अद्याप शिल्लक आहेत.
तिसर्या फेरीतील काही प्रमुख निकाल:
पारस भोईर (3) विजयी वि. निर्वाण नीरव शहा (2)
आदित्य कदम (2) पराभूत वि. अरविंद अय्यर (3)
अर्णव कोळी (3) विजयी वि. मोहम्मद कुरेशी(2)
श्रवण अग्रवाल (2) पराभूत वि. राम परब (3)
गुरू प्रकाश (3) विजयी वि. त्वेश जैन (2)
हृदान शाह (2) पराभूत वि. दर्श शेट्टी (3)
अथर्व सोनी (3) विजयी वि. खनक पहारिया (2)
हितांश गोहिल (2.5) बरोबरी जागेशिया दक्ष (2.5 गुण)
वगीश स्वामीनाथन (2.5) बरोबरी ओम मुर्डेश्वर (2.5) .
मेधांश पुजारी (2) पराभूत एलेश त्रिपाठी (3)
हृदय मनियार (3) विजयी वि. आश्रिता गुट्टुला (2)
पुर्वान शाह (3) विजयी वि. अद्वित कांबळी (2)
बलराम श्रावण (2) पराभूत वि. रुचित आचार्य (3).