जे.सी.बी प्राईझ फॉर लिटरेचरने 2023 तेजस्विनी आपटे-रहमच्या ‘द सिक्रेट ऑफ मोर’ या पहिल्या कादंबरीला शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे
- 2023 च्या शॉर्टलिस्टमध्ये बंगाली, हिंदी आणि तमिळ भाषेतील तीन अनुवाद सामील
- तेजस्विनी आपटे-रहम यांचे पहिले पुस्तक आणि हंसदा सौवेंद्र शेखर यांचा पहिला अनुवाद या शॉर्टलिस्ट मध्ये सामील
- शॉर्टलिस्टच्या घोषणेनंतर दिव्या सेठ शहा आणि वामिक सैफी यांच्या पुस्तकांचे नाट्यमय वाचन झाले, आणि सारंगीवर दयाम अली आणि सितारवर पंडित हरिहर शरण भट्ट यांनी सुरेल सादरीकरण केले
जयपूर, 20 ऑक्टोबर: जयपूरच्या जय महल पॅलेसमध्ये जे.सी.बी प्राईझ फॉर लिटरेचरने 2023 या त्याच्या सहाव्या वर्षीच्या शॉर्टलिस्टची घोषणा केली आहे. नोव्हेंबरच्या पुरस्कार सोहळ्यापूर्वी झालेल्या या जीवाभावाच्या कार्यक्रमाला शहरातील लेखक, अनुवादक आणि पुस्तकप्रेमींचा समुदाय उपस्थित होता. बंगाली, हिंदी आणि तमिळ भाषेतील तीन अनुवादांसह ज्युरी सदस्य श्रीनाथ पेरुर, सोमक घोषाल आणि कावेरी नंबिसन यांनी पाच पुस्तकांची शॉर्टलिस्ट जाहीर केली.
जे.सी.बी प्राईझ हा भारतीय लेखकाच्या उत्कृष्ट कादंबरीला दरवर्षी दिला जाणारा रु. 25 लाखांचा पुरस्कार आहे. साहित्य संचालक भारतीय सामाजिक आणि बौद्धिक जीवनातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची ज्युरी दरवर्षी नेमतात. ज्युरीचा प्रत्येक सदस्य पुरस्कारासाठी प्रविष्ट केलेली प्रत्येक कादंबरी वाचतो आणि लाँगलिस्ट (दहाची), शॉर्टलिस्ट (पाचची) आणि विजेता निवडण्याची जबाबदारी त्यांची एकट्याचीच असते.
या घोषणेनंतर अभिनेत्री दिव्या सेठ शाह आणि कवी व संशोधक वामिक सैफी यांनी निवडलेल्या पुस्तकांचे वाचन केले. नाट्यमय वाचनाला सारंगीवर दयाम अली आणि सितारवर पंडित हरिहर शरण भट्ट यांच्या सुरेल सादरीकरणाची जोड देण्यात आली आणि प्रेक्षकांना भौगोलिक आणि काळामध्ये पसरलेल्या वैविध्यपूर्ण शॉर्टलिस्टची खऱ्या अर्थाने मजा घेता आली.
2023 च्या शॉर्टलिस्टमध्ये हे समाविष्ट आहे:
- तेजस्विनी आपटे-रहम लिखित द सिक्रेट ऑफ मोअर (अलेफ बुक कंपनी, 2022)
- मनोरंजन ब्यापारी लिखित द नेमेसिस, ज्याचा व्ही. रामास्वामी यांनी बंगालीभाषेतून अनुवाद केला आहे (वेस्टलँड बुक्स, 2023)
- पेरुमल मुरुगन लिखित फायर बर्ड, ज्याचा जननी कन्नन यांनी तमिळभाषेतून अनुवाद केला आहे (पेंग्विन रॅंडम हाऊस इंडिया, 2023)
- विक्रमजित राम लिखित मन्सूर (पॅन मॅकमिलन इंडिया, 2022)
- मनोज रूपदा लिखित आय नेम्ड माय सिस्टर सायलेन्स, ज्याचा हंसदा सौवेंद्र शेखर यांनी हिंदीभाषेतून अनुवाद केला आहे (वेस्टलँड बुक्स, 2023)
2023 च्या ज्युरीचे अध्यक्ष श्रीनाथ पेरूर यांनी शॉर्टलिस्टवर भाष्य करताना म्हटले आहे की, “आमच्या शॉर्टलिस्ट बैठकीत आम्ही दहा पुस्तकांच्या लाँगलिस्टमधून पाच पुस्तके वगळण्याचा निर्णय घेतला. लाँगलिस्टमधील प्रत्येक पुस्तक कमीतकमी एका ज्युरी सदस्यासाठी गंभीर शॉर्टलिस्ट उमेदवार होते, असे आम्हाला जाणवले. पण शेवटी आम्हा पाचही जणांना शॉर्टलिस्टमध्ये हवी असलेली नेमकी पाच पुस्तके सापडली. एकही पुस्तक वगळणे सोपे नव्हते आणि ज्या कोणीही तसे केलेले आहे, ते त्याने ज्युरीचे एकमत घेऊन केलेले आहे.”
विजेत्याची घोषणा करण्याची वेळ जवळ येत चालली आहे तसे साहित्य संचालिका मीता कपूर म्हणाल्या, ‘जे.सी.बी प्राईझ फॉर लिटरेचर 2023 च्या पाच पुस्तकांच्या शॉर्टलिस्ट मध्ये भारताच्या साहित्यिक (वाङ्मयीन) परिदृश्याचे कॅलिडोस्कोप सुंदररित्या टिपण्यात आलेले आहे. प्रत्येक कथेत शब्दांचे मनमोहक नृत्य पहायला मिळते आणि हे आपल्या समृद्ध वाङ्मयीन स्पंदनाचा पुरावा आहे. आमच्या प्रकाशक, पुस्तकांची दुकाने आणि ऑनलाइन समुदाय यांनी हा आवाज बुलंद करण्यात अनमोल हातभार लावलेला आहे. या पुस्तकांमध्ये खोल डोकावून पाहताना, आपल्याला आपल्या एकत्र मानवी प्रवासाची पडछाया आढळेल आणि प्रतिबिंबित होणाऱ्या अपरिमित भावना व किस्से सापडतील.
विजेत्याची घोषणा 18 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असून त्याला रु. 25 लाखांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. विजेती प्रवेशिका अनुवाद असेल, तर अनुवादकाला रु. 10 लाखांचे अतिरिक्त रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याखेरीज शॉर्टलिस्टमधील पाच लेखकांना प्रत्येकी रु. 1 लाख दिले जातील आणि शॉर्टलिस्ट केलेला लेख अनुवाद असेल, तर अनुवादकाला रु. 50,000 दिले जातील.
शॉर्टलिस्ट केलेली पुस्तके: ज्युरीच्या टिप्पण्या, पुस्तकाची रूपरेषा आणि लेखक व अनुवादक बायोस:
तेजस्विनी आपटे-रहम लिखित द सिक्रेट ऑफ मोअर (आलेफ बुक कंपनी)
ज्युरीचे म्हणणे आहे
मुंबई आणि तिथल्या व्यापाऱ्यांचा सामाजिक इतिहास मांडणाऱ्या कौटुंबिक गाथेत, इतक्या कल्पक, पण अचूक तपशीलात क्वचितच वर्णन केलेला विषय आहे. शतकाच्या अखेरीस मुळजी जेठा कापड बाजार, ध्वनी आगमनापूर्वी पहिल्या चित्रपटांच्या निर्मितीत प्रमुख पात्राचा निर्विवाद प्रवास, रंगभूमीवरील ओरिएंटल ऑर्गनचे वादन आणि प्रमुख पात्र आणि त्याच्या सिनेस्टार मधील न उलगडलेले नाते – हे सर्व शेवटचे पान वळल्यानंतर बराच काळ चमेलीच्या दरवळणाऱ्या सुगंधाप्रमाणे आपल्यासोबत राहते आणि आपण पुढच्या रहस्याचा विचारात जाता.
पुस्तकाची रूपरेषा
कापसाला सोन्यात रूपांतरित करणाऱ्या मुंबईच्या धडधडत्या हृदयात तात्या नावाचा एक तरुण उदरनिर्वाह करण्यासाठी येतो. तो खूपच महत्त्वाकांक्षी आणि मेहनती असतो आणि शहरातील प्रसिद्ध कापड बाजारात त्याचे नाव वाढू लागते. दरम्यान, त्याची नवीन वधू, राधा ही पारंपारिक आणि वेगाने आधुनिक होत असलेल्या जिज्ञासू व बऱ्याचदा विस्मयकारक मिश्रण असलेल्या शहरात कुटुंबाची काळजी घेण्यात आनंदी असते आणि त्याची आव्हाने पेलत असते.
वस्त्रोद्योगाच्या दुनियेत यश मिळालेल्या तात्यांना मोशन पिक्चर्स या उभरत्या उद्योगात संधी मिळते आणि आभाससृष्टीच्या या विचित्र दुनियेबद्दल सुरुवातीचा संकोच असून सुद्धा ते त्यात बुडून जातात. त्याचे यश न थांबणारे वाटते- त्यांनी तयार केलेले मूकपटांकडे खूप प्रमाणात लोकं आकर्षित होतात आणि त्यांचे नवे थिएटर एक नवलंच असतो, पण कमल नावाच्या अभिनेत्रीशी असलेली त्यांची मैत्री आणि आकर्षण यामुळे त्यांचे जग हादरून जाण्याची भीती वाटते आणि त्यांच्या प्रामाणिकपणावर मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतात.
गजबजलेल्या वसाहतवादी मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘द सिक्रेट ऑफ मोअर’ हा चित्रपट तात्या अधिक असण्याचे आणि अधिक बनण्याचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत असताना अखंड महत्त्वाकांक्षा, दृढ प्रेम आणि भयंकर विश्वासघाताचा प्रवास आहे. कापड गिरण्यांच्या कचाट्यापासून मूक चित्रपटसृष्टीच्या झगझगाटीपर्यंत, गिरगावच्या गजबजलेल्या चाळींपासून समुद्राकडे तोंड करून असलेल्या हवेलींच्या विलासापर्यंत प्रवास करणाऱ्या या कथेत एका माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला कळते की मुंबई शहरात आपल्याला उडता तर येईल – पण आपण पडलो ना, तर आपले खूप मोठे नुकसान होईल.
लेखक
तेजस्विनी आपटे-रहम या मुंबई मध्ये राहणाऱ्या लेखिका आहेत. त्यांनी द सर्कस दॅट स्वीप थ्रू द लँडस्केप या लघुकथा संग्रहाच्या लेखिका आहेत, आणि मुलांसाठी पर्यावरण शिक्षणाचे पुस्तक द पूप बुक च्या सहलेखिका आहेत! तेजस्विनी यांनी पत्रकार आणि पर्यावरण संशोधक म्हणून काम केले असून स्क्रीन, हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया आणि द एशियन एज यांच्यासाठी लेखन केले आहे.
मनोरंजन ब्यापारी लिखित द नेमेसिस, ज्याचा व्ही. रामास्वामी यांनी अनुवाद केला आहे (वेस्टलँड बुक्स)
ज्युरीचे म्हणणे आहे
द नेमेसिस ही पूर्व बंगाल (आताचा बांगलादेश) येथून स्थलांतरित होऊन आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह कलकत्ता येथील निर्वासितांच्या छावणीत स्थायिक झालेल्या लहान जिबोनची सशक्तपणे सांगितली जाणारी कथा आहे. अनिर्बंध दारिद्र्य, जुलमी जाती व्यवस्था आणि असंवेदनशील समाज लहान जिबोन वर अपमानाचा वर्षाव करतात. नक्षलवादी चळवळीत सामील होण्यासाठी तो घर सोडतो आणि त्याला अधिक अपमान सहन करावा लागतो, परंतु तरीही तो तक धरून राहतो. गंभीर प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाताना धैर्य आणि चिकाटीची ही एक वैयक्तिक, हृदयद्रावक कहाणी आहे जिच्या शेवटी आशा लागून राहते.
पुस्तकाची रूपरेषा
या विलक्षण त्रयीचा (ट्रायलॉजीचा) दुसरा भाग आपल्याला 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला घेऊन जातो जेव्हा पूर्व पाकिस्तानात मुक्तीच्या गरजना तीव्र झाल्या होत्या आणि निर्वासित भारतात आले होते आणि पश्चिम बंगालच्या छावण्यांमध्ये आश्रय मागितला होता. नक्षलवादी चळवळही जोर धरू लागली होती; कम्युनिस्ट पक्ष सीपीआय (एम) आणि सीपीआय (एमएल) मध्ये विभागला गेला आणि त्यांच्यात आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी काँग्रेस पक्षात सत्तेसाठीचा कडवा संघर्ष सुरू झाला. या रक्तरंजित लढाईत आपल्याला कलकत्त्यात एक साधारण वीस वर्षांचा जिबोन सापडलेला दिसतो, जो भूक, विषमता आणि भोळ्या, संक्रामक राष्ट्रवादाच्या भावनेने ग्रासलेला असतो. कादंबरीची ही ज्वलंत मशाल म्हणजे कलकत्त्याच्या गल्लीबोळ्यात फिरणाऱ्या, सतत नाकारल्या जाणाऱ्या आयुष्यावर ताबा मिळवू पाहणाऱ्या तरुणाचे आकर्षक चित्र आहे.
लेखक
मनोरंजन ब्यापारी बंगाली भाषेत लिहितात. छेरा छेरा जिबोन, इत्तिब्रिते चांडाल जिबोन आणि चांडाल जिबोन त्रयी ही त्यांची काही महत्त्वाची कामे आहेत. वयाच्या चोविसाव्या वर्षी तुरुंगात असताना त्यांनी स्वत:ला लिहायला-वाचायला शिकवले. त्यांनी रिक्षाचालक, सफाई कामगार आणि कुली म्हणून काम केले आहे. 2018 पर्यंत त्यांनी पश्चिम बंगालमधील हेलन केलर इन्स्टिट्यूट फॉर द डेफ अँड ब्लाइंड मध्ये स्वयंपाकी म्हणून काम केले. 2018 मध्ये त्यांच्या ‘इत्तिब्रिते चांडाल जिबोन‘ या आत्मचरित्राच्या इंग्रजी अनुवादाला अकल्पित कथे साठी (नॉन फिक्शनसाठी) हिंदू पारितोषिक मिळाले. 2019 मध्ये त्यांना गेटवे लिट फेस्ट रायटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांचा बटाशे बारुदेर गंध (हवेत गनपावडर आहे) या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद जे.सी.बी प्राईझ 2019, डी.एस.सी प्राईझ फॉर साऊथ एशियन लिटरेचर 2019, क्रॉसवर्ड प्राईझ 2019 आणि मातृभूमी बुक ऑफ द इयर प्राईझ 2020 यांच्यासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आला. त्यांच्या ‘छेरा छेरा जिबोन’ (इमान) या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद जे.सी.बी प्राईझ 2022 साठी शॉर्टलिस्ट करण्यात आला. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना यावर्षी शक्ती भट्ट प्राईझ सुद्धा मिळाले होते. 2021 मध्ये ब्यापारी हे बंगाल विधानसभेचे सदस्य झाले.
अनुवादक
व्ही. रामास्वामी हे समासातील आवाजांचे साहित्यिक अनुवादक आहेत. ‘द गोल्डन गांधी स्टॅच्यू फ्रॉम अमेरिका: अर्ली स्टोरीज, वाइल्ड ॲनिमल्स प्रोहीबीटेड: स्टोरीज, अँटी-स्टोरीज’ आणि धीद कुड हॅव बिकम रामायण चमार्स टेल्स: टू अँटी-नॉव्हेल्स (क्रॉसवर्ड बुक अवॉर्ड, 2019 साठी शॉर्टलिस्ट करण्यात आले होते) हे सर्व प्रस्थापना-विरोधी बंगाली लेखक सुबिमल मिश्रा यांचे यापूर्वीचे अनुवाद आहेत. चांडाल जिबोन कादंबऱ्यांचा अनुवाद करण्यासाठी त्यांना एबरिस्टविथ विद्यापीठात पहिली लिटरेचर अक्रॉस फ्रंटियर्स-चार्ल्स वॉलेस इंडिया ट्रस्ट फेलोशिप प्रदान करण्यात आली.
पेरुमल मुरुगन लिखित फायर बर्ड, ज्याचा जननी कन्नन यांनी अनुवाद केला आहे (पेंग्विन रॅंडम हाऊस इंडिया, 2023)
ज्युरीचे म्हणणे आहे
गेल्या किमान काही हजार वर्षांपासून माणूस पृथ्वीच्या अशा जागेची अपेक्षा करत आहे जिथे त्याला मुळे रोवायची आहेत. फायर बर्डचे प्रमुख पात्र मुथू हा शेतकरी कुटुंबातील आहे. जमिनीचे अन्यायकारक विभाजन आणि घरातील बिघडलेले संबंध यामुळे तो खरेदी करू शकेल आणि स्वत:ची म्हणू शकेल अशी जमीन एका वृद्ध, जाणकार नोकरासह बैलगाडीतून शोधण्यासाठी निघतो. पेरुमल मुरुगन या शोधाची कहाणी आश्चर्यकारकरीत्या बारीक तपशीलवारपणे सांगतात: त्यांना प्रत्येक वनस्पती आणि झाड, पक्षी आणि प्राणी, माती आणि ऋतू माहित आहेत. आणि त्या तिथे स्थायिक झालेल्या लोकांच्या संस्कृतीला आणि प्रवृत्तींना कसे आकार देतात हे त्यात आहे. जननी कन्ननच्या अनुवादात तमिळभाषेतील लय नम्रतेने आणि संवेदनशीलतेने इंग्रजीत दाखविली आहे. फायर बर्ड एका जुन्या, सार्वत्रिक कथेचे रूप घेते आणि त्याला खोलवर स्थानिक बनवते. हे एक फसवे सोपे पुस्तक आहे जे आपल्या काही खोल आवेगांबद्दल प्रश्न विचारते.
पुस्तकाची रूपरेषा
फायर बर्ड ही कौशल्याने रचलेली कथा आहे ज्यात एका माणसाचा स्थायित्वाच्या मायावी संकल्पनेचा शोध दाखविण्यात आलेला आहे.
जेव्हा मुथूचे वडील कौटुंबिक जमिनीचे विभाजन करतात तेव्हा मुथूचे जग उलटे होते, त्याच्याकडे व्यावहारिकरित्या काहीही शिल्लक राहत नाही आणि त्याच्या कुटुंबाच्या बंधनांचे असे नुकसान होते जे कधीही भरून काढता येणार नाही. एकेकाळी आदरणीय ठरलेला त्याचा मोठा भाऊ बेईमान कृत्ये करतो आणि म्हणून मुथूला एकेकाळी परिपूर्ण असलेले जग मागे टाकावे लागते आणि स्वत:साठी, पत्नीसाठी आणि मुलांसाठी नवीन जगाच्या शोधात निघावे लागते.
या अलौकिक कादंबरीत पेरुमल मुरुगन स्थलांतर आणि मार्गक्रमण यांच्या बाबतीत त्याला भोगाव्या लागणाऱ्या अनुभवांतून शिकतात आणि शाश्वततेबद्दलच्या आपल्या मूलभूत आकर्षणाची नाजूकता आणि ती प्राप्त करण्याच्या आपल्या अंततः निरर्थक प्रयत्नांचा शोध घेतात. तमिळ भाषेत एका गूढ पक्ष्याला अनुलक्षून असून जवळजवळ अनुवाद करता न येणाऱ्या अलंदापाची, या पुस्तकातून अनुवादित केलेला आहे आणि या पाठलागाच्या मोहमयी आणि स्थलांतरण करण्याच्या स्वरूपाचे उत्तम चित्रण नामधारी पक्ष्याने केलेले आहे. फायर बर्ड हा सतत बदलत राहणाऱ्या जगात मानवाने स्थैर्यासाठी इच्छा बाळगणे, यावर विचार करायला लावणारा आणि सुंदररित्या लिहिलेला शोधप्रवास आहे.
लेखक
पेरुमल मुरुगन हे तमिळ मध्ये लिहिणारे एक भारतीय लेखक, अभ्यासक आणि साहित्यिक इतिवृत्त लिहिणारे आहेत. त्यांनी बारा कादंबऱ्या, सहा लघुकथासंग्रह, सहा काव्यसंग्रह आणि अनेक अकल्पित कथांची (नॉन फिक्शन) पुस्तके लिहिली आहेत. 2005 मध्ये किरियामा प्राईझ साठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या सीझन्स ऑफ द पाम, करंट शो, वन पार्ट वुमन, अ लोनली हार्वेस्ट, ट्रेल बाय सायलेन्स, पूनाची किंवा द स्टोरी ऑफ अ गोट, रिझोल्व्ह, एस्च्युअरी, रायझिंग हिट, पायर, या त्यांच्या दहा कादंबऱ्यांचा इंग्रजीत अनुवाद करण्यात आलेला आहे. ते सालेम अत्तूर आणि नमक्कल येथील शासकीय कला महाविद्यालयात तमिळचे प्राध्यापक होते.
अनुवादक
जननी कन्नन या यू.एस स्थित वास्तुविशारद, अनुवादक, गायिका आणि मॅरेथॉन धावपटू (रनर)आहेत. त्या आवडीने तमिळ कादंबऱ्यांचा आणि लघुकथांचा अनुवाद करतात आणि अलीकडेच पेरुमल मुरुगन यांच्या रायझिंग हीट या पहिल्या कादंबरीचा अनुवाद केलेला आहे. तमिळ संस्कृतीतील किस्से, पाककृती आणि स्थापत्य साहित्य गोळा करणे आणि त्यांचे इतिवृत्त करणे देखील त्यांच्या आवडींमध्ये सामील आहे.
विक्रमजित राम लिखित मन्सूर (पॅन मॅकमिलन इंडिया)
ज्युरीचे म्हणणे आहे
विक्रमजित राम यांची नाजूक, पण प्रगल्भ, कादंबरी आपल्याला 17व्या शतकातील मुघल संस्कृतीत घेऊन जाते, जिथे नामवंत मास्टर आर्टिस्ट मन्सूरला काश्मीर येथील शाही उन्हाळी रिट्रीट मध्ये वेळेत पोहोचायचे असल्याने तो एक उत्कृष्ट, प्रकाशमान पुस्तक संपवत आहे. पण उत्तरेकडील त्याचा लांबचा प्रवास महिलांच्या वर्तुळात कारस्थानांनी भरलेला आहे जी मन्सूरच्या प्रतिस्पर्ध्यांच्या विकृत महत्त्वाकांक्षेमुळे करण्यात आलेली आहेत. एखाद्या सुंदर लघुचित्राप्रमाणे राम यांची कादंबरी आपल्याला तपशीलांकडे, विशेषत: झालरीत लपलेल्या विक्षिप्त पात्रांकडे बारकाईने लक्ष देण्यास भाग पाडते. मन्सूर हा कमीत कमी कथा कथनाचा विजय आहे आणि प्रत्येक वाक्य रत्नासारख्या स्पष्टतेने चमकत आहे.
पुस्तकाची रूपरेषा
शनिवार, 27 फेब्रुवारी 1627. मास्टर आर्टिस्ट मन्सूर, जो मुघल बादशहा जहांगीरच्या संरक्षणाखाली काम करतो, याला डोडोचे चित्र संपवून काश्मीरच्या प्रवासाची तयारी करायची असते. तेव्हा त्याला बिचित्र नावाचा एक तरुण सहकारी अडवतो. साम्राज्याचे कलागृह, ग्रंथालय आणि महिलांच्या वर्तुळातील अधिक पात्रे गुप्तता, अर्धसत्य आणि क्षुल्लक प्रतिस्पर्ध्यांच्या जाळ्यात ओढली जात असताना या पाहुण्याने – आधी मन्सूर आणि थोड्या वेळाने चित्रकार अबुल हसन – यांच्या बाबतीत केलेल्या एका निरागस विधानाचे त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतात.
मन्सूर ने उजळवून टाकलेली आणि निर्जीव फुलपाखरांनी भरलेली पाने असलेले एक रत्नासारखे पद्यग्रंथ या कथेच्या केंद्रस्थानी आहे. काश्मीरमधील शाही उन्हाळी रिट्रीट वेरीनागला पोहोचल्यावर चित्रकाराने हे पुस्तक त्याच्या लेखिका सम्राज्ञी नूरजहाँ ला अर्पण करायचे असते. तिने तिच्या पती, सम्राट जहांगीर यांच्यासाठी एक आठवण म्हणून या पुस्तकाचा राजादेश दिलेला असतो.
या पुस्तकाचे अस्तित्वंच आता लपून राहिलेले नाही आणि त्यासोबत इतकी मौल्यवान कलाकृती चुकीच्या हातात पडेल या भीतीसह पुस्तकबांधणीच्या कारखान्यातून पुस्तक मन्सूरपर्यंत पोहोचण्यास उशीर होतो आणि त्यामुळे त्याच्या धास्तीत भर पडते. चित्रकाराने आपली कलाकृती वेरीनागपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्यापूर्वी त्याला कशाचा सामना करावयाचा असतो?
लेखक
विक्रमजित राम हे बेंगळुरू येथील कादंबरीकार आणि अकल्पित कथा (नॉन फिक्शन) लेखक आहेत. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन कडून पदवी मिळवलेली आहे आणि ते पूर्वी ग्राफिक डिझाइनर म्हणून प्रॅक्टिस करत असत. त्यांनी भारतीय हत्तीचा सांस्कृतिक इतिहास, ‘एलिफंट किंगडम : स्कल्पचर्स फ्रॉम इंडियन आर्किटेक्चर’; ‘ड्रीमिंग विष्णूज : अ जर्नी थ्रू सेंट्रल इंडिया’ आणि ‘त्सो अँड ला : अ जर्नी इन लडाख’ ही दोन प्रवासवर्णने; आणि एक कादंबरी, ‘द सन अँड टू सीज’ असे लेखन केलेले आहे.
मनोज रूपदा लिखित आय नेम्ड माय सिस्टर सायलेन्स, ज्याचा हंसदा सौवेंद्र शेखर यांनी हिंदीभाषेतून अनुवाद केला आहे (वेस्टलँड बुक्स)
ज्युरीचे म्हणणे आहे
ही अतिशय सुंदरतेने आणि संक्षिप्ततेने सांगितली जाणारी महाकाव्यात्मक दर्जाची कादंबरी असून तिची ताकद हंसदा सौवेंद्र शेखर यांच्या अनुवादात प्रकर्षाने जाणवते. साउंडस्केप्स आणि लँडस्केप्स यांचा तितक्याच सहजतेने उपयोग करून कथाकथन करणारी समृद्ध प्रतिमा या लेखनात आहे. भव्य हत्ती असो, जहाज असो किंवा भ्रष्ट समाजाने खाऊन टाकलेली संपूर्ण आदिवासी संस्कृती असो, सर्व काही शेवटी नष्ट होते, हे विषयसूत्र मनोज रुपदा यांनी वापरले आहे. प्रमुख पात्र आणि त्याची बहीण यांच्यातील गुंतागुंतीचे आणि भावनिक दृष्ट्या थरकाप उडवणारे नाते याच्या केंद्रस्थानी आहे, ज्यामुळे भावंडांच्या नात्यांविषयीच्या अनेक कादंबऱ्यांपैकी ही कदाचित सर्वात थर रचलेली कादंबरी आहे.
पुस्तकाची रूपरेषा
हे खरोखरंच आपल्या इतिहासातील काळ्या अध्यायांबद्दल आहे, एखादी छोटी बातमी किंवा मतसंबंधी लेख वाचताना आपल्याला थोडक्यात सहानुभूती वाटेल किंवा वाटणार नाही, अशा ठिकाणांबद्दल आणि लोकांबद्दल आहे.
कुठल्याही सोयी-सुविधा नसलेल्या, पर्यटन सुद्धा करता न येणाऱ्या वनाच्छादित जमिनी वगळल्या, तर या ठिकाणांना आपल्यासाठी अजिबात अनुनाद नाही. लोकांबद्दल बोलायचे झाले, तर आधुनिकता उपलब्ध होऊ नये असे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांकडून त्यांची दिशाभूल केली जाते, असे आमचे मत आहे.
कादंबरीचे केंद्र वेगळीकडेच आहे हे दिसत असले तरी बिल्डुंगस्रोमन या शैलीत बसतो, मोठा होऊन गाव सोडतो (त्याला शिक्षण मिळण्याची खात्री करून घेणाऱ्या बहिणीच्या आग्रहाखातर) आणि इंजिनिअर बनतो आणि मग जागतिक मंदीच्या काळात (अलंग बंदर, गुजरात वर) त्याचे मोठे मालवाहू जहाज रद्द होईपर्यंत मोठ्या लाटांवर (उंच समुद्रात) प्रवास करतो. पण ही कादंबरी त्याला घेऊन गावी परत जाते जेव्हा तो प्रतिकूल वातावरणात त्याला वाढविणाऱ्या बहिणीचा शोध घेत असतो. आपली बहीण काय करत होती, ती दादा लॉगमध्ये (नक्षलवादीना) का सामील झाली, ती कुठे आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न आणि शेवटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असताना गावी परतणे महत्त्वाचे आहे.
या पुस्तकात अनेक मनोरंजक पात्रे आहेत आणि इतकी छोटी व इतकी लक्ष केंद्रित करणारी असून एखाद्यासाठी एक मग्न करणारी वाटचाल आहे. याची सुरुवात कथाकाराच्या अशा म्हणण्यापासून होते की, त्याला ज्या मोठ्या गोष्टीत रस आहे – आणि त्याला ज्या मोठ्या गोष्टींचे आकर्षण आहे – तो लहान असताना त्याने पाठलाग केलेल्या हत्तीचा जसा हिंसक, अकाली अंत झाला होता, त्याच पद्धतीने त्यासर्व गोष्टी संपतात.
लेखक
मनोज रुपडा हे नागपूर (महाराष्ट्र) येथील रहिवासी असून ते हिंदीत लिहितात. ‘काळे अध्याय ‘ (ज्याचे आय नेम्ड माय सिस्टर सायलेन्स, अनुवाद आहे) आणि प्रतिसंसार; कथासंग्रह, दफन तथा अन्य कहानियां, साज नासाज, आमाजगाह, टॉवर ऑफ सायलेन्स, दहन आणि दस कहानियां या कादंबऱ्या; आणि ‘कला का आस्वाद’ या निबंधांचे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. त्यांना इंदू शर्मा कथा पुरस्कार आणि वनमाळी कथा सन्मान मिळाला आहे.
अनुवादक
हंसदा सौवेंद्र शेखर इंग्रजीत लिहितात; आणि संताली, हिंदी आणि बंगाली भाषेतून इंग्रजीत अनुवाद करतात. ‘माय फादर्स गार्डन’ ही त्यांची कदंबरी 2019 च्या जे.सी.बी प्राईझसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आली. ‘आदिवासी विल नॉट डान्स‘ हा त्यांचा कथासंग्रह हिंदू प्राईझ साठी शॉर्टलिस्ट करण्यात आला; तर द मिस्टीरियस एलमेंट ऑफ रुपी बास्के या त्यांच्या पहिल्या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला, हिंदू प्राईझ आणि क्रॉसवर्ड बुक अवॉर्ड यांच्यासाठी त्याला शॉर्टलिस्ट करण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय डब्लिन लिटररी अवॉर्डसाठी त्याला लाँगलिस्ट करण्यात आले. ज्वाला कुमार अँड द गिफ्ट ऑफ फायर हे त्यांचे मुलांसाठीचे पुस्तक क्रॉसवर्ड बुक अवॉर्डसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले. फ्रंटलाइन, द कारावां, मिंट लाउंज, रीडर्स डायजेस्ट, द इंडियन क्वार्टरली, द हिंदू, द इंडियन एक्स्प्रेस, द न्यूयॉर्क टाइम्स, फिफ्टी टू आणि इतर ठिकाणी त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे; तर त्यांचे अनुवाद एसिम्प्टोट, पोएट्री ॲट संगम, द डलहौसी रिव्ह्यू आणि इतर ठिकाणी प्रकाशित झाले आहेत.
ज्युरी विषयी
श्रीनाथ पेरूर (अध्यक्ष) हे “इफ इट्स मंडे इट मस्ट बी मदुराई” हे प्रवासवर्णन लिहिलेले आहे. ‘घाचर घोचर’ (विवेक शानभाग लिखित) या कादंबरीचे आणि ‘द लाईफ ॲट प्ले’ (गिरीश कर्नाड लिखित) या कादंबरीचे त्यांनी कन्नड मधून भाषांतर केलेले आहे. विज्ञान, प्रवास आणि पुस्तकांसह वेगवेगळ्या विषयांवर ते लेखन करतात.
सोमक घोषाल यांनी प्रमुख भारतीय संस्थांबरोबर प्रकाशन आणि प्रसारमाध्यमांमध्ये, खासकरून समीक्षक आणि पुस्तक प्रकाशक म्हणून 15 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी काम केलेले आहे. मिंट, हफ्फपोस्ट, द टेलिग्राफ, ओपन, द हिंदू, द व्हॉईस ऑफ फॅशन, मेकाँग रिव्ह्यू, इंडेक्स ऑन सेन्सॉरशिप, सी.एन.एन स्टाईल आणि इतर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये त्यांचे काम पहायला मिळते. तरुण वाचकांसाठी त्यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत जी अनुक्रमे पेंग्विन रॅंडम हाऊस आणि प्रथम बुक्स यांनी प्रकाशित केली आहेत. सध्या ते एड-टेक संस्थेत ज्ञानसंपादन रचनाकार (लर्निंग डिझायनर) म्हणून काम करीत आहेत.
महेश दत्तानी हे नाटककार, रंगमंच दिग्दर्शक आणि विश्वासू व अनुभवी सल्लागार आहेत. नाटककार म्हणून त्यांच्या कार्याचे भारत आणि परदेशातील अनेक भाषांमध्ये भाषांतर आणि सादरीकरण केले गेले आहे.
फायनल सॉल्युशन्स या त्यांच्या साहित्यसंग्रहासाठी आणि इतर नाटकांसाठी, दत्तानी यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या बर्नार्ड कॉलेजसाठी टागोरांच्या ‘चोखेर बाली’ या कथेचे इंग्रजीतील रूपांतर, न्यू जर्सीतील आय.सी.एस थिएटरसाठी लॉर्काच्या ब्लड वेडिंगचे रूपांतर, स्नॅपशॉट्स ऑफ अ फर्विड सनराईज, जे त्यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले आहे, हे त्यांचे दिग्दर्शक म्हणून काम आहे.
नुकतेच त्यांनी न्यूयॉर्क मध्ये ‘धिस इज नॉट अ थिएटर कंपनी’ मध्ये ‘अ लिटिल ड्रेप ऑफ हेवन’ या ऑडिओ पीसचे लेखन आणि दिग्दर्शन करण्यासाठी काम केले, ज्याची न्यूयॉर्क टाइम्सने न्यूयॉर्कमध्ये लक्ष वेढी म्हणून पहिल्या पाच गोष्टींमध्ये निवड केली गेली होती. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेल्या चित्रपटात मॅंगो सॉफल (2000) आणि मॉर्निंग रागा (2003) यांचा समावेश आहे. रंगभूमीसाठी मार्गदर्शन आणि नवीन कामांची निर्मिती करण्यासाठी समर्पित एक गट प्लेपेन परफॉर्मिंग आर्ट्स ट्रस्टचे ते कलात्मक संचालक आहेत. ते मुंबईत राहतात.
कावेरी नांबिसन यांनी बालपुस्तकांपासून आपल्या लेखन कारकिर्दीची सुरुवात केली. द सेंट ऑफ पेपर, अ स्टोरी दॅट मस्ट नॉट बी टोल्ड आणि अ टाउन लाइक अवर्स त्यांच्या मोठ्यांसाठी लिहिलेल्या कादंबऱ्यांमध्ये सामील आहेत. अ लक्झरी कॉल्ड हेल्थ हे तिचे कथा कादंबरी नसलेले (नॉन-फिक्शन) पुस्तक हे त्यांनी अलीकडे लिहिलेले काम आहे. राष्ट्रीय वृत्तपत्रे आणि आंतरराष्ट्रीय साहित्यसंग्रहांनाही त्या लेख आणि निबंध देतात. आयोवा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय लेखन शिष्यवृत्तीवर (फेलोशिपवर) त्या गेल्या; पाकिस्तानला फुलब्राइट आणि आयोवा प्रायोजित साहित्य संमेलनाकरिता त्या गेल्या; त्यांचे दिवंगत पती आणि कवी विजय नांबिसन यांच्यासमवेत शांघाय येथे लेखिका म्हणून त्या गेल्या. कावेरी यांनी बंगळुरूच्या सेंट जॉन्स मेडिकल कॉलेजमधून औषधशास्त्रात (मेडिसिनमध्ये) पदवी घेतली, यू.के मध्ये उच्च शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण घेतले आणि लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची शिष्यवृत्ती (फेलोशिप) मिळविली. त्यानंतर त्यांनी बिहार, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू व कर्नाटकच्या काही भागांसह ग्रामीण भारतात सर्जन म्हणून काम करत आपली कारकीर्द घडविली आहे. कावेरी नांबिसन कोडागूमध्ये राहतात आणि तेथेच काम करतात.
स्वाती थियागराजन या भारतातील दूरचित्रवाणीसाठी संवर्धन आणि वन्यजीव वार्तांकनाचे नेतृत्व करणाऱ्या बहु-पुरस्कार विजेत्या संवर्धन पत्रकार आहेत. त्या एन.डी.टी.व्ही च्या माजी पर्यावरण संपादक आहेत आणि त्यांनी बॉर्न वाइल्ड या त्यांच्या पथदर्शी (फ्लॅगशिप) शोचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. त्यांनी बॉर्न वाइल्ड, जर्नीज इन द वाइल्ड हार्ट्स ऑफ इंडिया अँड आफ्रिका हे पुस्तक लिहिले आहे. त्या एक माहितीपट चित्रपट निर्माता (डॉक्युमेंटरी फिल्ममेकर) सुद्धा आहेत, त्यांचा द ॲनिमल कम्युनिकेटर या चित्रपटाने 2012 पासून यूट्यूबवर 8 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळविले आहेत आणि यू.एस व यू.के मधील ॲमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे. त्या अकादमी पुरस्कार विजेत्या माय ऑक्टोपस टीचर च्या सहयोगी निर्मात्या (असोसिएट प्रोड्यूसर) होत्या आणि सध्या केपटाऊनमधील सी चेंज प्रोजेक्टवर काम करीत आहेत.