मुंबई, : साक्षी मेडटेक अँड पॅनल्स लि.ने प्राथमिक समभाग विक्री योजना अर्थात आयपीओ सोमवारी, २५ सप्टेंबर रोजी दाखल करण्याची घोषणा केली आहे. हा आयपीओ २७ सप्टेंबर रोजी बंद होईल. कंपनीच्या शेअरची नोंदणी एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर केली जाणार आहे. या इश्यूसाठी हेम सिक्युरिटीज लि. ची बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.ची रजिस्ट्रार म्हणून निवड करण्यात आली आहे.
कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, आयपीओमधील शेअरसाठी ९२ रु. ते ९७ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओद्वारे (उच्च किंमतीनुसार) ४५.१६ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक लॉटमध्ये १२०० शेअर आहेत. ऑफरमध्ये एकूण ४६ लाख ५६ हजार शेअर्सचा समावेश आहे. पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs) २ लाख २९ हजार २०० शेअर्स राखीव आहेत, तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NIIs) सहा लाख ६३ हजार ६०० शेअर्स, किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी १५ लाख ४८ हजार शेअर्स (RIIs) आणि दोन लाख ३५ हजार २०० शेअर बड्या गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत.
कंपनीने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये प्रभावी कामगिरी केली असून, महसुलात वार्षिक ४२.८९ टक्के चक्रवाढ दराने (CAGR) वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीने ५९.७७ कोटी रुपये कमाई केली होती, ती आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १२२.०५ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. साक्षी मेडटेक अँड पॅनल्स लि.ने व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्व (EBITDA) १२२.०५ कोटी रुपये कमाई केली असून, करपूर्व २०.३४ कोटी रुपये नफा मिळवला आहे. करोत्तर नफा (PAT)१२.३८ कोटी रुपये आहे.
गुंतवणूकदार आणि भागधारकांनी कंपनीच्या कामाकाजाचे, उलाढालीचे पुनरावलोकन करून, आयपीओच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या गुंतवणुकीच्या चांगल्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात येत आहे. २५ सप्टेंबर रोजी दाखल होणाऱ्या आयपीओला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.