मुंबई, : अरेबियन पेट्रोलियमचा आयपीओ सब्स्क्रिप्शनसाठी २५ सप्टेंबर २०२३ रोजी खुला होणार असून २७ सप्टेंबर २०२३ रोजी बंद होईल. कंपनीने इश्यू किंमत प्रति शेयर ७० रुपये निश्चित केली असल्याचे कंपनीने जारी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे. हेम सिक्युरिटीज हे या इश्यूचे लीड मॅनेजर असून पूर्वा शेरजिस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे अधिकृत रजिस्ट्रार आहेत
आयपीओमधून २०.२४ कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असून प्रत्येक लॉटमध्ये २००० इक्विटी शेयर्स आहेत. ऑफरमध्ये एकूण २८९२००० इक्विटी शेयर्स आहेत आणि गुंतवणूकदारांच्या विविध विभागांसाठी त्यांचे विशिष्ट वाटप करण्यात आले आहे. यापैकी प्रत्येकी १३७२००० इक्विटी समभाग नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदार व रिटेल इंडिविज्युअल गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत तर उरलेले १४८००० इक्विटी समभाग हे मार्केट मेकर्ससाठी राखून ठेवण्यात आले आहेत. अरेबियन पेट्रोलियमचे शेयर्स एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचिबद्ध केले जातील.
अरेबियन पेट्रोलियम हे सर्व ल्युब्रिकंट्सच्या खरेदीचे वन-स्टॉप शॉप आहे. त्यांच्या उत्पादन प्लान्टची क्षमता दरवर्षी ४०५९० किलोलिटर आहे. कंपनीच्या विशाल वितरण नेटवर्कमध्ये ४०० डीलर्स व ९ डेपोंचा समावेश आहे. औद्योगिक व ऑटोमोबाईल कामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ल्युब्रिकंट्सची उत्पादक असलेली अरेबियन पेट्रोलियम ही भारतातील अशा मोजक्या उत्पादकांपैकी एक आहे ज्यांच्याकडे सर्वसमावेशक इन-हाऊस क्षमता आहेत, त्यामुळे ते उच्च दर्जाची उत्पादने तयार करू शकतात. लक्षणीय बाब म्हणजे कंपनीच्या ग्राहकांमध्ये सरकारी क्षेत्रातील भारतीय सेना दले, बीएचईएल, बीईएमएल, रेल्वे, बीईएल इत्यादींचा समावेश आहे.
या महत्त्वपूर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी अरेबियन पेट्रोलियमने गुंतवणूकदार व हितधारकांना आमंत्रित केले आहे. अधिक तपशीलवार माहितीसाठी कृपया कंपनीचे प्रॉस्पेक्टस वाचावे.