तुमच्या विश्व चषक स्पर्धेसाठीच्या उत्साहाला दणक्यात साजरे करण्यासाठी नेटक्या लहान आकारामध्ये अतुलनीय अशी ऑडिओ कामगिरी
भारत,१३ सप्टेंबर, २०२३: विश्व चषक स्पर्धा उंबरठ्यावर असताना, ध्वनी तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रातील एक उदयोन्मुख कंपनी गोवो (GoVo) नवीन गोवो गोसराऊंड ३५० साऊंडबार (GOVO GoSurround 350 Soundbar) बाजारात आणण्यासाठी उत्सुक आहे. क्रीडा क्षेत्रातील या जल्लोष व उत्साहाच्या काळात सर्व क्रिकेट प्रेमींसाठी एक अप्रतिम ऑडिओ अनुभव आणत त्यांना क्रिकेट सामन्यांच्या थरारामध्ये मंत्रमुग्ध करण्याच्या अनुभवात क्रांती आणण्यासाठी नावीन्यपूर्ण व कल्पकतेने डिझाईन केलेले हे ऑडिओ उपकरण सज्ज आहे. अतिशय नेटका असा आकार असूनही हा छोटा साऊंडबार त्याच्या अतुलनीय अशा गुणवत्तेने सर्वांना अचंबित करण्यास तयार आहे.
शिपमेंट वॉल्युमचा विचार केला तर, साल २०२३ मध्ये २९.१३ दशलक्ष यूनिटस एवढा आकार असलेल्या भारतीय उपभोक्ता स्पीकर बाजाराचा आकार साल २०२८ पर्यंत ५१.९३ दशलक्ष यूनिटसपर्यंत वाढण्याची शक्यता असून ते १२.२६% च्या सीएजीआर (CAGR) वर वाढणे अपेक्षित आहे. मनोरंजनासाठी इलेक्ट्रोनिक उपकरणांची वाढती मागणी आणि हे ट्रेंड यामुळे या कालावधीमध्ये वायरलेस स्पीकरची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. गोवो गोसराऊंड ३५० साऊंडबार (GOVO GoSurround 350 Soundbar) त्याच्या खास वैशिष्ठ्यांनी ध्वनी उपकरणांच्या बाजारात स्वतःला वेगळे सिद्ध करतो. त्याचे उच्च स्तरीय ध्वनी गुणवत्ता, अप्रतिम बास डिलिव्हरी आकर्षक डिझाईन आणि स्पर्धात्मक किंमत यामुळे हे आमच्या ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरते.
गोवो : गोसराऊंड ३५० साऊंडबार (GOVO GoSurround 350 Soundbar) बाजारात आणल्याबाबत बोलताना गोवो (GOVO) चे संस्थापक श्री. वरुण पोद्दार म्हणाले की, “क्रिकेट विश्व चषक स्पर्धेच्या निमित्ताने सगळे जग हर्षोल्ल्हासात एकत्र येत असताना कल्पकता आणि तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या नवीन गोवो गोसराऊंड ३५० साऊंडबार (GOVO GoSurround 350 Soundbar) चे अनावरण करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ग्राहकांचा ऑडिओ अनुभव जास्तीतजास्त समृद्ध करणे हेच आमचे कायम उद्दिष्ट राहिले आहे. दिवसेंदिवस क्रिकेटचे वेद वाढत असताना कट्टर क्रिकेटप्रेमींना एक अप्रतिम ऑडिओ अनुभव देऊन् त्यांना एकत्र आणणे हे आमचे ध्येय आहे.”
गोवो गोसराऊंड ३५० साऊंडबार (GOVO GoSurround 350 Soundbar) ची ठळक वैशिष्ठ्ये:
· भारावून टाकणारा थ्रीडी सराऊंड ध्वनी: गोवो गोसराऊंड ३५० साऊंडबार (GOVO GoSurround 350 Soundbar) हा पोर्टेबल स्पीकर ५२ एमएम ड्रायव्हर्सने समर्थित असून ते शक्तिशाली असे २५ वॅट आउटपुटसह घरामध्ये जणू एक सिनेमॅटिक ऑडिओ अनुभव देते.
· चैतन्यशील असे आरजीबी एलईडी लाइट्स (RGB LED Lights):
सुरेख, ग्लॉसी व उच्च दर्जाचे फिनिश असलेले आणि विविध रंगांमधील एलईडी लाइट्स या येत्या विश्व चषक सोहळ्यासाठी परिपूर्ण अशी वातावरण निर्मिती करतील.
· एच डी माइक:
एच डी माइकच्या सहाय्याने दुसऱ्या उपकरणांवर स्विच न होता व मध्येच न थांबता आलेला कॉल घेता येतो.
· एका पेक्षा जास्त कनेक्टिव्हिटी पर्याय:
हा साऊंडबार एयूएक्स (AUX), यूएसबी (USB) आणि टीएफ (TF) पोर्ट्सचा सहजतेने वापर करून उपकरणांच्या विस्तृत श्रेणीशी अखंड जुडलेले राहणे सहज व सुलभतेने शक्य करते.
· ब्ल्यू टूथ व्ही ५.३:
ब्ल्यू टूथने तुमच्या मोबाइलला ३० फूट अंतरापर्यंत न अडकता अखंड हे उपकरण जोडलेले राहू शकण्याचा आनंद घ्या.
· ड्यूएल पॅसिव्ह रेडिएटर्स:
या साऊंडबार मध्ये ड्यूएल पॅसिव्ह रेडिएटर्स असून ते शक्तिशाली बास फ्रिक्वेन्सी निर्माण करून खऱ्या अर्थाने भारावून टाकणारे व तल्लीन करणारे श्राव्य अनुभव देतात.
· दीर्घकाळ चालणारी बॅटरी:
गोवो गोसराऊंड ३५० साऊंडबार (GOVO GoSurround 350 Soundbar) मध्ये २०००एमएएच (mAh) बॅटरी आहे, जी जवळपास 8 तासांपर्यंत चालू राहते, त्यामुळे रिचार्ज करण्याची काळजी न करता विश्व चषक स्पर्धेचा आनंद घ्या.
गोवो गोसरॉऊंड ३५० साऊंडबार (GOVO GoSurround 350 Soundbar) ची किंमत रु.५,८९९ आहे. मात्र हा साऊंडबार अॅमेझॉनवर मर्यादित काळाकरिता खास प्रास्ताविक सवलत किंमत रू.१४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. संपूर्ण देशभरात रिटेल दुकानांमध्ये देखील हे उपलब्ध आहे. हे उत्पादन एक वर्षाच्या वॉरंटीसह असून ते प्लॅटिनम ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे.