MUMBAI/NHI
प्रसिद्ध कवी व गझलकार श्री. रविंद्र यशवंतराव यांचा बहुचर्चित “रानकुडा” व अमिता पैठणकर यांचा “तुझ्या सहीची डावी बाजू” या दोन काव्यसंग्रहांचे, सुस्मृती प्रतिष्ठान मुंबई तर्फे नुकतेच थाटा माटात प्रकाशन करण्यात आले “रानकुडा” चे प्रकाशक “भरारी प्रकाशन “मुंबई हे असून “श्रावणधारा राज्यस्तरीय कविसंमेलनात” रविवार दिनांक ३ रोजी अभ्युदयनगर मुंबई येथे श्री.अशोक बागवे सर, चंद्रकांतदादा वानखेडे, प्रख्यात अभिनेत्री अंजली वळसंगकर,गझलकार प्रशांतदादा वैद्य,सुस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.प्रतिकजी पाटील , सेक्रेटरी श्री.संतोषजी बच्चे यांच्या शुभ हस्ते “रानकुडा” व “तुझ्या सहीची डावी बाजू” या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले, त्याचबरोबर साहित्यिक, श्री अशोकजी बागवे सर यांना काव्यसिंधू पुरस्कार ,आदरणीय चंद्रकांतदादा यांना काव्यरत्न पुरस्कार , अभिनेत्री अंजली वळसंगकर यांना कलादर्पण पुरस्कार ,कवी श्री अन्वर मिर्झा यांना काव्ययात्री पुरस्कार, गझलकार श्री. प्रशांतदादा वैद्य यांना गझलयात्री पुरस्कार , कॅनेडियन पोलीस अधिकारी श्री. सत्यानंद गायतोंडे यांना कर्तव्यसिंधू पुरस्कार तसेच महिला पोलिस अधिकारी सौ रूपालीआळंदे यांना शारदा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.”रानकुडा” या पुस्तकाच्या उत्कृष्ट मुखपृष्ठकार म्हणून सौ सोनाली जगताप यांनाही मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, कविसंमेलनानंतर गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. काव्यसंमेलनाचे सुत्रसंचालन सौ पूजा काळे यांनीकेले व गझल मुशायऱ्याचे सुत्रसंचालन सौ शिल्पा परूळेकर-पै यांनी केले. अतिशय सुंदर शिस्तबद्ध असा हा सुस्मृती प्रतिष्ठान तर्फे नेत्रदीपक सुंदर सोहळा संपन्न झाला, सुस्मृती प्रतिष्ठतान च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुंदर नियोजन केले होते. प्रत्येक सारस्वताचे यथोचित स्वागत, गुलाबपुष्प, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, जेवण चहापान अशी सुंदर, व्यवस्था सुस्मृती प्रतिष्ठान तर्फे केली गेली होती. सुसज्ज हाॅल, देखणी रांगोळी व ते प्रसन्न वातावरण भारावून टाकणारे होते,
श्रावणधारा या कवी संमेलनाचे अध्यक्षपद श्री अशोक बागवे यांनी भूषविले व सन्माननीय कवी/कवयित्री, सतीश सोळांकूरकर ,हेमंत राजाराम, शिल्पा परुळेकर सुधाकर वसईकर , संजय गगे खरीडकर , शिवाजी गावडे , निर्मला शेवाळे ,कल्पना म्हापूसकर, कमळाकर राऊत,किशोरी पाटील, सचिन शिंदे, शैलजा करोडे, मोरेश्वर बगाडे,सुनील पाटील, वसंत निमसे,संदिप कांबळे,सीमा झुंजारराव,नंदा कोकाटे,राजेंद्र पाटील, किरण पाटील, जयदास खंडाळे, श्रीकांत शिंगटे ,राजश्री सावंत,संजय बने इत्यादींनी आपल्या कवितांचे सुंदर सादरीकरण केले तसेच कविसंमेलनानंतर
गझल मुशायऱ्याचे आयोजन केले गेले होते ,गझल मूषयऱ्याचे अध्यक्ष पद सन्माननीय गझलकार,प्रशांत वैद्य यांनी भूषविले तर सन्माननीय गझलकार,रविंद्र यशवंतराव(देशमुख) ,संदिप कळंभे ,प्रभाकर पवार,विनोद सावंत, संतोष शेळके,सागर राजे निंबाळकर, अमिता पैठणकर,पल्लवी उंबरे , विजय माळी ,प्रकाश फर्डे,बंडू अंधेरे,जयराम कराळे ईत्यादींनी बहारदार गझला सादर केल्या व त्या नंतर कार्यक्रमाची सांगता झाली ,.सुस्मृती प्रतिष्ठानच्या उपक्रमाबद्दल साहित्य क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे.