बँकॉक, – गेल्या चार दशकांचा समृद्ध वारसा लाभलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीने आज आपल्या आयकॉनिक अपाचे श्रेणीत नवीन टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० लाँच केल्याचे जाहीर केले. ही बहुप्रतीक्षीत नेकेड स्पोर्ट्स मोटरसायकल ताकद, वेग आणि स्टाइलचे सर्वोच्च प्रतीक असून जगभरातील मोटरसायकलप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज आहे. रायडिंगचा जबरदस्त अनुभव देणारी ही बाइक नवे मापदंड प्रस्थापित करेल आणि फ्रीस्टायलर्सचे विश्व खुले करून देईल.
टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० मध्ये डिझाइन, इंजिन लेआउट, उष्णता व्यवस्थापन आणि रायडरची सुरक्षितता आणि आरामदायीपणा, वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान अशा सर्वच बाबी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी टीव्हीएस मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुदर्शन वेणू म्हणाले, ‘टीव्हीएस मोटर कंपनीने कायमच टीव्हीएस अपाचे सीरीजमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान समाविष्ट केले आहे. आतापर्यंत या मोटरसायकलमध्ये राइड मोड्स, स्लिपर कोच, कनेक्टिव्हिटी, पूर्णपणे अॅडजस्ट करता येण्यासारखे सस्पेन्शन आणि बिल्ट टु ऑर्डर प्लॅटफॉर्म अशी वेगवेगळी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. नवीन टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० चे जागतिक लाँच आमच्यासाठी खास आहे, कारण ही मोटरसायकल अपाचेमधील नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांचा १८ वर्षांचा वारसा दर्शवणारी आहे. टीव्हीएस अपाचे आरटार ३१० मध्ये आम्ही उच्च दर्जाचे इंजिनयरिंग वापरले आहे. यामुळे ही मोटरसायकल अतिशय ताकदवान झाली आहे, शिवाय त्यात वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान देण्यात आल्यामुळे रायडिंगचा अनोखा अनुभव घेता येतो. ही मोटरसायकल भारत, युरोप, लॅटेम आणि एएसईएएन यांसारख्या कित्येक जागतिक बाजारपेठांमधील आमचे महत्त्वाचे उत्पादन बनण्यासाठी सज्ज आहे.’
लाँचप्रसंगी टीव्हीएस मोटर कंपनीच्या प्रीमियम व्यवसाय विभागाचे प्रमुख विम सुंबली म्हणाले, ‘टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० गेल्या ४० वर्षांतील रेसिंग वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आलेल्या नव्या अपाचेच्या पहिल्या काही मॉडेल्सपैकी एक आहे. ही मोटरसायकल थरार आणि मजा यांचा अनुभव देणाऱ्या फ्रीस्टाइल परफॉर्मन्स मोटरसायकलिंगच्या युगाची नवी सुरुवात करेल. इतर अपाचेप्रमाणे या अपाचेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान देण्यात आले आहे, जे तंत्रज्ञान क्षेत्रात नवे मापदंड तयार करेल. सायबोर्गपासून प्रेरणा घेत बनवण्यात आलेले स्ट्रीटफायटर डिझाइन, सर्व प्रकारचे टॉर्क आणि ट्रॅकवर मिळणारा वेग यांमुळे नव्या युगातल्या रायडर्सना फ्रीस्टायलर बनण्यासाठी उर्जा मिळेल.’
टीव्हीएस अपाचे आरटीआर सीरीजने यापूर्वीच प्रीमियम लाइफस्टाइल विभागातील नेकेड फॉरमॅटमध्ये बळकट स्थान मिळवलेले आहे. टीव्हीएस अपाचे सीरीजने नुकताच जागतिक टप्प्यावर ५ दशलक्ष विक्रीचा टप्पा ओलांडला असून ती या क्षेत्रातील सर्वाधिक वेगाने प्रगती करत प्रीमियम मोटरसायकल ठरली आहे.
क्रांतीकारी तंत्रज्ञान:
विभागात पहिल्यांदाच
विभागात नवी समीकरणे
+ क्रुझ कंट्रोल
+ बायडायरेक्शनल
क्विकशिफ्टर
+ डायनॅमिक क्लास डी एलईडी हेडलॅम्प
+ रेस ट्युन्ड
+ लिनियर स्टॅबिली कंट्रोल
+ डायनॅमिक ब्रेक लॅम्प
+ वजनास हलकी
+ अल्युमिनियम सब फ्रेम
+ नवीन सुपरमोटो मोडसह पाच राइड मोड्स
+ टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम
+ तापमान नियंत्रित सीट (उष्णता आणि थंडावा)
+ अनोखे, रिव्हर्स इनक्लान्ड डीओएचसी इंजिन
+ ५” टीएफटी क्लस्टर गोप्रो कंट्रोल, म्युझिक कंट्रोल, व्हॉइस असिस्ट, स्मार्ट हेल्मेट डिव्हाइस कनेक्टिव्हिटी, टेलिफोनी आणि नॅव्हिगेशन
+ रेससाठी पूरक स्थैर्य नियंत्रित करण्यासाठी ६डी आयएमयू
o कॉर्नरिंग एबीएस
o कॉर्नरिंग ट्रॅक्शन कंट्रोल
o कॉर्नरिंग क्रुझ कंट्रोल
o व्हीली कंट्रोल
o स्लोप डिपेंडंट कंट्रोल
o रियर लिफ्ट- ऑफ कंट्रोल
फ्रीस्टायलर्ससाठी जास्त चांगली ताकद आणि कामगिरी
· या मोटरसायकलच्या ३१२.२ सीसी इंजिनमध्ये अनोखे रिव्हर्स इनक्लाइन्ड डीओएचसी इंजिन बसवण्यात आले आहे, ज्यामुळे इंजिनची बांधणी आटोपशीर झाली आहे. त्यामुळे मास सेंट्रलायझेशन शक्य होते. नवे फोर्ज्ड अल्युमिनियम पिस्टन ५ टक्के हलके असून, त्यामुळे @ ९७०० आरपीएमला ३५.६ पीएसच्या सर्वोच्च ताकदीची निर्मिती केली जाते. याचा टॉर्क @ ६६५० आरपीएमला २८.७ एनएमपर्यंत जातो. इंजिन सर्व प्रकारच्या टॉर्क डिलीव्हरीसाठी सुसंगत बनवण्यात आले असून त्यामुळे सर्व पॉवर बँडमध्ये अमर्यादित थरार आणि या विभागातील सर्वाधिक २.८१ सेकंदांचे ०-६० अनुभवता येते.
· ६ स्पीड ट्रान्समिशन आणि बाय डिरेक्शनल क्विकशिफ्टरच्या माध्यमातून उर्जेचे वितरण केले जाते. क्विकशिफ्टर २३०० आरपीएमपासून रेड लाइनपर्यंतच्या विस्तारिक रेंजसाठी खास ट्यून करण्यात आले आहे. अत्याधुनिक थ्रॉटल-बाय-वायर सिस्टीममध्ये ४६ एमएमची मोठी थ्रॉटल बॉडी देण्यात आली आहे, ज्यामुळे उर्जेचे सलग वितरण होते.
· त्याशिवाय या मोटरसायकलमध्ये रेस ट्युन्ड लिनियर स्टॅबिलिटी कंट्रोल (आरटी- एलएससी) देण्यात आले आहे. त्यात स्ट्रेट लाइन ड्युएल चॅनेल एबीएस, क्रुझ कंट्रोल, लिनियर ट्रॅक्शन कंट्रोल आणि रियर लिफ्ट संरक्षण यांचा समावेश आहे. या विभागात पहिल्यांदाच देण्यात आलेले क्रुझ कंट्रोल थ्रॉटल किंवा क्लच इनपुटशिवाय ठरवलेला वेग राखते व त्यामुळे लांबवरच्या प्रवासात रायडरला थकवा येत नाही. क्रुझ कंट्रोल सुविधेमुळे २ गियर्सपर्यंत डाउनशिफ्ट आणि अपशिफ्ट करून जास्तीत जास्त क्रुझ आरपीएम मिळवता येतो व तो दीर्घ कालावधीसाठी वापरता येतो.
· रेससाठी पूरक स्लिपर क्लचमुळे वेगाने डाउनशिफ्ट करता येते व त्यामुळे ब्रेकिंग सोपे होते आणि कॉर्नरिंग जास्त अचूकपणे करता येते. अॅक्सलरेशनच्या दरम्यान असिस्ट फंक्शन्स क्लच प्लेट्स घट्ट बांधून ठेवतात आणि टॉर्क वाहून नेण्याची क्षमता सुधारते व क्लच ऑपरेटिंगसाठी कमी ताकद लागते.
· इंजिन कूलंट जॅकेट ऑप्टिमायझेशन आणि रेडिएटर ट्युब्जच्या २३ रांगांमुळे इंजिनचे तापमान कमी होते, उष्णता व्यवस्थापन चांगले होते व पर्यायाने इंजिनची कामगिरी व रेविंग उंचावते.
· या मोटरसायकलमुळे या विभागात पहिल्यांदाच ग्लाइड थ्रु टेक्नोलॉजी (जीटीटी) सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे ट्रॅफिक किंवा इतरवेळेस हळूहळू पुढे जाणे सोपे होते.
आकर्षक डिझाइन आणि फ्रीस्टालयर्सची वैशिष्ट्ये
· टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० मध्ये फॉरवर्ड बायस्ड मास आणि वळणदार टेल देण्यात आल्यामुळे अनोखा स्ट्रीटफायटर लूक तयार झाला आहे. डीएलआर, हेडलॅम्प आणि टेल लॅम्पसुद्धा सायबोर्ग लूक देण्याच्या हेतूने तयार करण्यात आले आहे. अनोख्या, वजनाने हलक्या सबफ्रेममुळे तयार झालेले रूप वेग वाढवणारे आहे. नव्या, हलक्या वजनाच्या ८ स्पोक दुहेरी रंगांच्या चाकांमुळे ही मोटरसायकल जास्त आकर्षक झाली आहे.
· टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० ची हायपर स्पेक ट्रेलिस फ्रेम जास्त वेग, चापल्य आणि सहजपणे मार्ग काढण्याची क्षमता वाढवणे शक्य होईल अशा दृष्टीने तयार करण्यात आली आहे. त्याला स्पोर्टी स्टील टेपर्ड हँडलबार्स देण्यात आले असून त्यामुळे रायडरला नेमके नियंत्रण मिळण्यास मदत होते. मशिनची बांधणी वजन समान विभागणारी असून त्यामुळे लांबवरच्या प्रवासात स्टियरिंगवर चांगले नियंत्रण व पाठीला आराम मिळतो. अॅडजस्टेबल हँड लिव्हर्समुळे अॅडजस्ट करण्याचे ४ वेगवेगळे स्तर मिळतात व वैविध्यपूर्ण रायडिंग स्टाइल्स आरामदायी होतात.
· केवायबीच्या तज्ज्ञांनी या मोटरसायकलचे सस्पेन्शन ट्यून केले आहे. मोनोशॉक आणि मोनोट्युब फ्लोटिंग पिस्टन तंत्रज्ञानामध्ये हायड्रॉलिक स्टॉपर, चेक व्हॉल्व्हज देण्यात आले आहेत, ज्यामुळे अचून डँपिंग होते तसेच उच्च दर्जाचे लॅटरल अक्सलेरशन आणि कॉर्नरिंग वेग मिळतो. टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० मध्ये मिशलिन रोड ५ टायर्स बसवण्यात आले आहेत. हे टायर्स अत्याधुनिक घटक तसेच मिशलिनचे पेटंटेड एसीटी+ तंत्रज्ञान यापासून बनवण्यात आले आहेत. यामुळे कॉर्नरिंग करताना घट्ट पकड मिळते तसेच राइड आरामदायी होते.
फ्रीस्टायलर्ससाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान:
· आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या मोटरसायकलमध्ये अर्बन, रेन, स्पोर्टस, ट्रॅक आणि जास्त उर्जा देत रियर एबीएस मुक्त करणारा नवीन सुपरमोटो मोड असे ५ राइड मोड्स देण्यात आले आहेत. समांतर ५ इंची टीएफटी रेस कम्प्युटरमुळे अनोखी युआय थीम आणि कस्टमायझेबल सेटिंग देण्यात आली आहेत. त्यात ट्रॅक्शन कंट्रोल, क्रुझ कंट्रोल, क्विकशिफ्टर, क्लायमॅटिक सीट कंट्रोल, टीपीएमएस, हेडलॅम्प ब्राइटनेस व डीआरएल कंट्रोल यांचा समावेश आहे. स्मार्टकनेक्ट ब्लूटुथ कनेक्टिव्हिटी टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० ला तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करते. त्यामुळे टेलिफोनी, म्युझिक कंट्रोल, गोप्रो कंट्रोल, स्मार्ट हेल्मेट कनेक्टिव्हिटी, व्हॉइस असिस्ट, रेस टेलिमेट्री, अचूक, प्रत्येक वळण दर्शवणारे नॅव्हिगेशन, व्हॉट३वर्ड्स, डिजि डॉक्स आणि क्रॅश अलर्ट या सेवा मिळतात.
· या मोटरसायकलमध्ये या विभागात पहिल्यांदाच स्मार्ट लायटिंग सुविधा देण्यात आली आहे. यातील नवीन क्लास डी डायनॅमिक एलईडी हेडलॅम्पमध्ये प्रकाशाच्या तीव्रतेचे तीन स्तर आहेत, ज्यामुळे वेगाचा पाया बदलतो आणि जास्त प्रकाश मिळतो. नव्या डायनॅमिक ब्रेक लॅम्पमुळे हार्ड ब्रेकिंगदरम्यान ब्रेक लॅम्पचे वेगवान फ्लॅशिंग होते.
फ्रीस्टायलरसाठी कस्टमायझेशन
· टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० मध्ये टीव्हीएस बिल्ट टु ऑर्डर प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना त्यांचे मशिन डायनॅमिक किट आणि डायनॅमिक प्रो किट हे दोन किट्स तसेच सेपांग ब्लू रेस ग्राफिक ऑप्शनच्या मदतीने कस्टमाइज करता येते. या किट्समध्ये मोटरसायकलप्रेमींसाठी या क्षेत्रात पहिल्यांदाच उपलब्ध होत असलेले विविध प्रकारचे तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात आले आहे.
· डायनॅमिक किटमध्ये पूर्णपणे अॅडजस्ट करता येण्यासारखे सस्पेन्शन प्रीलोड, कॉम्प्रेशन आणि पुढील स्सपेन्शनवरील रिबाउं डॅम्पिंग अॅडजस्टमेंट तसेच प्रीलोड + रियर मोनोशॉकवरील रिबाउंड डॅम्पिंग व वेगवेगळ्या परिस्थितीतील रायडिंगसाठी अॅडजस्ट करण्याचे बरेच पर्याय देण्यात आले आहेत. या किटमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम देण्यात आली आहे, जी वेळोवेळी टायर प्रेशरवर देखरेख करून त्यांची कामगिरी चांगली होईल याची काळजी घेते. त्याचप्रमाणे ही यंत्रणा ब्रास कोटेड चेनवरही नियंत्रण ठेवते, ज्यामुळे कामगिरी उंचावते तसेच मोटरसायकलचे गंज लागण्यापासून संरक्षण होते व पर्यायाने चेन दीर्घकाळ टिकते.
· नवीन डायनॅमिक प्रो किटमध्ये रेस ट्यन्ड डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि क्लायमेट कंट्रोल सीट असे या क्षेत्रात पहिल्यांदाच उपलब्ध होत असलेले तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात आले आहे. आरटी- डीएससीमध्ये या क्षेत्रातील पहिलेच ६डी आयएमयू देण्यात आले आहे, ज्यामुळे चौफेर सुरक्षा- कॉर्नरिंग एबीएस, कॉर्नरिंग ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नरिंग क्रुझ कंट्रोल, व्हीली कंट्रोल, स्लोप डिपेंडंट कंट्रोल व रियर लिफ्ट- ऑफ कंट्रोल मिळतो. आयएमयूला क्रुझ फंक्शनची जोड देण्यात आली असून त्यामुळे कॉर्नरिंग क्रुझ कंट्रोल समाविष्ट करणे शक्य झाले आहे. यामुळे मोटरसायकलचा क्रुझिंग वेग अॅडजस्ट करता येतो व क्रुझ बराच वेळ वापरता येतो.
· जागतिक पातळीवर पहिल्यांदाच मोटरसायकलमध्ये क्लायमॅटिक कंट्रोल सीट देण्यात आले आहेत. जे सभोवतालच्या वातावरणाच्या तुलनेत १५ अंशांनी तत्काळ उष्णता आणि थंडावा देते.
· स्टायलिंगच्या बाबतीत सेपांग ब्लू- रेस एडिशन टीव्हीएस रेसिंगचा ४० वर्षांचा वारसा चालवणारी असून त्याला लाल, निळ्या व पांढऱ्या रंगाची जोड देण्यात आली आहे.
टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० सोबत १२ एक्सक्लुसिव्ह फ्रीस्टायलर अक्सेसरीज देण्यात आल्या असून त्यात नकल गार्ड, व्हायसर पॅनियर आणि टॉप बॉक्स किट व १४ सेफ्टी गियर्स तसेच लाइफस्टाइल मर्चंडाइझचा समावेश आहे. या मोटरसायकलवर २४x७ रोडसाइड असिस्टन्स व वार्षिक देखभाल कॉन्ट्रॅक्टमध्ये सर्व्हिसिंग देण्यात येणार आहे.
टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१०, ३ स्टँडर्ड एसकेयूज आणि ३ बीटीओ कस्टमायझेशन्स व आकर्षक किंमतीसह उपलब्ध करण्यात आली आहे.
व्हेरिएंट
किंमत (एक्स- शोरूम इंडिया)
अर्सेनल ब्लॅक (क्विशिफ्टरशिवाय)
₹ २,४२,९९०
अर्सेनल ब्लॅक
₹ २,५७,९९०
फरी यलो
₹ २,६३,९९०
बीटीओ (बिल्ट टु ऑर्डर)
· डायनॅमिक किट
· डायनॅमिक प्रो किट
· सेपांग ब्लू
₹ १८,०००
₹ २२,०००
₹ १०,०००