● सोनू, छोटू, अनू, बाबू आणि पिंकी ही मुंबईतील सर्वांत लोकप्रिय टोपणनावे
● भारतातील आघाडीच्या टोपणनावांच्या लेन्समुळे स्नॅपचॅटर्सना त्यांची टोपणनावे भारतातील आघाडीची म्हणून मिरवण्याची मुभा मिळाली आहे; ‘माय निकनेम’ लेन्सद्वारे भारतीयांना त्यांची स्वत:ची टोपणनावे तयार करून ती सर्वांपुढे आणता येतील!
mumbai : स्नॅपचॅट या मित्रमंडळी व कुटुंबियांना दृश्य संदेश पाठवण्याची (व्हिज्युअल मेसेजिंग) सुविधा देणाऱ्या अॅपने, भारतातीय टोपणनावांच्या संस्कृतीवर, युगव्ह (YouGov) सह केलेले नवीन संशोधन आज प्रसिद्ध केले. टोपणनावांबद्दल राष्ट्रीय स्तरावर असलेले आकर्षण ह्यामुळे सर्वांपुढे आले आहे.
ह्या संशोधनातून देशातील काही सर्वांत लोकप्रिय टोपणनावे समोर आली आहेत. ती टोपणनावे सोनू, बाबू, माचा, शोना आणि पिंकी अशी आहेत. शिवाय टोपणनावांच्या अनन्यसाधारण उपसंस्कृतीतील काही रोचक (एआर) लेन्सना ह्या अभ्यासाने प्रेरणा दिली आहे. ‘इंडियाज टॉप निकनेम्स’ आणि ‘माय निकनेम’ अशा ह्या दोन लेन्सेस आहेत.
पहिल्या संवादात्मक एआर लेन्सचे नाव ‘इंडियाज टॉप निकनेम्स’ असे आहे. ह्यात भारतातील आवडत्या टोपणनावांची पाच बिस्पोक म्हणजेच कस्टमाइझ करण्याजोगी डिझाइन्स आहेत. केवळ एवढेच नाही तर प्रथमच भारतीयांना त्यांचे स्वत:चे टोपणनाव निर्माण करण्यासाठी ‘माय निकनेम’ लेन्स कस्टमाइझ करता येणार आहे. गुड्डू, सनी आणि टिंकूपासून ते एंजल बेबीपर्यंत नवीन कस्टम टोपणनावांचा एआर अनुभव स्नॅपचॅटने हेतूत: तयार केला आहे. जेणेकरून, वापरकर्त्यांना त्यांची टोपणनावे अभिमानाने मिरवता यावीत व ती त्यांच्या जवळच्या व्यक्तींना सांगता यावीत.
भारतातील जेन झेड्स (१९९०च्या मध्यापासून २०००च्या शतकाच्या सुरुवातीला जन्माला आलेले) व तरुण मिलेनिअल्सपैकी (१९८० व १९९०च्या दशकात जन्माला आलेले तरुण) बहुतेकांना ऑनलाइन विश्वास त्यांची टोपणनावे वापरणे आवडते, असे ह्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. नावे सुटसुटीत राहावीत हा तर ह्या मागील उद्देश आहेच, शिवाय, खासगीत्व जपले जावे म्हणून तसेच टोपणनावे लक्षात ठेवणे सोपे असल्यामुळे ती वापरली जातात. हे बघता, ९६ टक्क्यांहून अधिक भारतीयांनी त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी टोपणनावाचा वापर केला आहे, ह्या आकडेवारीत आश्चर्यकारक असे काहीच नाही.
टोपणनावे- भारतीय ओळखीतील अंगभूत घटक
भारतात टोपणनावे केवळ नावांपुरती मर्यादित नाहीत; तर व्यक्तीची स्वत:ची अशी ओळख निर्माण करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावतात. टोपणनावांना पेट नेम्स, घर का नाम किंवा डाक नाम असेही म्हटले जाते. टोपणनावांची परंपरा आपल्या संस्कृतीच्या वस्त्रात घट्ट विणली गेली आहे.
सोनू, छोटू, अनू, बाबू आणि पिंकी ही मुंबईत सर्वाधिक आढळणारी पहिली पाच टोपणनावे आहेत असे सर्वेक्षणात अधोरेखित करण्यात आले आहे.
लोकप्रियतेचा मुद्दा बाजूला ठेवला, तरीही ही आवडती टोपणनावे भारतीयांच्या स्वत:बद्दलच्या धारणेवर तसेच इतरांशी साधल्या जाणाऱ्या संवादावर किती लक्षणीय छाप पाडतात हे बघण्याजोगे आहे. आपल्याला आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर तीन किंवा चार टोपणनावे होती असे अर्ध्याहून अधिक उत्तरदात्यांनी सांगितले. लोकांना त्यांच्या टोपणनावांची लाज वाटते असा समज असला तरी प्रत्यक्षात लोकांना टोपणनावांचा अभिमान वाटतो हे ह्या सर्वेक्षणात लक्षात आले. सार्वजनिक ठिकाणी टोपणनावांनी हाक मारली गेली तर अवघडल्याजोगे वाटत असल्याचे केवळ १५ टक्क्यांनी सांगितले.
स्नॅप इंक एपीएसीच्या मीडिया पार्टनरशिप विभागाचे संचालक कनिष्क खन्ना म्हणाले, “टोपणनावे हा भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे आणि ही टोपणनावे आपल्याला आपल्या खऱ्याखुऱ्या जवळच्या व्यक्तींकडून दिली जातात. मग ती मित्रमंडळी असतील किंवा नातेवाईक. आम्हाला भारतातील टोपणानावांसंदर्भातील काही मजेशीर निष्कर्ष मांडायची इच्छा होती. विचित्र आणि विक्षिप्त टोपणनावांपासून ते चक्रम, लाडीक आणि विनोदी टोपणनावांपर्यंत कितीतरी कस्टम टोपणनावांच्या माध्यमातून एआर अनुभव वापरकर्त्यांना त्यांच्या अंतर्गत वर्तुळाच्या अधिक जवळ घेऊन जाईल तसेच आपली टोपणनावे सर्वांना सांगण्यातील मजा व आनंद मिळवून देईल.”
नाती जोडण्यासाठी टोपणनावे उपयुक्त
भारतीय लोक टोपणनावांचा उपयोग संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच त्यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी करतात, असेही ह्या सर्वेक्षणात आढळले आहे. एखाद्याशी अधिक जवळीक भासवण्यासाठी टोपणनावांचा उपयोग करत असल्याचे ६७ टक्के भारतीयांनी सांगितले. ह्यातून भारतातील टोपणनावांच्या संकल्पनेशी निगडित भावनिक जिव्हाळा आणि सांस्कृतिक संबंध पुन्हा एकदा स्पष्ट होतो.
टोपणनावे लहानपणी किंवा शालेय जीवनात मिळाल्याची पुष्टी, कधी ना कधी कोणत्या तरी टोपणनावाने ओळखल्या गेलेल्या लोकांपैकी, ६० टक्क्यांनी केली. मात्र, शाळेत जाण्यापूर्वी मिळालेली टोपणनावे त्यातील बहुतेकांशी अद्याप जोडलेली आहेत, ह्यावरून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तित्वाशी सुरुवातीच्या टप्प्यावर जोडल्या गेलेल्या गोष्टींचा प्रभाव दीर्घकाळ राहतो, ह्यावर प्रकाश टाकला जातो.
टोपणनावे आपुलकीचा वैशिष्ट्यपूर्ण भास निर्माण करतात. घरात वेगळ्या नावाने हाक मारली जात असल्याचे ६१ टक्के जणांनी नमूद केले, तर अनेकदा खऱ्या नावाऐवजी टोपणनाव लोकांच्या लक्षात राहत असल्याचा अनुभव सुमारे ६० टक्के जणांनी सांगितला. आपल्या मनात खोलवर असलेल्या माहितीलाच ह्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षाने दुजोरा दिला आहे. ती म्हणजे, टोपणनावे आपल्या व्यक्तित्वाचे हृदय व आत्मा असतात आणि आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या दृढ नात्यांचे प्रतीक असतात.
ह्या दोन निकनेम लेन्सेस स्नॅपचॅटवरून भारतात २१ जूनपासून उपलब्ध होतील. फक्त ‘IN’s टॉप निकनेम्स’ आणि ‘माय निकनेम IN’ अशा नावांनी लेन्स कॅरोजेलमध्ये शोधा. त्यानंतर केवळ तुमचा फोन चेहऱ्यापुढे धरा आणि काय गंमत होते ती बघा.
भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या टोपणनावांच्या लेन्ससाठी येथे क्लिक करा आणि माय निकनेम्स लेन्ससाठी येथे क्लिक करा.