mumbai : क्रीडापटू गोविंदराव मोहिते यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी आरएमएमएस चषक विविध ६ वयोगटांमधील शालेय मुलामुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेत गिरीशा पै, शर्विन बडवे, मायशा परवेझ यांनी दोन गटविजेतेपद पटकावून दुहेरी धमाका केला. गिरीशा पैने ७ व ८ वर्षाखालील मुलींमध्ये, शर्विन बडवेने १३ व १४ वर्षाखालील मुलांमध्ये तर मायशा परवेझने ११ व १३ वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम पुरस्कार पटकाविला.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप तर्फे आरएमएमएस व मुंबई बुध्दिबळ संघटना सहकार्याने झालेल्या बुध्दिबळ स्पर्धेत ८ वर्षाखालील मुलांमध्ये हितांश गोहीलने (४ गुण) प्रथम, जश शाहने (४ गुण) द्वितीय, लक्ष पिल्लेने (४ गुण) तृतीय तर मुलींमध्ये गिरीशा पैने (५ गुण) प्रथम, उठारा कार्तिकने (२.५ गुण) द्वितीय, अनिश्का बियाणीने (२ गुण) तृतीय क्रमांक मिळविला. ११ वर्षाखालील मुलांमध्ये मानस हाथीने (४.५ गुण) प्रथम, जियान शाहने (४ गुण) द्वितीय, लोबो फेरडीनने (३.५ गुण) तृतीय तर मुलींमध्ये मायशा परवेझने (४.५ गुण) प्रथम, अलंकृता बेलेकरने (३ गुण) द्वितीय, अन्विता ठाकरने (३ गुण) तृतीय क्रमांक पटकाविला. १४ वर्षाखालील मुलांमध्ये शर्विन बडवेने (४.५ गुण) प्रथम, विहान कुलकर्णीने (४ गुण) द्वितीय, सार्थक प्रसादने (४ गुण) तृतीय तर मुलींमध्ये मयांका राणाने (३.५ गुण) प्रथम, जीयाना धर्मश्रीने (३ गुण) द्वितीय, प्रियाल अहुजाने (२.५ गुण) तृतीय पुरस्कार जिंकला.