मुंबई : भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा समूहातील एक सदस्य तनिष्कने रिटेल विस्ताराची घोडदौड कायम राखत मुंबईमध्ये आपले नवे स्टोर सुरु केले आहे. नव्या स्टोरचे उद्घाटन ट्रेंटचे चेअरमन आणि टायटन कंपनी लिमिटेडचे व्हाईस चेअरमन श्री. नोएल टाटा, टायटन कंपनी लिमिटेडच्या ज्वेलरी डिव्हिजनचे सीईओ श्री. अजॉय चावला आणि टायटन कंपनी लिमिटेडचे वेस्टचे रिजनल बिझनेस हेड श्री. नीरज भाकरे यांनी सकाळी साडेदहा वाजता केले. या शानदार स्टोरच्या शुभारंभाच्या निमित्ताने तनिष्कने दागिन्यांच्या प्रत्येक खरेदीसोबत सोन्याचे नाणे मोफत भेट* म्हणून देण्याची घोषणा केली आहे. १९ ते २२ मे २०२३ दरम्यान या आकर्षक ऑफरचा लाभ घेता येईल. मुंबईतील नव्या तनिष्क स्टोरचा पत्ता – तनिष्क शोरूम, तळमजला, सेंटिनेल, सेंट्रल ऍव्हेन्यू, पवई प्लाझाच्या समोर, डाऊनटाऊन पवई, पवई, मुंबई, महाराष्ट्र – ४०००७६. दूरध्वनी क्रमांक: ०२२ ६९७४ ४५००.
४००० चौरस फुटांच्या या नव्या स्टोरमध्ये आकर्षक मौल्यवान कलर स्टोन्स, सोने, चांदी, हिरे व सॉलिटेयर्सपासून बनवलेल्या सिग्नेचर तनिष्क डिझाइन्सची विशाल श्रेणी उपलब्ध करवून देण्यात आली आहे. भारतीय कला प्रकारांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेले, शानदार डायमंड कलेक्शन आलेख्या, मौल्यवान स्टोन्सच्या रंगांचा आकर्षक मेळ साधत घडवण्यात आलेले कलर मी जॉय – द कार्निवल एडिट अशी तनिष्कची एकापेक्षा एक सरस एक्सक्लुसिव्ह कलेक्शन्स देखील या स्टोरमध्ये खरेदी करता येतील. या स्टोरमध्ये तनिष्कचे वेडिंग ज्वेलरी कलेक्शन रिवाह बाय तनिष्क उपलब्ध आहे. ‘सेलेस्ट X सचिन तेंडुलकर’ हे तनिष्कचे नवे सॉलिटेयर कलेक्शन या स्टोरमध्ये आहे. अंगठ्या, कानातले आणि ब्रेसलेट्सची महिला व पुरुषांसाठीची विविध शानदार डिझाइन्स या कलेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. तनिष्कच्या प्रत्येक दागिन्यांमध्ये समृद्ध कलात्मकता, नाजूक नक्षीकाम आणि डिझाइन्सविषयी अनोखी संवेदनशीलता आढळून येते. या स्टोरमध्ये झोया गॅलरी आणि एक्सक्लुसिव्ह हाय-व्हॅल्यू झोन देखील आहेत.
ट्रेंटचे चेअरमन आणि टायटन कंपनी लिमिटेडचे व्हाईस चेअरमन श्री. नोएल टाटा, टायटन कंपनी लिमिटेडच्या ज्वेलरी डिव्हिजनचे सीईओ श्री. अजॉय चावला आणि टायटन कंपनी लिमिटेडचे वेस्टचे रिजनल बिझनेस हेड श्री. नीरज भाकरे यांनी सांगितले, “मुंबईमध्ये आमचे नवे स्टोर सुरु होत असल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. तनिष्कमध्ये आमच्या प्रत्येक कामात आम्ही ग्राहकांना केंद्रस्थानी मानतो. देशातील ग्राहकांचा सर्वात आवडीचा ब्रँड या नात्याने ग्राहकांना आमच्यापर्यंत सहज पोचता यावे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि नवनवीन स्टोर्स सुरु करून आम्ही त्या उद्दिष्टाच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा, आवडीनिवडी पूर्ण व्हाव्यात यासाठी या स्टोरमध्ये सोने, हिरे, सॉलिटेयर्स आणि ब्रायडल दागिन्यांची अनेक उत्तमोत्तम डिझाइन्स उपलब्ध करवून देण्यात आली आहेत. तनिष्कच्या समृद्ध परंपरेमध्ये महाराष्ट्र आणि येथील लोकांचे खूप मोठे योगदान आहे, या राज्यात गेली अनेक वर्षे तनिष्कला मिळालेला विश्वास आणि प्रेम यामुळेच आम्ही हा महत्त्वाचा रिटेल टप्पा गाठू शकलो आहोत. आम्हाला खात्री आहे की मुंबईतील ग्राहकांना या लार्ज फॉरमॅट स्टोरमधील अतुलनीय अनुभव खूप आवडेल.”