mumbai : भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद होत असल्याची घोषणा केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत नागरिक बँकेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकतात. २३ मेपासून नोटा बदलण्याचे काम सुरू होणार असून, स्टेट बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासंदर्भात महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार, २००० रुपयांच्या नोटा एकावेळी २० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलण्याची सुविधा असेल, यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची गरज नाही. यामुळे नागरिक एकाच वेळी २००० रुपयांच्या १० नोटा बदलून घेऊ शकतात.
तुम्ही एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जाऊन कोणताही फॉर्म न भरता किंवा ओळखपत्राशिवाय २००० रुपयांच्या नोटा सहज बदलून घेऊ शकता.