मुंबई, – लार्सन अँड टुब्रोने आज ‘मिशन 96’ यशस्वी झाल्याची घोषणा केली असून याअंतर्गत कंपनीने आपले ग्राहक सिडकोसाठी (सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) ९६ फ्लॅट्सच्या १२ मजली इमारतीचे बांधकाम केवळ ९६ दिवसांत केले असून त्यासाठी कंपनीची प्रीकास्ट लार्ज काँक्रीट पॅनेल सिस्टीम वापरण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे सार्वजनिक गृहबांधणीचे काम वेगाने होते. हा टॉवर २३,४३२ ईडब्ल्यूएस आणि एलआयजी हाउसेसचा एक भाग असून सिडकोद्वारे नवी मुंबईत बामनडोंगरी, खारकोपर आणि तळोजा येथे पीएमएवायच्या चौथ्या पॅकेजअंतर्गत त्याचे बांधकाम केले जात आहे.
एल अँड टीचे ‘मिशन 96’ प्रीकास्ट तंत्रज्ञान वापरून यशस्वी करण्यात आले असून ते मेकनाइज्ड वेगवान बांधकाम, फॅक्टरी वातावरणात नियंत्रित उत्पादनावर आधारित उच्च दर्जाचे भविष्य मानले जात आहे. मिशन 96 मध्ये सुपरस्ट्रक्चरच्या १९८५ प्रीकास्ट घटकांची निर्मिती आणि इन्स्टॉलेशन, ६४,००० चौरस फुटांच्या बिल्ट अप एरियातील एमईपी वर्क्स, आर्किटेक्चरल फिनिशेस यांचा समावेश होता.
पूर्णत्वाला गेलेल्या टॉवरच्या लाँचप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिडकोचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. अश्विन मुद्गल आयएएस म्हणाले, ‘एल अँड टीची विक्रमी प्रक्रिया पाहाताना आनंद होत असून त्यामुळे अशा प्रकारचे तंत्रज्ञान आणि दर्जेदार शॉप फ्लोअर मॅनेजमेंट यांच्यासाठी मार्ग खुला होईल.’ पद्म भूषण आर्किटेक्ट श्री. हफीझ कॉन्ट्रॅक्टर म्हणाले, ‘एल अँड टीने देशात अल्युमिनियम फॉर्मवर्क बांधकामाचा पाया रचला आणि निवासी क्षेत्राचा चेहरा बदलला. कंपनीने साहित्याची शाश्वतता आणि वेगवान बांधकाम साद्य करण्यासाठी प्रीकास्ट तंत्रज्ञान वापराला चालना देण्यात कंपनी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.’ प्रीफॅब्रिकेटेड प्री- फिनिश्ड व्हॉल्युमेट्रिक बांधकामावर कंपनी लक्ष केंद्रित करत असल्यामुळे भारतातील घरांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मदत होईल.
‘इमारती आणि कारखान्यांणध्ये आम्ही कायमच बांधकामाचा वेग वाढवण्याचे मार्ग व साहित्याचा शोध घेतला असून हा प्रकल्प बांधकामचा वेळ लक्षणीय प्रमाणात कसा कमी करता येईल याचे यशस्वी उदाहरण आहे,’ असे एल अँड टीटे संपूर्ण वेळ संचालक आणि वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष (बिल्डिंग्ज) श्री. एम. व्ही. सतीश. म्हणाले. त्यांनी बी अँड एफ फास्ट या खास युनिटच्या स्थापनेविषयी माहिती दिली. या युनिटने डीआरडीओसासाठी केवळ ४५ दिवसांत अत्याधुनिक, सात मजली फ्लाइट कंट्रोल सिस्टीम इंटिग्रेशन सेंटर पूर्ण करण्यासाठी प्रगत पद्धती व तंत्रज्ञान वापरण्यावर लक्ष केंद्रित केले होते. आम्ही काँक्रीट मॅच्युरिटी पद्धतीचा अवलंब करून काँक्रीटच्या ताकदीवर प्रत्यक्षात देखरेख केली. विनाअडथळा बांधकामासाठी डिजिटल मीटर्स, तर प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल ट्विन पद्धतीचा या प्रकल्पासाठी विकसित करण्यात आलेल्या बीआयएम मॉडेलसह वापर करण्यात आला.
४ एप्रिल २०२२ रोजी शुभारंभ करण्यात आलेला एल अँड टीचा हा प्रकल्प केवळ ३६ दिवसांत १२ मजल्यांपर्यंत पोहोचला. म्हणजेच एरवी या क्षेत्रात एक मजला बांधण्यासाठी ८ ते १२ दिवस लागत असताना एल अँड टीने तीन दिवसांत एका मजल्याचे काम केले. प्रीकास्ट बांधकामामुळे तिसरा मजला पूर्ण झाल्यावर केवळ १० दिवसांत अंतर्गत फिनिशिंगचे काम सुरू करणे शक्य झाले व त्यामुळे ९ जुलै २०२२ रोजी ९६ व्या दिवशी लक्ष्य साध्य झाले.