मुंबई,: एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्या विमाकर्त्यांतर्फे पार्टिसिपेटिंग प्लॅन्सवर रु.३६६० कोटींचा आतापर्यंतचा सर्वाधिक बोनस जाहीर करण्यात आला आहे. एप्रिल २०२३ मध्ये कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये झालेल्या बैठकीत या बोनसची घोषणा करण्यात आली. २३.१४ लाख पॉलिसीधारक या बोनससाठी पात्र आहेत.
रु.३६६० कोटींच्या एकूण रकमेपैकी या आर्थिक वर्षातील पॉलिसींना रु.२६९६ कोटी बोनस देय असेल. हा बोनस परिपक्व होणाऱ्या पॉलिसींसाठी बोनस म्हणून किंवा कॅश बोनसच्या स्वरुपात देण्यात येईल. शिल्लक बोनस रक्कम परिपक्व झालेल्या, मृत्यूपश्चात दावे करण्यात आलेल्या किंवा सरेंडर केलेल्या पॉलिसींसाठी पे-आउटच्या मार्गाने भविष्यात देय असेल.
पार्टिसिपेटिंग किंवा पार प्लॅन्स या जीवन विमा पॉलिसी असतात. या पॉलिसी पॉलिसीधारकाला बोनसच्या माध्यमातून प्रॉफिट-शेअरिंग लाभ उपलब्ध करून देतात.
एचडीएफसी लाइफच्या एमडी व सीईओ विभा पाडळकर म्हणाल्या, “एक विमाकर्ते म्हणून आम्ही मृत्यू, व्यंग, दीर्घायुष्य व व्याज दर या चार जोखमींना आमच्या अभिनव उत्पादन व सेवांच्या माध्यमातून आम्ही हाताळतो. यामुळे व्यक्ती “सन्मानाचे आयुष्य“ म्हणजेच “लाइफ ऑफ प्राइड“ जगू शकते. आमच्या मौल्यवान पॉलिसीधारकांसाठी बोनसमध्ये वाढ जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आर्थिकदृष्ट्या आम्ही भारताला सुरक्षित करण्यात आमची भूमिका बजावत असतानाच आमच्या एकनिष्ठ पॉलिसीधारकांना लाभ देण्याचा आमचा हा मार्ग आहे.“