मुंबई/ NHI:महाराष्ट्र शासन सहकार विभाग जिल्हा उपनिबंधक-सहकारी संस्था मुंबई शहर १, मुंबई जिल्हा हौसिंग फेडरेशन मर्यादित आणि उपनिबंधक सहकारी संस्था-जी/एन विभाग मुंबई यांच्या संयुक्त विध्यमाने को-ऑप. हौसिंग सोसायटी निगडीत विषयांवरील कार्यक्रमाचे आयोजन ३ मे रोजी सकाळी ११.००वा. दादर पश्चिम येथील साने गुरुजी विद्यालयाच्या मिनी हॉलमध्ये करण्यात आले आहे. सदर मार्गदर्शनपर कार्यक्रमात सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंटसाठी डीम कन्वेयन्स-मानवी हस्तांतरण, तंटामुक्त संस्था अभियान, पुनर्विकास/स्वयंपुनर्विकास आदी विषयांवर सहकारी संस्था, मुंबई शहर १ चे जिल्हा उपनिबंधक श्री. नितीन काळे, सहकारी संस्था, जी/एन विभाग मुंबईच्या उपनिबंधक श्रीमती बकुळा माळी तसेच मुंबई जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या संचालकांचे मार्गदर्शन करणार आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांना उपरोक्त विषयांबाबत सखोल माहिती होण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
******************************