मुंबई,NHI
: तरुणांमधील आजच्या वाढत्या चिंतांपैकी एक म्हणजे केसांची गळती होय. शॅम्पू, तेले, सिरम्स आदी उत्पादने ते वापरून बघत असले, तरी त्यातून समाधानकारक परिणाम साध्य होत नाहीत. केसगळतीवर मात करणारी विश्वासार्ह उत्पादने बाजारात नसल्यामुळे केस पुन्हा वाढण्याची आशा मावळत जाते. अशा व्यक्तींना आशेचा किरण देण्यासाठी ट्राया या केसगळतीची समस्या मूळापासून सोडवण्याची ग्वाही देणाऱ्या भारतातील पहिल्यावहिल्या हेअर फॉल सोल्युशन ब्रॅण्डने आपले ‘#HopeForHair’ ही मोहीम अभिनेता राजकुमार राव याच्या सहाय्याने सादर केली आहे. सर्वांनी केसगळतीची समस्या ‘ट्राया’वर सोडावी आणि आयुष्यातील त्याहून महत्त्वाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करावे ही जागरूकता निर्माण करण्यावर या मोहीमेचा उद्देश आहे.
‘ट्राया‘च्या सहसंस्थापक सलोनी आनंद या नवीन कॅम्पेनबद्दल म्हणाल्या, “सध्या बाजारात केसगळती रोखण्याचा दावा करणाऱ्या उत्पादनांची गर्दी झली आहे पण ग्राहकांना विश्वास वाटेल असे, उपयुक्त ठरेल असे खात्रीचे उत्पादन यात नाही. बाजारातील प्रत्येक उत्पादन वापरून झाल्यानंतर तसेच प्रत्येक घरगुती उपाय आजमावून झाल्यावर अनेक ग्राहक आमच्याकडे येतात.
या मोहिमेच्या माध्यमातून, ट्रायाच्या डॉक्टरांरे दिले जाणारे उपचार केसाची काळजी घेतील, हा संदेश आम्हाला तरुणांना द्यायचा आहे.
डोक्यावर पुन्हा केस वाढण्याबद्दल त्यांच्या मनात अजिबात आशा नसते. या कॅम्पेनच्या माध्यमातून, आम्हाल केसगळतीशी झगडणाऱ्या अधिकाधिक जणांना आशेचा किरण द्यायचा आहे.