मुंबई, : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ला जाहीर करताना हे आनंद होत आहे की, श्री. राज कुमार दुबे यांनी आज कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून पदभार स्वीकारला आहे. ३४ वर्षांपेक्षा अधिक काळ या उद्योगात काम केलेले श्री. दुबे त्यांच्यासोबत व्यवसाय आणि मानवी भांडवल विकासाचा भरपूर अनुभव घेऊन येतात.
श्री. दुबे हे एनआयटी अलाहाबादचे माजी विद्यार्थी असून त्यांनी मेकॅनिकल इंजीनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्यांनी स्लोव्हेनियामधील ल्युब्लियाना येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर एंटरप्रायझेस येथून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी देखील संपादन केली आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी ४०० हून अधिक ठिकाणी आणि ७५०० लोकांवर परिणाम करणाऱ्या अनेक धोरणात्मक संस्थात्मक विकास उपक्रम आणि बदल व्यवस्थापन प्रक्रिया राबवल्या आहेत आणि संस्थेची पुनर्रचना, दूरदृष्टी आणि मानव संसाधन नियोजन या क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सल्लागारांसोबत जवळून काम केले असून वेगवेगळ्या स्थान व पदांवर यशस्वीरित्या नेतृत्व केले आहे आणि अखेर विविध क्षेत्रांमध्ये एव्हिएशन, ऑपरेशन्स, मानव संसाधन आणि रिटेल सारख्या विविध व्यवसायिक वर्टिकलमध्ये कठीण व आव्हानात्मक असाइनमेंट पूर्ण केल्या.
श्री. दुबे यांनी फ्यूयल रिटेलिंग चॅनेलमध्ये ग्राहककेंद्रित वेगवेगळे उत्पादने आणि प्रिमियम इंधनांच्या मार्केटिंगमध्ये नेतृत्वाचे स्थान कायम राखून मोठ्या उंचीवर आणले आहे.