NHI/MUMBAI
पहिल्या तीन अर्जदारांमध्ये प्रत्येक गुणवंताला १० लाख रुपये पुरस्क
मुंबई, : के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टला परदेशात पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम जाहीर करताना भारावून गेल्यासारखे वाटत आहे. शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट हे हुशार भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास सक्षम करणे आहे.
या कार्यक्रमांतर्गत, ऑगस्ट २०२३ पासून सुरू होणाऱ्या परंतु फेब्रुवारी २०२४ च्या पुढे सुरू होणार नसलेल्या अभ्यासक्रमांसाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे किंवा नामांकित परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला आहे अशा विद्यार्थ्यांना व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती दिली जाईल. के.सी. महिंद्रा फेलोज म्हणून सम्मान केलेल्या पहिल्या ३ विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला जास्तीत जास्त १० लाख रुपये दिले जातील. याव्यतिरिक्त, उर्वरित यशस्वी अर्जदारांना ५ लाख रुपायांची शिष्यवृत्ती दिली जाईल.
शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्याकरता अर्जदारांचे सातत्याने चांगले शैक्षणिक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे आणि परदेशातील एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज केलेला असला पाहिजे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि त्यांची शैक्षणिक कामगिरी, अभ्यासेतर उपक्रम आणि आर्थिक गरज यावर आधारित अंतिम निवड केली जाईल.
महिंद्रा समूहाच्या सीएसआर विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष सुश्री शीतल मेहता म्हणाल्या, “आमच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांनी निवडलेल्या अभ्यासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता असलेल्या प्रतिभावान भारतीय विद्यार्थ्यांना ओळखणे आणि त्यांना पाठिंबा देणे आहे आम्हाला विश्वास आहे की अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरविले तर असे विद्यार्थी केवळ त्यांची शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच नव्हे तर आपल्या देशाचे चांगले भविष्य घडविण्यातही मदत करतील.”
वर्षानुवर्षे के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने आपली उच्च शिक्षणाची स्वप्ने पूर्ण करण्याची आणि स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे चांगले भविष्य घडवण्याची प्रचंड क्षमता असलेल्या ८००,००० हून अधिक पात्र विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे
के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट १९५६ पासून परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देतआहे. २०२२ मध्ये, या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा भाग म्हणून ६० गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण ३१५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.
इच्छुक उमेदवार के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
शिष्यवृत्ती कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया https://www.kcmet.org/what-we-do-Scholarship-Grants.aspx#bobcontent0-title भेट द्या.
संपर्क: kcmetscholarships@mahindra.com