विवो भारतात V-Series लाँच करण्याच्या तयारीत आहे. या सीरिजचे फोन भारतात पुढील महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. या फोनबाबत मोबाईलप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नव्या V सिरीजमध्ये Vivo V25, Vivo V25e आणि Vivo V25 Pro येण्याची शक्यता आहे. हा फोन भारतात 18 ऑगस्टला लाँच होईल, अशीही बातमी समोर येत आहे. मात्र तत्पूर्वी भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीच्या हातात हा फोन दिसला. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
विराट कोहलीने अपकमिंग विवो V25 स्मार्टफोनसह फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच फोटोला “My Favourite shade of blue” अशी कॅप्शन लिहिली आहे. विराट कोहली या फोटोत फोन वापरताना दिसत आहे. यात फोनची बॅक साईट दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी हा फोन चीनमध्ये लाँच झाला होता. चीनी कंपनी विवो S15 प्रो हा फोन रिब्रँडेड करून विवो V25 म्हणून भारतात लाँच करू शकते. यापूर्वी विवो V12 आणि V12 प्रो देशात विवो V23 आणि V23 प्रो म्हणू लाँच केले होते.
विवो V25 मध्ये विवो S15 प्रो सारखी वैशिष्ट्ये असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 6.6 इंचाची फुल एचडी+एमोलेड डिस्प्ले मिळेल. स्क्रिन रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज असेल. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 8100 प्रोसेसर, 12 जीबी रॅम आणि 256 जीबीपर्यंत इनबिल्ट स्टोरेज मिळू शकते. यात 4500 mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच 80 वॅट फास्ट चार्जिंगसह येईल. हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असेल. फोनमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी, 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सल पोर्टेट लेंस असू शकते. तसेच सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा असून शकतो.