केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाला महाराष्ट्र विधानसभेत भलेही एकही जागा नाही. पण, असे असले तरी नागालँड विधानसभा निवडणुकीत मात्र रामदास आठवले यांच्या पक्षाला मात्र दमदार यश मिळाले आहे. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) दोन जागा जिंकल्या आहेत.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाला महाराष्ट्र विधानसभेत भलेही एकही जागा नाही. पण, असे असले तरी नागालँड विधानसभा निवडणुकीत मात्र रामदास आठवले यांच्या पक्षाला मात्र दमदार यश मिळाले आहे. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) दोन जागा जिंकल्या आहेत. स्वत: रामदास आठवले यांनी ही माहिती दिली आहे.
रामदास आठवले यांनी माहिती देताना सांगितले की, नागालँड विधानसभा निवडणूक 2023 मध्ये त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) दोन जागा जिंकल्या आहेत. तसेच, NDPP 1 जागा जिंकून 25 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने 2 जागा जिंकल्या आहेत आणि 12 जागांवर आघाडीवर आहे. यासोबतच लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) 3 जागांवर आघाडीवर आहे.
नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 60 जागांपैकी 59 जागांसाठी निवडणूक झाली. उर्वरीत एक मतदार संघ असलेल्या अकुलुतोमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) बिनविरोध जिंकला आहे. दरम्यान, नागालँडमध्येराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही 6 उमेदवार आघाडीवर होते. नागालँड विधानसभेचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. कोणता पक्ष किती मतांनी जिंकला आणि सत्तेत कोण बसणार याबाबत लवकर स्पष्टता येणार आहे.