65,000 चौ. फुटाच्या क्षेत्रफळात महिला व मुलांसाठीचे या विभागातील सर्वोत्तम हॉस्पिटल!!
• पुण्यात फक्त महिला व मुलांसाठी असलेले पहिले 100 खाटांच्या क्षमतेचे हॉस्पिटल
• अंकुरा हॉस्पिटल्समध्ये दर महिन्याला 70,000+ कुटुंबे भेट देतात
• अंकुरा हॉस्पिटल्समध्ये गेल्या 4 वर्षांत 35,000+ प्रसूती झाल्या
• अंकुरा हॉस्पिटल्समध्ये 60,000+ एनआयसीयू आणि पीआयसीयू बाळांवर केले उपचार
• देशातील पीडियाट्रिक शस्त्रक्रियांच्या यशाचा सर्वाधिक दर
• गर्भधारणेशी संबंधित उपचारांमध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान
• अत्यंत आरामदायी प्रसूती खोल्या
21 फेब्रुवारी 2023, पुणे : भारतीय अभिनेते, निर्माते, मानवतावादी आणि अंकुरा हॉस्पिटल्सचे ब्रँड अँबेसेडर श्री. सोनु सूद यांनी पुण्यातील आमचे पहिले केंद्र लाँच केले.
अंकुरा हॉस्पिटल्सचे हे केंद्र 65,000 चौ. फुट इतक्या प्रशस्त क्षेत्रफळात विस्तारलेले असून या ठिकाणी फक्त महिला व मुले यांच्यासाठी 110 खाटांची सुविधा आहे आणि पुण्यातील हे अशा प्रकारचे पहिलेच हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल पुण्यातील औंध येथे असून या ठिकाणी 24/7 इमर्जन्सी, रुग्णवाहिका व व्हेंटिलरची सुविधा असलेली रुग्णवाहिका सेवा पुरविण्यात येते.
पुण्यातील शिवाजीनगरचे आमदार श्री. सिद्धार्थ शिरोळे जी, पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर श्री. दत्ताजी गायकवाड, पुणे महापालिकेच्या नगरसेविका श्रीमती अर्चना मधुकर मुसळे जी, वकील व राजकीय नेते श्री. मधुकर मुसळे जी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकीय नेते श्री. राहुल दादा बलवाडकर जी या केंद्राच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते.
महिला व मुलांसाठी असलेले आघाडीचे हॉस्पिटल असलेले अंकुरा हॉस्पिटल पुण्यात लाँच करण्यात आले असून एकाच छताखाली महिला व मुलांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
अंकुरा हॉस्पिटलने त्यांच्या हैदराबाद येथील केंद्रात अलिकडेच 9M हे सर्वात आधुनिक बर्थिंग एक्स्पिरिअन्स सेंटर (प्रसूती अनुभव केद्र) स्थापन केले आणि आज ते पुण्यात लाँच करण्यात आले आहे. 9M मध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा, वैशिष्ट्ये आणि कौशल्य एकाच छताखाली उपलब्ध होते. 9M म्हणजे एका स्त्रीचा आई होण्यापर्यंतचा 9 महिन्यांचा प्रवास. आजच्या काळातील स्त्री व तिच्या कुटुंबियांसाठी हे एक आधुनिक बर्थिंग बुटिक आहे.
या प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत करताना अंकुरा हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा प्रसाद म्हणाले, “रुग्णांना सर्वोत्तम उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आमचे महिला व मुलांसाठीचे 110 खाटांची क्षमता असलेले पुण्यातील हॉस्पिटल अविरत कष्ट करते. आम्ही शस्त्रक्रिया किंवा उपचार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतो आणि पूर्ण गोपनीयता बाळगतो. आमच्या वैद्यकीय टीमकडे कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि स्रोत आहेत. परिणामकारकता आणि सुरक्षिततेसाठी आमच्या आधुनिक वैद्यकीय सुविधा व पायाभूत सुविधांमध्ये या क्षेत्रातील मानकांचे पालन करण्यात येते. जेव्हा नवजात बालकाला पुढील आरोग्यसेवांची आवश्यकता असते, त्यासाठी आमच्याकडे निओनॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिट (एनआयसीयू) आहे.”
भारतातील हे आमचे 14 वे केंद्र आहे आणि पुणे, महाराष्ट्रातील पहिले केंद्र आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये वॉटर-बर्थिंगची (पाण्यातील प्रसूती) सुविधाही उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे पुणेकरांची मागणी असलेल्या जागतिक प्रमाण कार्यपद्धतींचे येथे पालन करण्यात येते.
“अंकुरा हॉस्पिटल्स हे पुण्यातील एक सर्वोत्तम महिला व बाल रुग्णालय आहे. आम्ही अखंडितपणे सुपर-स्पेशालिटी आरोग्यसेवा उपलब्ध करून देतो आमचे प्रत्येक रुग्णाशी विश्वासाचे नाते असते आणि तो रुग्ण आमच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू शकतो. आमच्यापर्यंत पोहोचणे खूप सुलभ आहे आणि आंध्रप्रदेश व तेलंगणामधील 13 ठिकाणी असलेल्या केंद्रांमध्ये आमचे 1400+ ऑपरेशनल बेड्स आहेत.”, अशी पुष्टी कृष्णा प्रसाद यांनी जोडली.
या केंद्राचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे व अंकुरा हॉस्पिटल्सचे ब्रँड अँबेसेडर श्री. सोनु सूद म्हणाले, “अंकुरा हॉस्पिटल्सचे महिला व बाल रुग्णालय आणि 9M लाँच करणे हा माझा बहुमान आहे. या ठिकाणी महिला व मुलांना पूर्ण आरोग्यसुविधा अनुभव प्रदान केला जातो.
नवजात बालके आणि मुलांवर बालस्नेही वातावरणात उपचार करण्यासाठी अंकुरा हॉस्पिटल्समध्ये प्रगत तंत्रज्ञान व सुविधा आहेत.
आजच्या काळातील महिलेला त्यांचे आयुष्य सुलभ, अधिक आरामदायी आणि त्यांची प्रसूती संस्मरणीय करण्यासाठी आमच्याकडे अंकुराची 9M सुविधा आहे.
अंकुराचा दीर्घकालीन भागीदार म्हणून मी त्यांच्या तज्ज्ञांशी जोडलेलो आहे, जे महिला व मुलांच्या सर्वांगीण आरोग्याची शुश्रुषा करतात. महासाथीदरम्यान मी अंकुरा हॉस्पिटल्ससोबत काम केले आहे आणि त्यानंतर मी गायनेकोलॉजीशी संबंधित व बालरोगचिकित्सेशी संबंधित काही रुग्णांना त्यांच्याकडे पाठविले होते आणि त्यांना आश्चर्यकारक परिणाम पाहायला मिळाले. या ठिकाणी उपचार मिळालेला प्रत्येक व्यक्ती निरोगी होऊनच घरी परतला. त्यामुळे माझा विश्वास वाढला आणि अशा आरोग्यसेवा ब्रँडसोबत जोडले जाण्याबाबत मी अधिक गंभीर झालो. कारण हे केंद्र विश्वास व भरोसा या दोन तत्वांना महत्त्व देतात, अनुसरतात आणि आचरण करतात.”
या वेळी डॉ. कृष्णा प्रसाद म्हणाले, “आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर महिलेच्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होत असतात आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्यसमस्यांना महिलेला सामोरे जावे लागते. पुण्यातील आमच्या महिला रुग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग केंद्र महिलांची उत्कृष्ट आणि सर्वसमावेशक काळजी देते. आमचे प्रख्यात तज्ज्ञ प्रतिबंधात्मक उपाययोजना, अचूक निदान आणि उत्तम उपचारांसंदर्भात व्यावसायिक मार्गदर्शन करतात. प्रसूती व स्त्रीरोगकेंद्र महिलांच्या प्रजनन यंत्रणेला होणाऱ्या गंभीर आजारांवर उत्तम उपचार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सर्व वयोगटातील महिला, लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांवर उपचार करण्यासाठी आमच्या डॉक्टरांकडे आवश्यक कौशल्ये आहेत.
पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल आणि 9M मधील खासीयतींमध्ये पुढील सेवांचा समावेश आहे :
बालरोगचिकित्सा सेवा :
• निओनॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिट (एनआयसीयू)
• पीडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट (पीआयसीयू)
• सामान्य बालरोगचिकित्सा
• पीडियाट्रिक न्यूरोलॉजी
• डेव्हलपमेंटल पीडियाट्रिक्स
• पीडियाट्रिक ॲलर्जी व पल्मोनोलॉजी
• पीडियाट्रिक हृदयरोगचिकित्सा
• पीडियाट्रिक शस्त्रक्रिया व युरोलॉजी
• पीडियाट्रिक मूत्रपिंडविकारचिकित्सा
• पीडियाट्रिक एंडोक्रिनोलॉजी
• पीडियाट्रिक डरमॅटोलॉजी
• पीडियाट्रिक गॅस्ट्रोएंटरोलॉजी
• पीडियाट्रिक ईएनटी
• पीडियाट्रिक ऱ्हुमेटॉलॉजी व इम्युनोलॉजी
• पीडियाट्रिक इमर्जन्सी
• बालविकास केंद्र
महिला चिकित्सा सेवा :
• उच्च-जोखीम प्रसूती
• वॉटर बर्थिंग (जल प्रसूती)
• व्हीबीएसी
• रजोनिवृत्तीचे व्यवस्थापन
• प्रसूती आयसीयू
• वेदनारहीत प्रसूती
• मुलाच्या जन्माची तयारी
• गायनेकोलॉजी समस्या
• लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
• प्रसवोत्तर (पोस्टनॅटल) आरोग्यसेवा
• 24/7 इमर्जन्सी सेवा व रुग्णवाहिका
• 24/7 व्हेंटिलेटरसज्ज रुग्णवाहिका सुविधा
• मल्टिस्पेशालिटी पीडियाट्रिक आरोग्यसेवा
• सुपरस्पेशालिस्ट पीडियाट्रिक डॉक्टर