~ बंगळुरूसह, मुंबई, दिल्ली ही शहरे आघाडीवर ~
मुंबई, १९ फेब्रुवारी २०२३: ६२ टक्के भारतीय कंपन्यांचा अधिकाधिक नवोदितांची (फ्रेशर्स) नियुक्ती करण्याकडे कल असून फ्रेशर्सना नियुक्त करण्याचा सर्वात प्रबळ मानस असलेले अव्वल तीन उद्योग इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (६७टक्के), ईकॉमर्स अॅण्ड टेक्नोलॉजी स्टार्ट-अप्स (५२ टक्के) आणि टेलिकम्युनिकेशम्यु (५१ टक्के) आहेत. हा खुलासा टीमलीज एडटेक या भारतातील अग्रगण्य अध्ययन सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने नुकतेच जानेवारी ते जून २०२३ सहामाहीसाठी लॉन्च केलेल्या करिअर आऊटलुक रिपोर्टमधून झाला आहे.
या अहवालामधून भारतीय रोजगार बाजारपेठेतील काही महत्त्वाचे ट्रेंड्स सादर करण्यात आले आहेत. यात प्रथम श्रेणीच्या शहरांमध्ये बंगळुरू ७५ टक्क्यांसह फ्रेशर्सकरिता अधिक नियुक्त करण्यासंदर्भात अव्वलस्थानी आहे, ज्यानंतर मुंबई (५६ टक्के) आणि दिल्ली (४७ टक्के) या शहरांचा क्रमांक असल्याचे निदर्शनास आले आहे. डेव्हओप्स, सप्लाय चेन मॅनेजमेंट, डेटा इंजिनिअरिंग, बिझनेस व कॉर्पोरेट लॉ मधील पदवी आणि प्रमाणन हे संभाव्य नियोक्त्यांद्वारे मागणी करण्यात आलेले काही इन-डिमांड कोर्सेस आहेत.
या अहवालाच्या काही प्रमुख निष्पत्ती पुढीलप्रमाणे आहेत:
जागतिक मंदी असताना देखील भारतीय नियोक्तांसाठी फ्रेशर्सना नियुक्त करण्याचा मानस जुलै ते डिसेंबर २०२२ (५९ टक्के) च्या तुलनेत ३ टक्क्यांनी (६२ टक्के) काहीशा प्रमाणात वाढला आहे.
भारतभरातील ६२ टक्के नियोक्तांचा जानेवारी ते जून २०२३ दरम्यान फ्रेशर्सना नियुक्त करण्याचा मानस आहे.
क्लाऊड डेव्हलपर, इन्व्हेस्टमेंट बँकिंग असोसिएट, सायबरसिक्युरिटी इंजीनिअर, मार्केटिंग अॅनालिस्ट, सोशल मीडिया स्पेशालिस्ट, कन्टेन्ट राइटर, कॅम्पेन असोसिएट, मायक्रोबायोलॉजिस्ट आणि बायोमेडिकल इंजीनिअर फ्रेशर्सना नियुक्त करण्यामध्ये अव्वल पदे म्हणून उदयास आली आहेत.
डेव्हओप्स, कॉर्पोरेट फायनान्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट ही उच्च मागणी असलेली डोमेन कौशल्ये आहेत.
काही टॉप-रेट केलेली सॉफ्ट स्किल्स आहेत निगोशिएशन व पर्स्युएसिव्ह स्किल्स, कॉग्निटिव्ह फ्लेक्झिबिलिटी, क्यूरोसिटी/कन्टिन्युअल लर्निंग आणि इमोशनल इंटेलिजन्स.
टीमलीज एडटेकचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शंतनू रूज म्हणाले, ‘‘टीम नियुक्तीसंदर्भात जागतिक मंदीचे वातावरण असताना देखील मोठ्या संख्येने भारतीय नियोक्त्यांनी फ्रेशर्सना नियुक्त करण्याचा त्यांचा इरादा व्यक्त केला आहे. काही दीर्घकालीन पुरवठा चॅनेल तयार करण्यासाठी तर काहींनी त्यांच्या महागड्या संसाधनांच्या जागी नवीन प्रशिक्षित प्रतिभांचा वापर केला. युनिव्हर्सिटीजमधून बाहेर पडणाऱ्या नवीन पदवीधरांसाठी ही चांगली बातमी असली तरी, येत्या काही महिन्यांत प्रत्यक्ष नियुक्ती करण्याच्या हेतूवर आम्ही लक्ष ठेवू.’’
टीमलीज एडटेकच्या अध्यक्ष व सह-संस्थापक नीती शर्मा म्हणाल्या, ‘‘जागतिक अशांतता आणि आर्थिक स्थितीबाबतच्या कुजबुजीदरम्यान फ्रेशर्ससाठी सकारात्मक नियुक्ती भावना दिसून येणे उत्साहवर्धक आहे. महत्त्वाकांक्षी पदवीधर व फ्रेशर्ससंदर्भात आशावादी दृष्टिकोन आणि भविष्यात चांगली मागणी असणा-या नोकरीच्या कौशल्यांचे प्रदर्शन करणारे उद्योग ओळखणे ही मुख्य गोष्ट आहे. नोकरी शोधणाऱ्यांनी सध्याच्या बाजारातील ट्रेंडशी परिचित होण्याची आणि त्यांची पहिली नोकरी मिळवण्याच्या संधी सुधारण्यासाठी योग्य कौशल्ये व अभ्यासक्रमांमध्ये गुंतवणूक करण्याची हीच वेळ आहे.’’