मुंबई, फेब्रुवारी २०२३: प्रॉपटेक कंपनी हाऊसिंगडॉटकॉमने त्यांचा सिग्नेचर हॅप्पी न्यू होम्स २०२३ च्या नवीन एडिशनच्या लॉन्चची घोषणा केली आहे. १५ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान व्हर्च्युअली आयोजित करण्यात आलेल्या या भव्य इव्हेण्टमध्ये भारतातील २७ शहरांमधील आघाडीच्या विकासकांचे गृहनिर्माण प्रकल्प पाहायला मिळतील.
बाजारातील अनुकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा इव्हेण्ट आरईए इंडिया ग्रुपसाठी संकलन आणि सहभागाच्या दृष्टीने सर्वात मोठा ठरणार आहे. ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञान-समर्थकांच्या वापराच्या माध्यमातून अत्यंत सहजतेने खरेदी-विक्री करण्याचा पर्याय देणाऱ्या या व्हर्च्युअल इव्हेंट दरम्यान भारतातील मेगा शहरांमधील, तसेच द्वितीय व तृतीय श्रेणीच्या बाजारपेठांमधील किंमती विभागातील मालमत्ता उपलब्ध असतील.
जवळपास २,५०० चॅनेल भागीदारांचा सहभाग अपेक्षित असलेल्या महिनाभर चालणा-या या गाला इव्हेण्टमध्ये ५००हून अधिक विकासक त्यांच्या ८०० हून अधिक गृहनिर्माण प्रकल्पांचे प्रदर्शन करतील. या गाला इव्हेण्टमध्ये सहभागी होणा-या काही आघाडीच्या विकासकांमध्ये पंचशील, कोहिनूर ग्रुप, कल्पतरू, महागुन, कासाग्रॅण्ड इत्यादींचा समावेश आहे. आपल्या उच्चस्तरीय, मल्टी-चॅनेल प्रमोशनल मोहिमेच्या माध्यमातून गुरगाव येथे मुख्यालय असलेल्या कंपनीला ४५ दशलक्षहून अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
हाऊसिंगडॉटकॉमचे राष्ट्रीय व्यवसाय प्रमुख अमित मसलदान म्हणाले, ‘‘घर खरेदीसाठी अनुकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व डेटा अत्यंत उच्च सकारात्मक खरेदीदार भावना दाखवतात. या वार्षिक इव्हेण्टचे मागील सर्व एडिशन्स यशस्वी झाले असले तरी या वर्षीच्या हॅपी न्यू होम इव्हेण्टने सर्व विक्रम मोडीत काढावेत आणि हाऊसिंग प्लॅटफॉर्मला सर्वकालीन उच्च डील्स सक्षम करण्यास मदत करावी, अशी आमची अपेक्षा आहे.’’