मुंबई : मुलांच्या आरोग्यदायी भविष्याला चालना देण्यासाठी लुपिन लाइफ आयोजित पहिल्यावहिल्या अॅप्टिव्हेट चॅम्पियन रन फॉर किड्सला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभिनेत्री नेहा धूपिया हिने रनला हिरवा झेंडा दाखविला. अॅप्टिव्हेट चॅम्पियन रन, मुलांसाठी आणि पालकांसाठी अशा तीन प्रकारांत झालेल्या रनमध्ये 3 हजारहून अधिक धावपटूंनी भाग घेतला. यानिमित्त फिटनेस तज्ञांद्वारे सखोल प्रशिक्षणासह प्री-अप सत्राने मुलांना प्री-वॉर्म अप आणि कूल डाउन व्यायामाची ओळख करून देण्यात आली.