मुंबई : शिवाजी पार्क जिमखाना आयोजित व सारस्वत बँक पुरस्कृत १४ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या झैद अहमदने मुंबई उपनगरच्या विश्व् विजेत्या संदीप दिवेवर २५-१५, २५-१० अशा सरळ दोन सेटमध्ये मात करून या गटाचे विजेतेपद पटकाविले अंतिम सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी झैदने मुंबईच्या गिरीश तांबेला तर संदीपने माजी विश्व् विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेला पराभूत केले होते. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत प्रशांत मोरेने गिरीश तांबेवर तीन सेट पर्यंत रंगलेल्या लढतीत १२-२५, २२-१९, २५-१५ असा चुरशीचा विजय मिळविला.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अनुभवी मुंबईच्या काजल कुमारीने मुंबईच्या विश्व् क्रमांक ३ असलेल्या निलम घोडकेवर ३ सेटपर्यंत झालेल्या चुरशीच्या लढतीत २४-१०, ११-२४ व १८-१० असा पराभव करून विजय मिळविला. उपांत्य फेरीत काजलने मुंबईच्या अंबिका हरिथला तर निलमने मुंबईच्या मैत्रेयी गोगटेला पराभूत केले होते. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात अंबिका हरिथने मैत्रेयी गोगटेला १७-१०, १९-१८ असे नमविले
विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे डी सी पी मनोज पाटील यांच्या शुभहस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी शिवाजी पार्क जिमखान्याचे सचिव संजीव खानोलकर, सहसचिव सुनील रामचंद्रन, कार्याध्यक्ष दीपक मुरकर, ट्रस्टी लता देसाई, महेंद्र ठाकूर, मिलिंद सबनीस, प्रकाश नायक, इनडोअर सचिव विजय अल्वा, खजिनदार विलास सोमण तसेच राज्य कॅरम संघटनेचे खजिनदार अजित सावंत व मुंबई जिल्हा संघटनेचे सचिव आणि राज्य कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण केदार उपस्थित होते. गुजरातचे वयस्कर खेळाडू एस पी मराठे यांनी सर्व व्हाईट स्लॅम करणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी रुपये ५००/- ईनाम दिले.