मुंबई, फेब्रुवारी 2023 : ग्राहकांनी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनी लि.ने चांगला क्रेडिट स्कोअर आणि चांगला क्रेडिट रिपोर्ट असलेल्या ग्राहकांना विम्याच्या प्रीमियमवर 7.5%* इतका डिस्काउंट देऊ केला आहे. जे कस्टमर रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसी खरेदी करणार आहेत किंवा ज्यांना ही पॉलिसी रिन्यू करायची आहे त्यांना त्यांच्या चांगल्या क्रेडिट स्कोअरच्या आधारावर हा विशेष लाभ देण्यात येत आहे.
चांगल्या क्रेडिट स्कोअरमधून ग्राहकांची आर्थिक शिस्त कळून येते. अशा प्रकारच्या शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि चांगल्या आर्थिक सवयी अंगी बाणवण्यासाठी रिलायन्स जनरल इन्श्युरन्सने हा क्रेडिट स्कोअरवर आधारित डिस्काउंट सादर केला आहे.
त्याचप्रमाणे रिलायन्स हेल्थ पॉलिसी सुदृढ जीवनशैली अंगीकारणाऱ्यांना बक्षीस म्हणून त्यांच्या बॉडी मास इंडेक्सच्या (बीएमआय) आधारे प्रीमिअमवर डिस्काउंट देते. सामान्य** बीएमआय असलेले ग्राहक प्रीमियमवर डिस्काउंट मिळवू शकतात.
लस घेणाऱ्या व्यक्तींनाही कंपनीतर्फे विम्याच्या प्रीमियमवर 2.5* टक्के डिस्काउंट देण्यात येऊन प्रतिबंधात्मक लसीकरणाला कंपनीने प्रोत्साहन दिले होते (नवीन पॉलिसी आणि रिन्यूअल**). ज्यांनी कोव्हिड-19 ची लस किंवा बूस्टर शॉट किंवा ह्युमन पॅपिलोमाव्हायरस लस किंवा न्यूमोकोकल लस घेतली आहे, त्यांना हा डिस्काउंट देण्यात आला होता.
रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसीवर अमर्यादित लाभ मिळतात*; ₹5 कोटींपर्यंत विमा संरक्षण, मोअरग्लोबल कव्हर*, प्रसूती विमा संरक्षण, ओपीडी विमा संरक्षण, विम्याच्या रकमेच्या अमर्यादित प्रमाणात पुनःस्थापना (रिस्टोरेशन) आणि पंधराहून अधिक अतिरिक्त लाभ मिळतात.
प्रोडक्ट डिस्काउंटिंगविषयी अधिक जाणून घेण्यासाठी माहितीपुस्तिका आणि ग्राहक माहिती पत्रिका वाचता येईल.
रिलायन्स जनरल इन्श्युरन्सबद्दल
रिलायन्स जनरल इन्श्युरन्स ही कंपनी रिलायन्स कॅपिटलचा भाग असून ही भारतातील एक आघाडीची इन्श्युरन्स कंपनी आहे. या कंपनीतर्फे मोटर विमा, आरोग्य विमा, प्रवास विमा आणि गृह विमा इत्यादी वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक प्रोडक्ट्स ऑफर करण्यात येतात. त्यांच्यातर्फे प्रत्येक ग्राहकाची गरज भागविण्यासाठी सानुकूल उपाययोजना उपलब्ध करून देण्यात येतात. रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचे 8500+ हॉस्पिटल्सचे विस्तृत नेटवर्क आहे. रिलायन्स जनरल इन्श्युरन्सची प्रॉडक्ट्स उपलब्ध करून देण्यासाठी आणि रिटेल, कॉर्पोरेट व एसएमई क्लाएंट्सना सेवा प्रदान करण्यासाठी भारतभर 75,000 मध्यस्थ आणि 131 शाखा कार्यालयांचे विस्तृत नेटवर्क आहे.
www.reliancegeneral.co.in | www.facebook/RelianceGenIn | @RelianceGenIn
माध्यम संपर्क : रिलायन्स जनरल इन्श्युरन्स | सौमित्र घोरुइ | soumita.ghorui@relianceada.com | 7044729799