मुंबई, फेब्रुवारी, २०२३: इनोविटी टेक्नोलॉजीजने रिलायन्स रिटेल, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेसाबत सहयोगाने आज डिजिटल रुपी – रिटेल [e-R] द्वारे रिटेल पेमेंट्सची इन-स्टोअर स्वीकृती सुरू करण्याची घोषणा केली. डायनॅमिक क्यूआर आधारित इन-स्टोअर यूपीआय पेमेंट्स सादर करण्यामध्ये अग्रणी ठरल्यानंतर रिलायन्स रिटेल ग्राहकांसाठी सोयीस्कर आणि एकसंधी पेमेंट अनुभव निर्माण करण्याच्या प्रयत्नात भारतातील डिजिटल चलन स्वीकृती स्वीकारणारा पहिला एंटरप्राइझ रिटेलर बनला आहे.
रिलायन्स रिटेलकरिता तंत्रज्ञान भागीदार असलेल्या इनोविटी टेक्नोलॉजीजने कॅशियर बिलिंग सिस्टममध्ये एकीकृत होणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत हे सोल्यूशन तयार केले आहे. बिलिंग केल्यानंतर ग्राहकाने e₹-R च्या माध्यमातून पैसे भरण्याचे निवडल्यास एक डायनॅमिक डिजिटल रुपी स्वीकृती क्यूआर कोड स्कॅनिंगसाठी ग्राहकांना सादर केला जातो.
ग्राहकांनी आयसीआयसीआय बँक किंवा कोटक महिंद्रा बँकेद्वारे समर्थित डिजिटल रुपी अॅपचा वापर करून फक्त टर्मिनलवर क्यूआर कोड स्कॅन करणे आणि e₹-R च्या माध्यमातून पेमेंट अधिकृत करण्यासाठी त्यांचा पासकोड प्रविष्ट करणे आवश्यक आहे. कॅशियर आणि ग्राहकांना ग्राहकांकडून रिलायन्स रिटेलकडे e₹ हस्तांतरणाची त्वरित पुष्टी मिळते. तंत्रज्ञान आपोआपपणे रिकॉन्सिलिएशन सक्षम करते.
रिलायन्स रिटेल लिमिटडेचे संचालक व्ही. सुब्रमण्यम म्हणाले, ‘‘आमच्या स्टोअर्सवर डिजिटल चलन स्वीकृती अग्रगण्य करण्याचा हा ऐतिहासिक उपक्रम भारतीय ग्राहकांना निवड करण्याची सुविधा देण्याच्या कंपनीच्या धोरणात्मक दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. अधिकाधिक भारतीय डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्यास इच्छुक असल्याने हा उपक्रम आम्हाला आमच्या स्टोअरमधील ग्राहकांना आणखी एक कार्यक्षम आणि सुरक्षित पर्यायी पेमेंट पद्धत प्रदान करण्यास मदत करेल.’’
कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे अध्यक्ष व चीफ डिजिटल ऑफिसर दीपक शर्मा म्हणाले, ‘‘e₹ हे देशात सुरू झालेल्या डिजिटल क्रांतीमध्ये एक गेम चेंजर आहे. e₹-R वॉलेट्स असलेले सर्व ग्राहक आता रिलायन्स रिटेल स्टोअर्सवर सहज, सुरक्षित आणि झटपट डिजिटल व्यवहारांचा आनंद घेऊ शकतील. डिजिटल क्रांतीमध्ये भाग घेण्यासाठी रिलायन्स रिटेल आणि इनोविटीसोबत बँकिंग भागीदार म्हणून सहयोग केल्याचा कोटकला अभिमान आहे.’’
आयसीआयसीआय बँकेच्या डिजिटल चॅनेल्स अॅण्ड पार्टनरशीप्सचे प्रमुख बिजिथ भास्कर म्हणाले, ‘‘सीबीडीसी किंवा डिजिटल रूपीचे सादरीकरण भारताच्या डिजिटल प्रवासातील ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. स्वतःचे डिजिटल चलन असणार्या जागतिक स्तरावरील काही निवडक देशांपैकी भारत आहे. भारतीय रुपयाची टोकनीकृत डिजिटल आवृत्ती असलेले डिजिटल रुपी पेमेंट करण्याकरिता वापरकर्त्यांसाठी स्थिर, सुरक्षित आणि अतिरिक्त मार्ग आहे. डिजिटल रुपीची वाढती स्वीकृती ग्राहकांमध्ये त्याचा अवलंब करण्याला चालना देईल. रिलायन्स रिटेल स्टोअर्सवर डिजिटल रूपीला स्वीकार्य पेमेंट मोड बनवण्यासाठी रिलायन्स रिटेल आणि इनोविटी टेक्नोलॉजीजसोबत सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे. हे वापरकर्त्यांना एकसंधी पेमेंट पर्याय सादर करेल आणि रिलायन्स रिटेलची कार्यक्षमता सुधारेल.’’
इनोविटी टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटडेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव अग्रवाल म्हणाले, ‘‘चलनाच्या इतिहासाचा प्रवास अत्यंत रोमांचक आहे, वस्तु विनिमय, नाणी, नोटांपर्यंत विकसित होत आहे आणि आता तो त्याच्या नवीन डिजिटल अवतारात आहे. भारताच्या डिजिटल पेमेंटमधील क्रांतीमुळे ई-ट्रॅन्झॅक्शन्समध्ये अपवादात्मक वाढ झाली आहे, रोखीच्या माध्यमातून पेमेंट करणे आजही लोकप्रिय आहे. डिजिटल रूपी अजूनही भौतिक चलनाचा विश्वास, सुरक्षितता आणि सेटलमेंट फायनलला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करतो. इनोविटीला प्रबळ तंत्रज्ञान व्यासपीठ प्रदान करण्यात पहिले असण्याचा आनंद होत आहे. या व्यासपीठावर व्यक्ती आता डिजिटल रूपीचा वापर करत त्याच विश्वासासह आणि रोख रकमेप्रमाणे सुलभ व्यवहार करू शकतात. रिलायन्स रिटेलसोबतचा सहयोग आम्हाला उद्योगाकरिता दर्जात्मक सोल्यूशन्स निर्माण करण्याची संधी देतो. आमचे बँकिंग भागीदार म्हणून कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या धोरणात्मक पाठिंब्यामुळे आम्ही आज भारताच्या डिजिटल रुपीची पेमेंट स्वीकृती प्रत्यक्षात आणू शकलो आहोत.’’
१ डिसेंबर २०२२ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) प्रथम प्रायोगिक पद्धतीने निवडक भारतीय शहरांमधील रिटेल बाजारांसाठी e₹-R सादर केले, जे विशिष्ट निवडलेल्या बँकांच्या ग्राहकांसाठी मर्यादित स्वरूपात उपलब्ध होते. सुरूवातीला मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू व भुवेनश्वर या चार शहरांमध्येच उपलब्ध असलेले हे डिजिटल चलन नंतर नऊ इतर शहरांमध्ये विस्तारित करण्यात आले. आयसीआयसीआय बँक व कोटक महिंद्रा बँक यांच्यासह आठ बँकांना या पायलट उपक्रमामध्ये टप्प्याटप्प्याने सहभागासाठी निवडण्यात आले आहे. या बँकांचे ग्राहक त्यांनी ऑफर केलेल्या डिजिटल वॉलेटद्वारे e₹ सह व्यवहार करू शकतील. आवश्यकतेनुसार अधिक बँका, वापरकर्ते आणि स्थान समाविष्ट करण्यासाठी या पायलट उपक्रमाची व्याप्ती हळूहळू वाढवली जाईल. डिजिटल रुपी रिटेलचा अवलंब जसजसा वाढत जाईल तसतसे अधिकाधिक समुदायाला सुविधा व सुरक्षितता, व्यक्ती ते व्यक्ती (पी२पी) आणि व्यक्ती ते व्यापारी (पी२एम) व्यवहार आणि डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये सुधारित आर्थिक समावेशासाठी उत्पन्न यांसारख्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा फायदा होईल.
For more information
Debashree Basu /Sumanth C A
+9611422003 /+91 8296237785
Arpit Tiwari
+91 993 0655 218