सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी 7 फेब्रुवारी रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. लग्न होऊन चार दिवस उलटले असले तरी चाहते त्यांच्या लग्नासंबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास उत्सुक आहेत. लग्नानंतर कियाराचे तिच्या सासरी म्हणजे दिल्लीच्या घरी जंगी स्वागत झाले. यावेळी तिच्या लूकसह चर्चा झाली ती तिच्या मंगळसूत्राची. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियाराचे हे मंगळसूत्र प्रसिद्ध डिझायनर सब्यासाची मुखर्जी यांनी डिझाइन केले आहे. यासाठी सिद्धार्थने बराच खर्च केला आहे.
कियाराच्या मंगळसूत्राची किंमत 2 कोटी
कियाराचे मंगळसूत्र अगदी साधे आहे. सोन्याच्या साखळीत चारी बाजूंनी काळे मोती लावले आहेत. मध्यभागी एक मोठा हिरा आहे. आजतकच्या वृत्तानुसार, सिद्धार्थने या मंगळसूत्रासाठी 2 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, अद्याप त्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कियाराचा ब्रायडल लूक चाहत्यांना पसंत पडला
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचे फोटोही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. कियाराने लग्नाच्या वेळी घातलेले दागिनेही चाहत्यांना पसंत पडत आहेत. तिच्या लग्नाचा लहेंगा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केला आहे. तर कियाराचे दागिनेही त्यांच्याच कलेक्शनमधील आहेत.
कियाराच्या कलिरेंनी वेधले लक्ष
कियाराच्या कलिरेंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कियारा अडवाणीच्या कलिऱ्यांमध्ये सिद्धार्थ आणि तिची क्यूट लव्हस्टोरी गुंफलेली आहे. या कलिऱ्यांमध्ये केवळ एकच नाही तर तीन खास गोष्टी आहेत. ज्या सिद्धार्थशी संबंधित आहेत. कियाराच्या या कलिरेंची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा होताना दिसत आहे. कियारा अडवाणीच्या कलिऱ्यांमध्ये तिच्या आणि सिद्धार्थच्या नावांचे इनिशियल्स आहेत. जे या दोघांचं नातं खूप घट्ट असल्याचं दर्शवतात. कियाराने या कलिरेंच्या माध्यांमातून सिद्धार्थच्या खूप जवळच्या एका सदस्याला ट्रिब्यूट दिला आहे. आज तो या जगात नाही. कियाराने सिद्धार्थचा पाळीव श्वान ऑस्करचा चेहरा अत्यंत मोहक पद्धतीने या कलिऱ्यांमध्ये कोरून घेतला आहे. कियाराच्या या कलिरेंचं डिझाइन मृणालिणी चंद्राने केले होते. याशिवाय रोम हे सिद्धार्थ आणि कियाराचे आवडते डेस्टिनेशन आहे आणि तेही कलिरेंमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. इतकेच नाही तर कियाराच्या लेहंग्यातही रोमची झलक पाहायला मिळाली.
सिद्धार्थचे त्याचा पाळीव श्वान ऑस्करशी खूप खास नाते होते. 11 वर्षे तो सिद्धार्थबरोबर होता. मात्र फेब्रुवारी 2022 मध्ये त्याचे निधन झाले. त्यावेळी सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली होती. याचबरोबर त्याने ऑस्करचे काही फोटोही शेअर केले होते. ऑस्कर सिद्धार्थसाठी किती महत्त्वाचा होता हे कियाराला माहीत असल्याने तिने आपल्या कलिरेंच्या माध्यामातून त्याचा अशी श्रद्धांजली वाहिली आहे.
12 फेब्रुवारी रोजी मुंबईत बॉलिवूड मित्रांसाठी होणार ग्रँड रिसेप्शन
सिद्धार्थ आणि कियारा यांनी 7 फेब्रुवारी रोजी जैसलमेरमधील हॉटेल सूर्यगड येथे कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या हजेरीत लग्न केले. त्यानंतर नवविवाहित दाम्पत्याने 8 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील लीला पॅलेसमध्ये सिद्धार्थचे मित्र आणि दिल्लीत राहणाऱ्या नातेवाईकांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. दिल्लीनंतर ते आज मुंबईला रवाना होणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कपल 12 फेब्रुवारीला मुंबईत बॉलिवूड मित्रांसाठी ग्रँड रिसेप्शन पार्टी आयोजित करणार आहे.
‘शेरशाह’मध्ये एकत्र दिसले होते सिद्धार्थ आणि कियारा
सिद्धार्थ आणि कियाराने 2021 मध्ये आलेल्या ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केले होते. सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ या सिरीजमध्ये दिसणार आहे. ही सिरीज Amazon Prime वर रिलीज होणार आहे. दुसरीकडे, कियारा लवकरच ‘सत्यप्रेम की कथा’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन दिसणार आहे.