कर्नाटक येथे एका महिलेने आपल्या कारने एका दुचाकीस्वाराला चिरडल्याचा प्रकार घडला आहे. सदर महिलेने ब्रेकच्या ऐवजी एक्सलेटर दाबल्याने हा अपघात झाल्याची माहिती असून त्यामुळे एका निष्पाप दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभा असं या आरोपी महिलेचं नाव असून तिने ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. तर संजय बाबू असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्याचा मुलगा वेदांथ दुचाकीवर प्रवास करत होते. ते हळू चालले होते. रस्त्यावर त्यांना उजव्या बाजूला जायचे होते त्यावेळी मागून येणाऱ्या कारने त्यांना चिरडलं अन् त्यांच्या अंगावरून कार पुढे गेली.