मुंबई : प्रजा फाऊंडेशनतर्फे मुंबईतील आमदारांचं प्रगतीपुस्तक जाहीर करण्यात आलं आहे. हिवाळी अधिवेशन 2019 ते पावसाळी अधिवेशन 2021 दरम्यानच्या कामावरुन हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. यामध्ये 31 आमदारांचा त्यांनी जनतेच्या समस्या आणि समोर आणलेल्या प्रश्नांच्या संदर्भात हे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आलं आहे.
मुंबईतील आमदारांनी मागील दोन वर्षांत केलेलं काम, विधानसभा सभागृहात मांडलेले प्रश्न यावर मुल्यांकन करणार आलं आहे. कोव्हीड 19 च्या काळात 2020 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज केवळ 18 दिवस झाले आणि टाळे बंदीनंतर (24 मार्च नंतर) केवळ चार दिवस कामका झालं. एकूण 19 राज्यांच्या विधानसभा कामकाजाची आकडेवारी उपलब्ध असून त्यानुसार 2020 मधील सत्रांच्या कालावधीनुसार महाराष्ट्र राज्य विधानसभा 10 व्या क्रमांकावर आहे, कर्नाटक आणि राजस्थान पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे. (31 आणि 29 दिवस कामकाज चालले)
लोकप्रतिनिधी या नात्याने मुंबईतील आमदारांनी त्यांच्या वैधानिक आणि संवैधानिक जबाबदाऱ्यांची पूर्तता कशा प्रकारे केली आहे ? त्याचं मूल्यांकन या प्रगतीपुस्तकात केली असून त्यांच्या कामगिरीनुसार आमदाराची श्रेणी ठरवण्यात आली आहे यामध्ये काँग्रेस आमदार अमिन पटेल पहिल्या क्रमांकावर तर भाजपचे पराग अळवणी दुसऱ्या आणि सेनेचे सुनील प्रभू तिसऱ्या क्रमांकावर आहेत. शिवसेनेचे रवींद्र वायकर , प्रकाश सुर्वे , भाजपचे मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर यांना सर्वात कमी गुण मिळाले आहेत. पाच मंत्र्यांना यामधून वगळण्यात आलं आहे.