मुंबई, 6 फेब्रुवारी, 2023 : ब्लू डार्ट या दक्षिण आशियातील एक्स्प्रेस एअर-इंटिग्रेटेड वाहतूक व वितरण एक्स्प्रेस लॉजिस्टिक्स कंपनीतर्फे आज डिजिटल प्रीपेड कार्ड सादर करत असल्याची घोषणा करण्यात आली. पेमेंट्स व बॅलेन्सची रिअल टाइम स्थिती तसेच सारांश व लेजरच्या व्ह्यूसह बुकिंग्जचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्राहकांना मदत करणे हे या अॅपचे उद्दिष्ट आहे. डिजिटल प्रीपेड कार्ड हा ग्राहकांसाठी एक विना-अडथळा पर्याय आहे, ज्यात OTPचा वापर करून इन्स्टंट रिचार्ज करता येतो. त्यामुळे या व्यवहाराला उच्च सुरक्षा प्राप्त होते आणि आपल्या बदलत्या व्यावसायिक गरजांनुसार रिचार्ज करता येते आणि यात किमान बॅलेन्स ठेवण्याची आवश्यकता नसते.
ब्लू डार्ट पोर्टलचे सुविधाजनक व वापरायला सोपी युझर इंटरफेस आहे. या पोर्टलवरून जलत ऑनबोर्डिंग करता येते आणि सेम-डे शिपिंगचा (त्याच दिवशी शिपिंग) पर्यायही उपलब्ध करून देण्यात येतो. युझर्सना वाढीव व्हिजिबिलिटी आणि सुरक्षा देण्यासाठी या पोर्टलवर एसएमएस नोटिफिकेशनचीही सोय आहे. या लाँचसह ब्लू डार्टला डिजिटल बिलिंग, विक्री प्रशासकीय कामकाज कमी करून पर्यावरणस्नेही कार्यपद्धती अपेक्षित आहे आणि त्यांना ग्राहकांनी त्यांच्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणे अपेक्षित आहे. डिजिटल प्रीपेड कार्ड तंत्रज्ञान स्मार्ट, सुरक्षित, सुलभ आणि वेगवान आहे. या नव्या सुविधेमुळे लॉजिस्टिक्स इंडस्ट्रीचा वेग अधिक जलद होणार आहे.
ब्लू डार्टचे चीफ कमर्शिअल ऑफिसर केतन कुलकर्णी म्हणाले, “ब्लू डार्ट हे देशातील सर्वाधिक मागणी असलेले लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादार आणि या क्षेत्रात नवे प्रयोग करणारे आद्यप्रवर्तक आहेत. भारतात अलीकडेच 5जी लाँच झाल्यानंतर संबंधित तंत्रज्ञानाशी संबंधित नव्या परिसंस्था पुढील दशकभर लॉजिस्टिक्स क्षेत्रात डिजिटलायझेशनची प्रक्रिया सुरू करतील. आमचे डिजिटल प्रीपेड कार्ड हे या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे आणि त्यामुळे आमच्या ग्राहकांसाठी अधिक सुविधा, सुरक्षा आणि विश्वासार्हता उपलब्ध करून देता येईल. डिजिटल जगात उत्कृष्टता देणे हा धोरणात्मक पर्याय आहे, जो आमच्या तंत्रज्ञानविषयक व उत्पादन आघाडीवरील ऑटोमेशन उपक्रमांना चालना देईल.”
ब्लू डार्टमध्ये तंत्रज्ञानाला कायमच महत्त्व देण्यात आले आहे. महासाथीनंतर आधुनिकतेला व नव्या प्रयोगांना चालना देण्याचा वेग अधिकच वाढवावा लागला आहे, जेणेकरून ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान करता येईल. पुरवठा साखळी शाश्वत राखणाऱ्या व ग्राहकांच्या इतर व्यावसायिक आवश्यकतांची पूर्तता करणाऱ्या तंत्रज्ञानाधारित भविष्यसज्ज उपाययोजना निर्माण करण्यामध्ये ब्लू डार्टचे इनोव्हेशन सातत्याने प्रयत्नशील आहे.