ठळक वैशिष्ट्ये:
• टाटा मोटर्स डीलर्ससाठी अद्वितीय इलेक्ट्रिक वेईकल इन्व्हेण्टरी फायनान्सिंग प्रोग्राम
• आयसीआयसीआय बँकेकडून डिझेल व पेट्रोल मॉडेल्ससाठी अर्थसाह्य करण्यासोबत ईव्हींसाठी सुविधेमध्ये वाढमुंबई, जानेवारी २४, २०२३: देशामध्ये इलेक्ट्रिक वेईकलच्या (ईव्ही) अवलंबतेला चालना देण्याच्या प्रयत्नामध्ये टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने आपल्या अधिकृत प्रवासी ईव्ही डीलर्सना ईव्ही डीलर फायनान्सिंग सोल्यूशन देण्याकरिता आयसीआयसीआय बँकेसोबत सहयोगाची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत आयसीआयीसआय बँक टाटा मोटर्सच्या अधिकृत प्रवासी ईव्ही डीलर्सना इन्व्हेण्टरी फंडिंग देईल. हे इन्व्हेण्टरी फंडिंग बँक डिझेल व पेट्रोल मॉडेल्ससाठी डीलर्सना करत असलेल्या निधीसाह्यामध्ये भर आहे. या सुविधेअंतर्गत ईव्ही डीलर्स स्थिर परतावा मुदतींचा लाभ घेऊ शकतात.
या सहयोगासाठी टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लि. व टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा आणि आयसीआयसीआय बँक लि.चे कार्यकारी संचालक श्री. राकेश झा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या सहयोगाबाबत बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा म्हणाले, ‘‘देशातील ईव्हींमध्ये अग्रणी म्हणून आम्ही त्यांच्या यशस्वी अवलंबतेची जबाबदारी घेतो. परिपूर्ण इलेक्ट्रिफिकेशन संपादित करण्याच्या आणि ग्रीन मोबिलिटीला चालना देण्याच्या आमच्या ध्येयाशी बांधील राहत आम्हाला आमच्या अधिकृत इलेक्ट्रिक पॅसेंजर वेईकल डीलर भागीदारांना विशेष फायनान्सिंग प्रोग्रामसह साह्य करण्याकरिता आयसीआयसीआय बँकेसोबत सहयोग करण्याचा अत्यंत आनंद होत आहे. आमचे डीलर नेटवर्क हे आमच्या मुख्य आधारस्तंभांपैकी एक आहे आणि त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आम्ही भारतातील इलेक्ट्रिफिकेशन लाटेला अधिक पुढे घेऊन जाऊ शकलो आहोत. आम्हाला विश्वास आहे की, या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही ईव्ही अधिक प्रमाणात उपलब्ध करून देऊ आणि आमच्या ग्राहकांसाठी ईव्ही खरेदी करण्याची प्रक्रिया एकसंधी व संस्मरणीय अनुभव बनवू.’’
या सहयोगाबाबत बोलताना आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक श्री. राकेश झा म्हणाले, ‘‘इलेक्ट्रिक वेईकल उद्योग झपाट्याने वाढत आहे, तसेच पर्यावरणास-अनुकूल इलेक्ट्रिक वेईकल्सप्रती ग्राहकांची मागणी देखील वाढत आहे. ईव्हींचे लॉन्च ऑटोमोबाइल क्षेत्रातील लक्षणीय नवोन्मेष्कारी बदल आहे. आयसीआयसीआय बँकेचा नवोन्मेष्कारी तंत्रज्ञान उपक्रमांना पाठिंबा देण्याचा वारसा आहे. या तत्त्वाशी बांधील राहत आम्हाला देशातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह कंपनीच्या अधिकृत डीलर्सना इलेक्ट्रिक वेईकल फायनान्सिंग प्रोग्राम प्रदान करण्यासाठी टाटा मोटर्ससोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. यामधून भारताच्या शाश्वत भविष्याप्रती प्रवासामध्ये आमचा सातत्यपूर्ण सहभाग दिसून येतो.’’
टाटा मोटर्स आपल्या उल्लेखनीय प्रयत्नांसह भारतीय ऑटोमोटिव्ह बाजारपेठेत क्रांतिकारी बदल घडवत आली आहे आणि ८५.८ टक्क्यांच्या लक्षणीय बाजारपेठ हिस्स्यासह भारतातील ई-मोबिलिटी लाटेमध्ये अग्रस्थानी आहे. आजपर्यंत वैयक्तिक व फ्लीट विभागांमध्ये ५७,००० हून अधिक ईव्ही उत्पादित केल्या आहेत.