गिलचे शतक-भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले
टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. अहमदाबाद येथे झालेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात शुभमन गिलच्या (नाबाद 126) या T20 फॉरमॅटमधील पहिल्या शतकामुळे भारताने 20 षटकात 4 गडी गमावून 234 धावा केल्या. प्रत्युत्तरात किवी संघ 12.1 षटकांत 66 धावांत सर्वबाद झाला. हार्दिक पांड्याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. पंड्याने ब्लेअर टिकनर एक धाव, लोकी फर्ग्युसन शून्य, ग्लेन फिलिप्स 2 धावा आणि फिन ऍलनचे 3 धावात बळी घेतले.
टीम इंडीयाचा सर्वात मोठा विजय, किवीजचा सर्वात मोठा पराभव
आज भारताचा सर्वात मोठा विजय आणि टी-20 क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत न्यूझीलंडचा सर्वात मोठा पराभव झाला आहे. भारताचा यापूर्वीचा विजयाचा विक्रम 143 धावांचा होता. टीम इंडियाने 2018 मध्ये आयर्लंडचा 143 धावांनी पराभव केला होता. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ यापूर्वी 2010 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 103 धावांनी पराभूत झाला होता.
भारत-न्यूझीलंड तिसर्या T20 चे स्कोअरकार्ड
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)
अशा पडल्या किवी संघाच्या विकेट
पहिला: कर्णधार पंड्याने पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर फिन अॅलनला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या सूर्याकरवी झेलबाद केले.
दुसरा: दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अर्शदीप सिंगने ड्वेन कॉनवेला पांड्याकरवी झेलबाद केले.
तिसरा: दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीपने मार्क चॅपमनला इशान किशनकरवी झेलबाद केले.
चौथा: कर्णधार पंड्याने तिसर्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या सूर्याकरवी झेलबाद केले.
पाचवा: उमरान मलिकने 5व्या षटकात मायकल ब्रेसवेलला बोल्ड केले.
सहावा : मावीने सँटनरला सूर्याकरवी झेलबाद केले.
सातवा : मावीने ईश सोधीला त्रिपाठीकरवी झेलबाद केले.
आठवा : पंड्याने लोकी फर्ग्युसनला उमरान मलिककरवी झेलबाद केले.
नववा: ब्लेअर टिकनरला हार्दिक पांड्याने इशानच्या हाती झेलबाद केले.
दहावा : डेरिल मिशेलला उमरान मलिकने शिवम मावीच्या हातून झेलबाद केले.
भारतीय संघाचा डाव
गिलने कोहलीचा विक्रम मोडला, T20 मध्ये तो भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये फ्लॉप ठरलेल्या गिलने या डावात 63 चेंडूत 126 धावांची खेळी केली. त्याने 12 चौकार आणि 7 षटकार ठोकले. राहुल त्रिपाठीने 44, कर्णधार हार्दिक पंड्याने 30 आणि सूर्यकुमार यादवने 24 धावा केल्या.
गिलची भारतातर्फे सर्वात मोठी खेळी
गिल हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज ठरला आहे. त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला. विराटने गेल्या वर्षी अफगाणिस्तानविरुद्ध 122 धावांची खेळी केली होती. गिलने हार्दिक पांड्यासोबत चौथ्या विकेटसाठी 40 चेंडूत 103 धावांची भागीदारी केली. डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ब्लेअर टिकनर आणि ईश सादी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
अशा पडल्या भारताच्या विकेट
पहिला: दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर ब्रेसवेलने इशान किशनला एलबीडब्ल्यू केले.
दुसरा: फर्ग्युसनच्या 8व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ईश सैदीने डीप स्क्वेअर लेगवर राहुल त्रिपाठीला झेलबाद केले.
तिसरा: 13व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर टिकनरने सूर्याला ब्रेसवेलकरवी झेलबाद केले.
चौथा: 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डॅरिल मिशेलने हार्दिक पांड्याला ब्रेसवेलकरवी झेलबाद केले.
शुबमनने शतक साजरे
भारताला सामन्यात पहिला धक्का दुसऱ्याच षटकात बसला. दुसऱ्या चेंडूवर मायकल ब्रेसवेलने सलामीवीर इशान किशनला पायचीत केले. किशनने तीन चेंडूत केवळ एक धाव घेतली. मात्र त्याच्यासोबत उतरलेला भारताचा दुसरा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजाची अक्षरश: पिसे काढली. अवघ्या ५४ चेंडूत त्याने आपले शतक साजरे केले. या तुफानी खेळीत तब्बल १० चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. शुबमन गिलने १८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. शुबमनने शतक साजरे करताच कर्णधार हार्दिकने त्याचे अभिनंदन केले तर डगआऊट मधून प्रशिक्षक राहुल द्रविड तसेच इतर संघ सहकाऱ्यानी देखील त्याचे अभिनंदन केले. तिन्ही फॉरमॅट मध्ये शतक करणारा शुबमन पाचवा खेळाडू ठरला आहे. ६३ चेंडूत १२६ धावा करत शुबमन गिल अखेर नाबाद राहिला.