७० वर्षीय सासऱ्याने २८ वर्षीय सुनेवर बसले मन.
दोघांनी मंदिरात केले लग्न.
सोशल मीडियावर फोटो पाहून लोकांचे डोके चक्रावले.
गोरखपूर : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका ७० वर्षीय व्यक्ती आपल्याच सुनेच्या प्रेमात पडली. या व्यक्तीने आपल्या मुलाची ८ वर्षीय पत्नी पूजा हिच्याशी मंदिरात लग्न केले. या व्यक्तीचा मुलगा मरण पावला होता. त्यानंतर सासऱ्याचे मन सुनेवर बसले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा विवाह परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील एक लग्न सध्या चर्चेत आहे. या लग्नातील वर आणि वधूचे वय पाहूनच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तर, या लग्नातील वराचे वय आहे ७० वर्षे आणि वधूचे वय आहे २८ वर्षे आहे. तुम्ही म्हणाल की यात धक्का बसण्यासारखे काय आहे?… खरे आहे, पण एवढंच झालं असतं तर ठीक होतं. पण वधू-वरांचं नातं कळलं तर तुम्हाला खरोखरच धक्का बसेल. याचे कारण म्हणजे ही वधू या वराची सून असल्याचे सांगितले जात आहे. दोघांनी मंदिरात लग्न केले. जेव्हा या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले तेव्हा लोकांना माहिती मिळाली.