कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांच्या कागदपत्रांच्या पलीकडे जात त्यांचा हेतू आणि सचोटी पाहाण्यावर भर देणारे कॅम्पेन
कर्ज व्यवसायासाठी ‘पिरामल फायनान्स’ ग्राहकाभिमुख नवा ब्रँड लोगो लाँच
भारतातील सर्व ब्रँचेसना दिला जाणार नवा लोगो
पुढील पाच वर्षांत १००० ठिकाणी ५०० ते ६०० शाखा सुरू करण्याचे ध्येय
मुंबई – जानेवारी २०२३ – पिरामल कॅपिटल आणि हाउसिंग फायनान्स लिमिटेड म्हणजेच पिरामल फायनान्स या पिरामल एंटरप्राइजेसच्या (पीईएल) संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने आज देशातील कर्जापासून वंचित आणि दुर्लक्षित असलेल्या समाजाच्या गरजा पूर्ण करणारे पहिले ब्रँड कॅम्पेन लाँच केले. ‘हम कागज से ज्यादा नियत देखते है’ असे शीर्षक असलेले हे कॅम्पेने कागदपत्रांच्या पलीकडे जात कर्ज हवे असणाऱ्या ग्राहकांची पत जाणून घेणार आहे.
हे कॅम्पेन पिरामल फायनान्सच्या ग्राहकाभिमुखतेवर भर देणार आहे तसेच बजेटबाबत सजग असणाऱ्या आणि देशभरातील दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या शहरांतील मध्यम व लघु व्यवसायांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय या कॅम्पेनने ठेवले आहे. कॅम्पेनची सुरुवात दोन जाहिरातींनी करण्यात येणार असून त्यात पिरामल ब्रँड कशाप्रकारे ग्राहकांची केवळ कागदपत्रे न तपासता त्यांची सचोटी जाणून घेणार असल्याचे पाहायला मिळेल.
वॉम्बची संकल्पना असलेल्या या फिल्ममध्ये दोन कुटुंबांचे आयुष्य दाखवण्यात आले आहे, ज्यांना कर्ज मिळवण्यात अडचणी येत असतात. पिरामल फायनान्स कशाप्रकारे अशा व्यक्ती व त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहाते हे या जाहिरातीत दाखवण्यात आले आहे. गृह कर्ज, व्यवसाय कर्ज आणि वैयक्तिक कर्ज, युज्ड कारसाठीचे कर्ज अशा प्रकारच्या खास तयार करण्यात आलेल्या उत्पादनांच्या मदतीने पिरामल फायनान्स ग्राहकांना केवळ त्यांचा कर्ज इतिहास आणि कागदपत्रे तपासून कर्ज देणार नाही, तर ग्राहकांचे त्यांचा हेतू व सचोटीच्या आधारे विश्लेषण केले जाणार आहे. कर्ज घेणाऱ्यांसाठी हा निश्चितच बाकीच्यांपेक्षा वेगळा अनुभव ठरणार आहे.
फिल्म्स इथे पाहा:
कंपनीने कर्ज व्यवसायासाठी ग्राहकाभिमुखतेवर भर देणारा ‘पिरामल फायनान्स’चा नवा लोगो लाँच केला असून देशभरातील सर्व शाखा हा नवा लोगो वापरताना दिसतील.
पिरामल कॅपिटल आणि हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जयराम श्रीधरन म्हणाले, ‘भारताच्या कानाकोपऱ्यात विस्तार करत असताना आम्ही एरवी आर्थिक यंत्रणेद्वारे दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोण्यासाठी प्रभावी व अनोख्या कर्ज सुविधांवर भर देणार आहोत. या कॅम्पेनच्या माध्यमातून तसेच रिब्रँडिंगच्या मदतीने नवी, दमदार, ग्राहकाभिमुख कर्ज व्यवसाय फ्रँचाईझी तयार करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. भारतासारख्या गुंतागुंतीची समाज यंत्रणा असलेल्या देशाला सोप्या, प्रभावी आणि परिणामकारक कर्ज सुविधांची तसेच ग्राहकांच्या आर्थिक गरजांची सखोल जाण असलेल्या यंत्रणेची गरज आहे.’
आम्ही देशाच्या तळागाळातील ग्राहकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी शाखा सुरू करत आहोत, स्थानिक लोकांची भरती करणार आहोत आणि या स्थानिक बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे उत्पादन विकसित करणार आहोत. आर्थिक वर्ष २०२२ मधील पातळीवरून दुप्पट एयूएम गाठण्याचे आमचे लक्ष्य असून त्याचबरोबर रिटेल वितरणात भरीव वाढीचे आणि आर्थिक वर्ष २७ पर्यंत कर्जातील रिटेल वितरणाचा वाटा दोन तृतीयांश आणि होलसेलचा वाटा एक तृतीयांश करत कर्ज वाटप अधिकाधिक रिटेल करण्यावर भर देणार आहोत.
या कॅम्पेनविषयी पिरामल कॅपिटल आणि हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमुख अरविंद अय्यर म्हणाले, ‘आपल्या देशात विविध कारणांमुळे कर्जास पात्र न समजले जाणारे बरेच वंचित व दुर्लक्षित नागरिक आहे आणि त्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्याआधीच विविध आव्हानांना तोंड द्यावे लागते. पिरामल फायनान्समध्ये आम्ही अशा ग्राहकांच्या कर्जविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी व त्यांच्या आर्थिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मदत व्हावी म्हणून नाविन्यपूर्ण व लवचिक सुविधा तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे.’
आमच्यासाठी आमचे ग्राहक अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्यासाठी ‘हम कागज से ज्यादा नियत देखते है’ हे कॅम्पेन लाँच करताना आनंद होत आहे. हे कॅम्पेन ग्राहकांना ठाम व सकारात्मक संदेश देणारे आहे, की कर्जाची परतफेड करण्याचा योग्य हेतू बाळगणाऱ्यांना पिरामल फायनान्सकडून कर्ज सुविधेचा लाभ घेता येऊ शकेल. हे कॅम्पेन आमच्या पिरामल फायनान्स या एनबीएफसी- एचएफसी या ग्राहकाभिमुख ब्रँडचा आरंभ आहे. वित्त पुरवठ्याचे सुलभ पर्याय उपलब्ध करून त्यांच्यामध्ये सकारात्मकता तयार केली जाणार आहे.
पिरामल फायनान्स देशाच्या दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये वेगाने विस्तार करत आहे. कंपनीच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांना फिजिटल धोरणाची जोड देत देशातील लोकांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा समावेश असलेले रिटेल कर्ज व्यासपीठ विकसित केले जात आहे. पीईएलने डीएचएफएलच्या समावेशाच्या प्रवासाचे एक वर्ष यशस्वीपणे पूर्ण केले आहे व यापुढेही असाच विकास साधण्याचे कंपनीचे ध्येय आहे.
रिटेल कर्ज व्यवसायाची वैशिष्ट्ये
सध्या कंपनीकडे २७ राज्यांतील २९३ शहरांत ३४३ शाखांचे नेटवर्क (विलिनीकरणपर्व १४ शाखांनंतर) आहे.
कंपनीने पुढील पाच वर्षांत १००० ठिकाणी ५०० ते ६०० शाखा सुरू करण्याचे ध्येय ठेवले आहे.
कंपनीचे रिटेल कर्ज वितरण विलिनीकरण पूर्व असलेल्या २४,८७२ कोटी रुपयांवरून साडेचार पटींनी वाढले आहे.
आर्थिक वर्ष २२ मध्ये ग्राहक फ्रँचाईझी २.२ दशलक्षांवर गेली असून ४.५ लाख नवे ग्राहक मिळवण्यात आले आहेत.
विविध नवी उत्पादने लाँच करण्यात आली असून दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या शहकांतील पगारदार नागरिकांना वैयक्तिक कर्ज पुरवणाऱ्या शाखेच्या लाँचसह ११ रिटेल उत्पादने उपलब्ध करण्यात आली आहेत.
आर्थिक वर्ष २3 मध्ये कंपनीने वेगवेगळ्या फिनटेक कंपन्या, ओईएम आणि अग्रीगेटर्ससह डिजिटल एम्बेडेड फायनान्स व्यवसायाअंतर्गत २२ सक्रिय भागिदारी केल्या आहेत. डिजिटल कर्ज उत्पादनांसह पिरामल फायनान्सने आपली ग्राहक फ्रँचाईझी मोठ्या प्रमाणावर विस्तारल्यामुळे क्रॉस सेलिंगच्या संधीही वाढल्या आहेत. लघुवित्त व्यवसाय आता तीन राज्यांत (कर्नाटक, राजस्थान आणि बिहार) विस्तारण्यात आला आहे.
तंज्ञज्ञान बळकटीसाठी तसेच व्याप्ती वाढवण्यासाठी अनालिटिक्स उभारणीसाठी कंपनी सातत्याने गुंतवणूक करत आहे. त्यासाठी कंपनीने बेंगळुरूमध्ये ‘पिरामल इनोव्हेशन लॅब’ उभारली आहे. या लॅबमध्ये माहितीसाठा, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशिन लर्निंग (एआय/एमएल) यांच्या वापरातून वंचित व दुर्लक्षित ग्राहकांसाठी खास उत्पादने पुरवली जातील.
पिरामल फायनान्सने बेंगळुरू येथील लॅबमध्ये आर्थिक वर्ष २३ च्या अखेरपर्यंत विविध तंत्रज्ञाना आणि व्यावसायिक बुद्धीमत्तेसाठी ३०० व्यावसायिकांची टीम तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे.