भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक वस्तूंची कंपनी
पॉलिकॅब इंडिया लिमिटेड (PIL) ने इलेक्ट्रिशियन समुदायाला सन्मान मिळवून
देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. इलेक्ट्रिशियन्ससाठी प्रथमच असा वार्षिक
पुरस्कार सोहळा जाहीर करताना कंपनीला अभिमान वाटत आहे. हा कार्यक्रम १८
जानेवारी २०२३ रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला होता.
पॉलिकॅब ने संपूर्ण भारतातून असे विजेते निवडले ज्यांनी ब्रॅंडच्या प्रती
अत्यंत समर्पण दाखवले आहे. कंपनीने इलेक्ट्रिशियन्ससाठी तीन श्रेणी तयार
केल्या आहेत- अखिल भारतीय वार्षिक टॉपर्स्, दोन्ही विभागातील प्रादेशिक
टॉपर्स् आणि संबंधित राज्य टॉपर्स्. विजेत्यांना इलेक्ट्रिक कार, लक्झरी दुचाकी
आणि परदेश सहल यांसारख्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ‘पॉलिकॅब तज्ज्ञ
इलेक्ट्रिशियन’ कार्यक्रमामध्ये टक्करच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील मुंबईचे किशन
गुप्ता यांना इलेक्ट्रिक कारचा अखिल भारतीय विजेता म्हणून घोषित करण्यात
आले. पश्चिम आणि मध्य विभागातील क्षेत्रीय टॉपर म्हणून नरेंद्र गुप्ता यांनी
लक्झरी दुचाकी जिंकली.
हा पुरस्कार समारंभ पॉलिकॅबच्या वार्षिक लॉयल्टी कार्यक्रमाचा एक भाग
आहे ज्यामध्ये “पॉलिकॅब तज्ज्ञ” इलेक्ट्रिशियन्सना त्यांच्या उत्कृष्ट
कामगिरीसाठी सन्मानित केले जाते. या समारंभाद्वारे कंपनी इलेक्ट्रिशियन्सच्या
प्रयत्नांना ठळकपणे सर्वांसमोर आणण्यासाठी एक व्यासपीठ उभारण्याची आशा
करत आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याबाबत बोलताना पॉलिकॅब इंडिया लिमिटेड (PIL)चे
अध्यक्ष आणि मुख्य विपणन अधिकारी निलेश मलानी म्हणाले, “पॉलिकॅबमध्ये
आम्ही आमच्या मूल्य शृंखलांमध्ये मानव केंद्रीतता वाढवण्यावर भर देतो.
‘पॉलिकॅब तज्ज्ञ वार्षिक पुरस्कार सोहळा’ हे भारतातील आमच्या
इलेक्ट्रिशियन्सचे कौतुक करणारे, त्यांना प्रोत्साहन देणारे व्यासपीठ आहे. या
कार्यक्रमाचा उद्देश इलेक्ट्रिशियन्सच्या जीवनात बदल घडवून आणणे आणि
त्यांना अधिक व्यावसायिक बनवून सकारात्मक बदल घडवून आणणे हा आहे.